प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS- *राज्यकर्त्यांनी पत्रकारांचे लिखाण सकारात्मक पद्धतीने घेतले पाहिजे- बाजीराव भैय्या धर्माधिकारी* 🔸 *_मुकनायक पुरस्काराने पत्रकारांचा गौरव; परळीत मुकनायक दिन मोठ्या उत्साहात साजरा_*

 *राज्यकर्त्यांनी पत्रकारांचे लिखाण  सकारात्मक पद्धतीने घेतले पाहिजे-  बाजीराव भैय्या धर्माधिकारी*

 🔸 *_मुकनायक पुरस्काराने पत्रकारांचा गौरव; परळीत मुकनायक दिन मोठ्या उत्साहात साजरा_*

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...  राज्यकर्त्यांनी पत्रकारांचे लिखाण  सकारात्मक पद्धतीने घेतले पाहिजे असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले. ते परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे 31 जानेवारी रोजी दैनिक सम्राट च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मूकनायक पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.  बाजीराव भैय्या धर्माधिकारी म्हणाले की, राज्यकर्त्यांनी पत्रकारांच्या लिखाणाचा  सकारात्मक दृष्टीने विचार केला पाहिजे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या मूकनायक या वर्तमानपत्राच्या नावाने दिला जाणारा मूकनायक पुरस्कार माझ्या दृष्टीने सर्वोच्च पुरस्कार असल्याचे ते म्हणाले.

       परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजीराव भैय्या धर्माधिकारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपनगराध्यक्ष आयुब खान पठाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण गुट्टे, सहाय्य पोलीस निरीक्षक महेंद्र सिंग ठाकूर, महिला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विनोद जगतकर ,सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे, नगरसेवक गोपाळ आंधळे, सोनपेठ चे संपादक किरण स्वामी आदी  उपस्थित होते. मुकनायक दिनाच्या निमित्ताने सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर परळी शहरातील गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा मूकनायक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात पुढे बोलतांना बाजीराव धर्माधिकारी म्हणाले की, आज डिजिटल युग आले असले तरी सकाळी वर्तमानपत्र वाचावेच लागते.तो वेगळाच आनंद आहे. पत्रकारांनी आपली लेखणी सतत जागृत ठेवली पाहिजे. तसेच कोरोणाच्या काळात इतर क्षेत्रावर जसा परिणाम झाला तसा परिणाम प्रसार माध्यमे यावरही झाला आहे. परळी शहराचे सकारात्मक चित्र प्रसारमाध्यमांनी लोकांसमोर ठेवले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी प्रा. डॉ. विनोद जगतकर, आयुब खान पठाण, गोपाळ आंधळे, अनंत इंगळे, डॉ.अरुण गुट्टे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात परळी शहरातील गेल्या अनेक वर्षापासून काम करणाऱ्या संपादक आणि पत्रकारांचा स्मृतिचिन्ह, भारतीय संविधान, दैनिक सम्राट अंक आणि पेन देऊन सन्मान करण्यात आला. दैनिक मराठवाडा साथी चे संपादक सतीश बियाणी, दैनिक लोकाशा चे दिलीप बद्दर, जगमित्रचे संपादक  बालासाहेब कडबाने, मानपत्राचे संपादक बालासाहेब जगतकर, दैनिक पुढारी चे पत्रकार प्रा. रवींद्र जोशी, दैनिक सूर्योदयाचे प्रेमनाथ कदम, दैनिक गावकरी चे जगदीश शिंदे, आरएसटीसी न्यूज चॅनेल चे वैजनाथ गायकवाड, दैनिक पुण्यभूमी चे पत्रकार भगवान साकसमुद्रे, दैनिक सिटीजन शेख मुखरम, महाराष्ट्र प्रतिमा चे अनुप कुसुमकर, आणि नवोदीत पत्रकार प्रोत्साहनपर पुरस्कार विकास वाघमारे, गंगाखेड येथील प्रा. सतिश कसबे यांना गौरविण्यात आले.यावेळी पुरस्कार विजेते दिलीप बद्दर, भगवान साकसमुद्रे,प्रा.रविंद्र जोशी यांनी सत्काराला उत्तर दिले.औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी शुभेच्छा संदेश पाठवुन सदीच्छा व्यक्त केल्या. प्रास्ताविक संयोजक रानबा गायकवाड यांनी केले.सुत्रसंचलन बालाजी कांबळे यांनी केले.तर आभार प्रदशन धनंजय आरबुने यांनी केले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या