इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

MB NEWS-दादाहरी वडगाव येथील तरूणींची छेड काढल्या प्रकरणी आंबेडकरी समाजाची प्रचंड एकजूट उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोरील निदर्शनास मोर्चाचे स्वरूप १० दिवसात कार्यवाही न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा

  दादाहरी वडगाव येथील तरूणींची छेड काढल्या प्रकरणी आंबेडकरी समाजाची प्रचंड एकजूट

उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोरील निदर्शनास मोर्चाचे स्वरूप

१० दिवसात कार्यवाही न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा

परळी वै. (प्रतिनिधी) ःपरळी तुक्यातील दादाहरी वडगाव येथे दि.२६.०१.२०२२ रोजी तरूणीची छेड काढल्या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे संबंधीत तरूणांवर छेडछाड व ऍट्रॉसीटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला पण दुसर्‍याच दिवशी संबंधीत प्रकरणात साक्षीदार असणार्‍या तरूणांवर ३२७ चा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  त्यामुळे बौध्द समाजाच्या विविध पक्ष व संघटनांच्या कार्यकत्यांच्या वतीने आज दि.३१.०१.२०२२ रोजी उपजिल्हाधिकारी परळी यांच्या कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करण्यात आली व या निदर्शनाद्वारे खालील मागण्या करण्यात आल्या.

१) दादाहरी वडगाव येथील बौध्द तरूणांवर ज्या खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या आहेत त्या तात्काळ मागे घेण्यात याव्यात.

२) गुन्हेगाराला पाठीशी घालुन बौध्द तरूणांस अटक करणार्‍या ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारूती मुंडे यांना त्वरीत निलंबीत करण्यात यावे.

या दोन प्रमुख मागण्या बौध्द समाजाच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आल्या.  जर वरील मागण्यासंदर्भात १० दिवसात कार्यवाही केली नाही तर बौध्द बांधवांच्या वतीने यापुढे तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी निदर्शनाचे कार्यक्रमास मोर्चाचे स्वरूप आले होते. यामध्ये सदर घटनेबद्दल बौध्द बांधवांमध्ये तिव्र असंतोषाची भावना दिसून आली.  

यावेळी रिपाईचे भास्करनाना रोडे, प्रा.दासू वाघमारे, गंगाधरआप्पा रोडे, राष्ट्रवादी कॉंंग्रेसचे सुभाष वाघमारे, भाजपाचे वैजनाथ जगतकर, राष्ट्रवादीचे माधव ताटे, रिपाईचे नगरसेवक सचिन कागदे, पिपल्स रिपाईचे सोपान ताटे, कामगार नेते गौतम आगळे, राष्ट्रवादीचे अनंत इंगळे, पंडित झिंजुर्डे, प्रबुध्द रिपाईचे प्रा.विलास रोडे, भाजपाचे सुनिल कांबळे, बीएसपीचे अनंत गायकवाड, माजी नगरसेवक रवि मुळे, बहूजन वंचित आघाडीचे गफारशहा पठाण, एकतावादी रिपार्ईचे सुरेश रोडे, तसेच केशव गायकवाड, संजय जगतकर, भैय्यासाहेब आदोडे, दत्ताभाऊ सावंत, संजय जगतकर, राजाभाऊ रोडे, रमेश मुंडे, मनोहर मुंडे, जितेंद्र मस्के, दयानंद शिंदे, रमेश मस्के, अशोक पोटभरे, धम्मानंद क्षिरसागर, राजाभाऊ मुंडे, भागवत कसबे, अनंत जगतकर, शरण मस्के, कार्तीक कांबळे, संदिप मस्के, रमेश जगतकर, अनिल कांबळे, नरसिंग गायकवाड, सुभाष मुंडे, जनार्दन मुंडे, हनुमंत गायकवाड यांच्यासह मौजे दादाहरी वडगाव व परळी परिसरातील बौध्द बांधव, महिला, पुरूष हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.  आंदोलन चालू असतांना जिल्हा परिषद सदस्य प्रा.मधुकर आघाव यांनी आंदोलनास पाठींबा दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट