MB NEWS- प्रासंगिक लेख:- ना.धनंजय मुंडे यांच्यासाठी 'सर्वस्व' पणाला लावून लढणारा 'सच्चा साथी' : वाल्मिकअण्णा कराड*

 *ना.धनंजय मुंडे यांच्यासाठी 'सर्वस्व' पणाला लावून लढणारा 'सच्चा साथी' :  वाल्मिकअण्णा कराड*

        ना.धनंजय मुंडे यांच्यासाठी 'सर्वस्व' पणाला लावून लढणारा 'सच्चा साथी' म्हणून संबंध महाराष्ट्रात वाल्मिकअण्णा कराड यांची ओळख आहे. नगर परिषद गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या कामाचा आवाका खुप विस्तीर्ण आहे व कार्याची व्याप्ती खुप मोठी आहे.आश्चर्य वाटेल एवढी एनर्जी व हजारो कामांचा डोक्यात विचार तरीही प्रत्येक काम यशस्वीपणे पार पाडण्याची हतोटी ही असामान्य आहे. राजकीय, सामाजिक,सांस्कृतिक, अध्यात्मिक अशा विविध क्षेत्रातील लोकांशी असलेला स्नेहभाव जपताना प्रसंगी व्यावसायिक दृष्टिकोन बाजुला सारुन ते स्नेहभाव दृढ करतात ही त्यांची कामाची शैली आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक प्रभाग व प्रभागातील प्रत्येक नागरीकांचा विचार करून नियोजन करणे त्यासोबत अंतर्गत राजकारण सांभाळून घेत नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते , कार्यकर्ते या प्रत्येकाचे समाधान करून सर्व सामान्य माणसाचे हीत जपणे हे शिवधनुष्य पेलणारा ना.धनंजय मुंडे साहेबांचा खराखुरा शिलेदार म्हणून वाल्मिकअण्णा कराड यांचे कार्य सुरू आहे. त्यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!!

        ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून निघणारी प्रत्येक बाब, प्रत्येक उपक्रम , प्रत्येक संकल्प प्रत्यक्षात साकार होतो, यशस्वीरित्या पार पडतो यामागे असते दिवसरात्र सेवाकार्य व व्यवस्था लावण्यात परिश्रम करणारी एकच व्यक्ती. सगळ्या समस्यांचा व प्रश्नांच्या उत्तराचा पुर्णविराम म्हणजे वाल्मिकअण्णा कराड .ना.धनंजय मुंडे यांच्या प्रत्येक संकल्प प्रत्यक्षात साकार करण्यासाठी क्षणनक्षण अविरत धडपड करणारे व सर्वसामान्य घटकांचे सातत्याने हित जपणारे 'असामान्य व्यक्तीमत्व' वाल्मिकअण्णा कराड चोवीस घंटे व्यवस्था करण्यात गुंतलेले असतात.अतिशय डॅशिंग आणि पक्षसंघटना आणि निवडणुक डावपेच आखणारे धनंजय मुंडे यांच्या साठी सर्वस्व पणाला लावून यश मिळेपर्यंत झुंजणारा सच्चा व खराखुरा लढवय्या शिलेदार म्हणजे वाल्मिकअण्णा. एक प्रामाणिक नेतृत्व. व्यासपीठावर न मिरवणारे, सभेतील कुठच्याही फोटोसाठी आग्रही नसणारे पण अचानक  धडाडिने आणि कमालीने, आपल्या कामाच्या स्टाईलने  ते 'मॅनेजमेंट गुरु ठरले आहेत.


        

 ना.धनंजय मुंडे यांच्यासाठी अतुलनिय अशी कामगिरी आणि पक्ष संघटनेचा प्रत्येक सदस्य हा पक्षासाठी महत्वाचा अस म्हणुन प्रत्येकाला निवडणुक,उपोषण, आंदोलन अशा सर्व गोष्टींना सहकार्य करणारे,प्रत्येका बरोबर मनमिळावुपणे व खंबीरपणे पाठीशी राहुन आपला ठसा त्यांनी उमटवला आहे.सामाजिक कार्यात स्वत: पुढे येऊन प्रत्येक माणसाचे समाधान करणे  सोपं नाही. सामाजिक बांधिलकी जपत दररोज हजारो सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावत व ज्याला जे जे हवे त्याची व्यवस्था लावणे, नगर परिषदेच्या क्लिष्ट कार्यात प्रशासन, नगरसेवक, कार्यकर्ते ते थेट नागरीक असा समन्वय साधून यशस्वी काम करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. माणूस माणसास दरवेळेसच मदत करेल असे नाही पण ज्या वेळेस एखादा माणूस स्वच्छ मनाने दुसऱ्यास मदत करतो व त्याने ती वेळेवर केलेली मदत कोणीच विसरू शकत नाही. तो माणूस त्याला देव मानू लागतो कारण तो माणूस त्याच्यासाठी देवासारखा धावून आला. अशाच प्रकारचे 'मदतगाराचे' काम वाल्मिकअण्णा कराड  यांचे आहे. सामान्य माणसाच्या मनात कायम स्थान निर्माण करायला खुप शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. परंतु आजघडीला ना.धनंजय मुंडे यांनी सामान्य माणसाच्या ह्रदयात स्थान निर्माण केलं आहे.या माध्यमातून सामान्य माणसाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नगर परिषद गटनेते वाल्मिकअण्णा कराड बनले आहेत.

         एकदा कार्यक्रम वाल्मिक अण्णांच्या हातात गेला तर तसला कार्यक्रम घेण्याचा नादच कुणी करायचा नाही हे  खुद्द ना. धनंजयजी मुंडे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात काढले आणि त्यात काही दुमत नाही. आण्णा आणि राजकीय मॅनेजमेंट हे एक समीकरणच झालय. आदरणिय आण्णांच्या राजकीय नियोजनापुढं भलेभले एमबीए केलेले लोकसुद्धा फिके पडतील. कुठलंही काम पूर्ण पछाडून करायचं पण कधीही श्रेय घ्यायचं नाही  आण्णांची ही कार्यपद्धती अनेक वर्षांपासून अबाधित आहे. परळीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत वा परळी विधानसभा निवडणुक असेल, नामदार साहेबांचा विजय झाल्यानंतरचे स्वागत समारंभ असतील किंवा साहेबांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन असेल आदरणिय आण्णांचा प्रत्येक नियोजनात मोठा वाटा आहे.अतिशय खडतर जीवनप्रवास करून , मान अपमान सहन करून , दिवसरात्र कष्ट करून आदरणिय आण्णा आज यशोशिखरावर पोहोचले आहेत पण अहंकाराचा कसलाही लवलेश नाही. असं व्यक्तिमत्व शोधूनही सापडणार नाही.

     वाल्मिकअण्णांचा कामाचा पॅटर्न म्हणजे कार्यकर्त्यां साठी दिशादर्शक आहे. एखादे कार्य हाती  घेतले तर ते सर्वस्व झोकून देऊन कसे केले पाहिजे,२४ तास धडपड करीत कोणत्याही कामाला यशस्वी करण्याची जिद्द, नेत्याचा शब्द प्रमाण मग त्यासाठी सर्वकाही करण्याची निष्ठा असं काम करताना नेहमीच कार्यकर्ते व सर्वांनीच वाल्मिकअण्णाना पाहिले आहे.ना.धनंजय मुंडे यांच्या सारख्या एका उत्तुंग नेतृत्वासाठी काम करत असताना वाल्मिकअण्णांचा मेहनत व कामाचा पॅटर्न म्हणजे कार्यकर्त्यांसाठी दिशादर्शक व अनुकरणीय आहे. हजारो गोरगरीब, वंचित, उपेक्षित घटकांना वेळेवर पाहिजे ते आणि वाट्टेल ते करुन न्याय मिळवून देण्यासाठी पडणारे मदतगार वाल्मिक अण्णा कराड यांना प्रभु वैद्यनाथाची कृपा व हजारो गरजवंतांचे आशिर्वाद नक्कीच मिळत राहणार आहेत.आदरणिय वाल्मिक अण्णा कराड यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!

              -   मोहन साखरे,

                 परळी वैजनाथ.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !