MB NEWS-टीईटी गैरव्यवहार प्रकरणाचे धागेदोरे पोहचले परळीपर्यंत; आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक

  टीईटी गैरव्यवहार प्रकरणाचे धागेदोरे पोहचले परळीपर्यंत; आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

            शिक्षक पात्रत परिक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने तात्कालिन भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक केली आहे. प्रशासकीय सेवेत एवढ्या बड्या मोठ्या अधिकाऱ्याचा शिक्षक भरती घोटाळ्यात सहभाग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.टीईटी गैरव्यवहार प्रकरणाचे धागेदोरे परळीपर्यंत पोहचले आहेत.; अटक करण्यात आलेले आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर हे मुळ परळी तालुक्यातील आहेत.

         खोडवेकर हे २०१९ ते डिसेंबर २०२० या कालावधीत शिक्षण विभागात कार्यरत होते. त्यांनी सावरीकर यांच्याकडून पैसे घेतले असल्याचे तपासात समोर आल्यानंतर खोडवेकर यांना अटक करण्यात आली आहे. खोडवेकर हे २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या ते कृषी विभागात उपसचिव म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (TET) अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याची धक्कादायक माहिती सायबर पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. त्याचबरोबर २०१८ मधील परीक्षेमध्येही मोठ्या प्रमाणावर अपात्र परीक्षार्थींकडून पैसे घेऊन पात्र ठरले असून त्याची पडताळणी सुरू आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.


टीईटी परीक्षेमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागाचे सल्लागार अभिषेक सावरीकर यांना अटक केली होती. या प्रकरणाचा तपास करीत असताना राज्य परीक्षा परिषदेकडून पोलिसांनी मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांनी केली. त्यावेळी २०१९-२० च्या परीक्षेत एकूण १६ हजार ५९२ परीक्षार्थींना पात्र केल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात पोलिसांनी दोन्ही निकाल पडताळून पाहिल्यावर त्यातील तब्बल सात हजार ८०० परीक्षार्थी हे अपात्र होते. तरीही त्यांना निकालामध्ये पात्र ठरविण्यात आल्याचे दिसून आले आहे.

    दरम्यान टीईटी गैरव्यवहार प्रकरणाचे धागेदोरे परळीपर्यंत पोहचले आहेत. अटक करण्यात आलेले आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर हे मुळ परळी तालुक्यातील खोडवा सावरगाव येथील आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !