MB NEWS- *महिला व बाल विकास विभागाची पदे राज्यसेवा परीक्षेतून भरण्याऐवजी सरळसेवेने भरावित; हजारो विद्यार्थ्यांची मागणी* 🕳️ _परिक्षेची तयारी करणारे उमेदवार आंदोलनाच्या मार्गावर_

 *महिला व बाल विकास विभागाची पदे  राज्यसेवा परीक्षेतून भरण्याऐवजी सरळसेवेने भरावित; हजारो विद्यार्थ्यांची मागणी*

🕳️ _परिक्षेची तयारी करणारे उमेदवार आंदोलनाच्या मार्गावर_


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

       महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) सरळसेवा परीक्षेतून भरण्यात येणारी महिला व बाल विकास विभागाची पदे आता राज्यसेवा परीक्षेतून भरली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.त्यामुळे परिक्षेची पूर्वतयारी करणार्यांना मानसिक कुचंबणा सहन करावी लागत आहे. विभागातील बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), सहायक आयुक्त, परिविक्षाधीन अधीक्षक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) ही पदे आता सरळसेवा परीक्षा पद्धतीने न भरता राज्यसेवा परीक्षेतून भरली जाणार आहेत.ही पदे  राज्यसेवा परीक्षेतून भरण्याऐवजी सरळसेवेने भरावित अशी हजारो विद्यार्थ्यांची मागणी आहे. अन्यथा परिक्षेची तयारी करणारे उमेदवार आंदोलनाच्या मार्गावर आहेत.

      ‘एमपीएससी’च्या या निर्णयावर परीक्षेच्या विशेष तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाची कोणतीही पूर्व कल्पना दिलेली नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्‍यांचे नुकसान होणार आहे. ‘एमपीएससी’ने एक संधी देऊन या विभागातील पदांची परीक्षा पुन्हा सरळसेवेने घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

२०१४ नंतर कोणतीही वर्ग ‘अ’ पदाची परीक्षा झाली नाही.यावर्षी परीक्षा होईल, या आशेने चार वर्षांपासून विद्यार्थ्यांची तयारी सुरू आहे.बदललेल्या सेवा प्रवेश नियमामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होणार आहे.

गेल्या आठ वर्षांत विद्यार्थ्यांना पूर्व सूचना का दिली नाही? सरळसेवा परीक्षेला एक परिक्षा आणि थेट मुलाखत असे  स्वरूप होते.राज्यसेवा परीक्षेतून आता तीन टप्प्यांतून जावे लागणार आहे.महिला व बालविकास विभागांतर्गत येणाऱ्या महिला व बालविकास आयुक्तालयामधील बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), सहायक आयुक्त, परिविक्षा अधीक्षक, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) गट-अ पदांसाठी सेवाप्रवेश नियम यात बदल करून ही पदे सरळसेवेने न भरता आता राज्यसेवा परीक्षेद्वारे भरली जाणार आहेत. यामुळे मागील तीन वर्षांपासून या परीक्षेची तयारी करणारे शेकडो विद्यार्थी संकटात सापडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

            आता ऐन वेळी जर सेवाशर्ती बदलून परीक्षा दुसऱ्या परीक्षेत वर्ग करत असतील तर मागील तीन वर्षापासून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यावर हा अन्याय होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राज्यसेवा आणि आत्ता पर्यंतची सरळसेवा यांच्या परीक्षा पध्दतीत खूप विषमता आहे, बदल करायचा जरी असेल तर तो सावकाश एक ते दोन वर्षांच्या पूर्व सुचनेने करावा, केंद्रीय लोकसेवा आयोग देखील एक वर्ष पूर्वसूचना देऊन बदल करते आता अचानक करण्यात असलेल्या बदलामुळे आम्ही संकटात सापडलो असल्याचे या  विद्यार्थ्यांनी सांगितले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !