इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

MB NEWS- *युवकांनी नोकरी च्या मागे ना लागता व्यवसायाच्या माध्यमातून ध्येय साध्य करावे-राजेश गिते*

 *युवकांनी नोकरी च्या मागे ना लागता व्यवसायाच्या माध्यमातून ध्येय साध्य करावे-राजेश गिते*       

 पुणे :- आज दि ३१/०१/२०२२रोजी परळी चे भुमिपुत्र अनिलकुमार गिते व प्रमोद ढाकणे(महाराष्ट्र पोलीस) यांनी नव्याने सुरू केलेल्या हॉटेल थायम(तमालपत्र)चे उद्घाटन भाजपा नेते राजेश गिते यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.या उद्घाटनप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.                  

या प्रसंगी शुभेच्छा पर आपले विचार व्यक्त करताना राजेश गिते यांनी युवकांनी नोकरी च्या मागे ना लागता व्यवसायाच्या माध्यमातून आपले ध्येय साध्य करावे असे म्हटले.या काळात नौकरी च्या माध्यमातून ध्येय साध्य करता येते असे नाही.तुम्ही जिद्द आणि चिकाटी च्या माध्यमातून विविध क्षेत्रात व्यवसाय करुन यशस्वी होऊ शकता.आज अनिलकुमार यांनी परळी वैजनाथ सारख्या तालुक्याच्या ठिकाणाहून येऊन पुण्यात नविन व्यवसायात पदार्पण करत आहे त्याचे मनापासून अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.ईतर युवकांनी ही कुठला ही न्युनगंड ना बाळगता अनिलचा आदर्श घ्यावा असे आवाहनही उपस्थित युवकांना राजेश गिते यांनी केले.                                   

या प्रसंगी पुणे शहर ACP नारायण शिरगावकर सर,पुणे शहर भाजपा युवा मोर्चाचे राघेंद्र बापु मानकर, पुणे राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्या रुपालीताई पाटील-ठोंबरे नगरसेवक राजूभाऊ परदेशी, भरत मित्र मंडळ अध्यक्ष बाळासाहेब (आण्णा)दांडेकर,प्रा सुनिल ढवळे सर, दशरथ गिते, बालाजी गिते यांची प्रमुख उपस्थिती होती.          

सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत होटेल चे मालक अनिलकुमार गिते आणि सर्व मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आला.        

या उद्घाटन प्रसंगी परिसरातील नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट