MB NEWS- *पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप 2021-22 साठी डीबीटी वर अर्ज करण्यासाठी 15 फेब्रुवारी पर्यंत मुदत - धनंजय मुंडे* *पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करावेत*

 *पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप 2021-22 साठी डीबीटी वर अर्ज करण्यासाठी 15 फेब्रुवारी पर्यंत मुदत - धनंजय मुंडे*



*पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करावेत*


मुंबई (दि. 31) - : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकारच्या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजना 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी साठी अर्ज करणे व जुन्या अर्जाचे नूतनीकरण करणे यासाठी 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत देण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.


पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षण फी, परीक्षा शुल्क, देखभाल भत्ता आदींसाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याची प्रक्रिया आहे. 


उच्च शिक्षणातील काही विषयायील प्रवेश प्रक्रिया व राउंड अजूनही सुरू असल्याने विद्यार्थ्यांना विहित वेळेत अर्ज करता यावा, याचा विचार करून विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रिक साठी अर्ज करणे तसेच पूर्वीच्या अर्जाचे नूतनीकरण करणे यासाठी 15 फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !