MB NEWS- पांगरी चे उपसरपंच अॅड.श्रीनिवास मुंडे यांनी लिहिलेला वाचनिय लेख :- ♂मी पाहिलेले आणि अनुभवलेले आण्णा..अनभिषिक्त बादशहा♂

 ♂मी पाहिलेले आणि अनुभवलेले आण्णा..अनभिषिक्त बादशहा♂

आज वाल्मिक अण्णा कराड यांचा 53 वा वाढदिवस. वाढदिवस साजरा करणं ही पाश्चात्य संस्कृती आहे.प्रत्येक वाढदिवस आयुष्यतील एक वर्ष कमी झाल्याची जाणीव करून देत असतो.पण सोशल मीडिया च्या प्रभावामुळे कधी स्वप्नात सुद्धा वाढदिवस माहिती नसणारे महाभागही बॅनरबाजी,होर्डिंग्ज लावून वाढदिवस साजरे करताना आपण हल्ली पाहतोय.आम्ही ज्ञानदान, अन्नदान आणि रक्तदान करून अण्णांचा वाढदिवस साजरा करतोय.जरी आयुष्यातलं एक वर्ष  कमी झाल्याच दुःख असलं तरी ते वर्ष चांगल्या कामासाठी खर्च झालं याचं समाधान ज्यांच्या जीवनात प्राप्त असतं अशाच व्यक्ती विशेषांचे 'वाढदिवस' सार्थकी ठरतात, अन्यथा 'येड्या गबाळ्यानी' एक वर्ष आयुष्यातून निघून गेल्याचं दुःख पाळायला हरकत नाही. प्रत्येक व्यक्तीने आयुष्याचं सिंहावलोकन करावं आणि खर्च झालेल्या आयुष्यात ."कौतुक वाटे झालिया वेचाची"..या न्यायाने आतापर्यंत खर्च झालेल्या आयुष्याच कौतुक आणि समाधान वाटतअसेल तर त्यांच्या वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा व्हायलाच हवा...एखादा व्यक्ती हेलिकॉप्टर ने  हिमालयाच्या शिखरावर गेला  तर त्याच कौतुक होणार नाही, पण तोच पायी चालत त्या शिखरावर गेला तो निश्चित कौतुकास पात्र होणार.साधनांची अनुकूलता असताना साध्य प्राप्ती होणं नवलावह नाही,पण कुठलेही साधन अनुकूल नसताना आज जी अण्णांनी साध्य प्राप्ती केली आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे.


Your caliber is not tested by success is in your life. Your caliber is tested how you handle failure in your life.


अण्णांचं एवढं ऐश्वर्य आज दिसतंय पण अण्णांच्या आयुष्याचा पूर्वार्ध पहिला तर खूप खडतर आणि प्रतिकूल होता.इतका प्रतिकूल की आपण ऐकला तर आपल्या डोळ्यात निश्चित अश्रू येतील.मी तो लिहणार नाही. एका कवींच्या शब्दांत तो वर्णून जाईल


 ♀भाजलेलं बी, माळरानावर उगवलं..

तृष्णेच्या काठावर, वासना विसावली..♀


अर्थात, भाजलेलं बियाणं सुपीक जमिनीत सुध्दा उगवत नाही, पण ते माळरानावर उगवलं, अशा अशक्यप्राय प्रतिकूल परिस्थितीतून  आण्णांनी हे शून्यातून साम्राज्य उभं केलं आहे, कुटुंबात  यापूर्वी कुठलाही राजकीय वारसा नसताना, राजकारणाचा कधी दुरान्वये संबंध नसताना मा.धनंजय मुंडे साहेबांच्या राजकारण, अर्थकारणाचे सर्वेसर्वा आहेत.2-3आमदार खिशात घेऊन फिरायची ताकत आज आण्णा मध्ये आहे.  त्यामळे त्यांचं कौतुक वाटतं.

अण्णांचा आत्तापर्यंतचा जीवनप्रवास एखाद्या चित्रपटातल्या झिरो पासून हिरो बनलेल्या नायकप्रमाणेच खडतर आहे.Anna is Real HERO in real life.आण्णा आज जरी हिरो(नायक)असले तरी कधी काळी या नायकाने खूप हालअपेष्टा सहन केल्या आहेत, तिरस्कार आणि अपमान तर पाचवीलाच पुजलेला. हे सर्व सहन करत तत्कालीन परस्थितीशी दोन हात करत  आण्णा आज या मुक्कामी येऊन पोचले आहेत.आज आण्णा एक व्यक्ती नसून एक संस्था आहे.आयुष्याच्या पूर्वार्धात ज्यांना रक्ताच्या नात्यांचाही आधार मिळाला नाही ते आण्णा शेकडो लोकांचे आधारवड बनले आहेत. या वटवृक्षाच्या मुळ्या जमिनीत घट्ट आहेत. सर्वांना आधार देत  हा वटवृक्ष विस्तारला आहे.


♀"निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारु♀


 गेल्या वर्षी Covid-19च्या महामारीने जगात हाहाकार माजवला होता.प्रत्येक माणसाला दुःखाची झळ देऊन गेलेला हा काळ होता.मी ही याच काळात वडील आणि सासऱ्यांना गमावलं.माझ्या डोक्यावरचे छत्र उडालं होतं. हे दुःख कमी म्हणून की काय 9 वर्षाचा माझा मुलगा अचानक खोकला येत असल्याने परळीतल्या एका दवाखान्यात ऍडमिट करावा लागला पण अचानक त्याची ऑक्सिजन लेव्हल 70-65पर्यंत खाली यायला लागली,मला काही सुधरतं नव्हतं,झटका यायची वेळ.पटकन अण्णांना फोन लावला, आणि cardiac ambulance आणि दवाखान्याची उपलब्धता याविषयी अण्णांना मदत मागितली,10 मिनिटांत डॉक्टरांना बोलून अंबुलन्स आणि डॉक्टर दोन्हींचा व्यवस्था केली. लातूरला गेल्यानंतर  तपासण्या आणि ईलाज सुरु होइपर्यंत रात्रीचे दोन वाजले होते.त्यावेळेपर्यंत जागे राहून अण्णा डॉक्टर आणि मला विचारपूस करत होते,मी सांगितले आण्णा तुम्ही झोपा, मुलाचं बरंय आता,शेवटी पैशाची काही अडचण आहे का?असं विचारलं.पैशाची अडचण नाही म्हटलो.या वेळेला ही मदत माझ्या साठी खूप महत्त्वाची आहे असं बोललो. त्यानंतर एके दिवशी अण्णांनी बोलवल्यानंतर भेटायला गेलो. आपसूकच माझ्या डोळ्यात पाणी आलं.माझे आधारवड गेलेले होते. अण्णांनी माझ्या पाठीवर हात टाकून 'मी आहे ना भैय्या "काळजी करू नका.असं बोलून त्यावेळेला दिलेला आधार लाखमोलाचा वाटला. त्यांचे ते शब्द लाखों रुपयांपेक्षा खरचं खूप जास्त मोठे होते.मुद्दाम मी या प्रसंगाचा उल्लेख इथे करतोय. जर मी अण्णांच्या मनाचा मोठेपणा इथं मांडला नाही तर कृतघ्न ठरेल."काय द्यावे त्यांसी व्हावे उतराई".... "आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने"माझ्या जवळच्या शब्द रत्नांच्या कोंदणात अण्णांच्या व्यक्तित्वाला गुंफण्याचा प्रयत्न करत आहे. covid च्या काळात माणूस माणसाला दुश्मन वाटत होता. अशा परिस्थितीत अहोरात्र जगमित्र कार्यालयात थांबून साहेबांच्या निर्देशानुसार अडचणीत असलेल्या शेवटच्या माणसापर्यंत मदत पोहचविण्याचा काम आण्णांनी केलं.कुणासाठी दवाखान्याची उपलब्धता असेल,कुणासाठी अंबुलन्स असेल,रक्ताची कमतरता असेल, कुणाला आर्थिक अडचण असेल, कुणाला धान्याची अडचण असेल या संबंधी सर्व मदत अण्णांनी तात्काळ पोहचवली.माझ्या पांगरी गावा विषयी बोलायचं झालं तर 'देवदूत'किंवा'चिंतामणी'असचं म्हणावं लागेल. प्रत्येक प्रश्नाला उत्तर फक्त आण्णा. एकही कुटुंब गावात शिल्लक नसेल की,ज्या कुटुंबाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत झाली नाही.गावात कुणाच्याही मुलीचं लग्न असो,अण्णांची मदत असतेच तीही लाखांत.. कुणाचा दवाखाना असो..कोणतीही अडचण असो ..अण्णांची मदत लाखांत. Covid च्या काळात तर कित्येक लोकांचे प्राण अण्णांनी स्वखर्चाने वाचविलेत.  या समाजकार्याच्या पुण्याची शिदोरी त्यांच्या कायम पाठिशी राहील.


💪🏻राजकीय आखाड्यातला वस्ताद...* 💪🏻


आखाडा म्हटलं की समोर कुस्तीच चित्र उभं राहतं.कोणता पठ्ठा कोणत्या डावात निपुण आहे,कोण किती कसरत करतो, कुणाला कोणता अन किती खुराक द्यायचा,कुणाची पकड चांगली आहे, कुणाची क्षमता किती,कुणाची कुस्ती कुणासोबत लावायची अशा अनेक बाबींची इत्यंभूत माहिती जशी आखड्यातल्या उस्तादाला असते,तशीच किंबहुना त्यापेक्षा अधिक परळीच्या राजकीय आखड्यातली माहिती वाल्मीक आण्णांना आहे.कोणता कार्यकर्ता किती ताकतीचा,त्याची क्षमता काय, त्याला काय आणि किती खुराक द्यायचा,कोणता डाव कुणाला शिकवायचा, तो कुणावर टाकायचा?कुणाला किती कसरत करायला लावायची?कुणाला जवळ तर कुणाला लांब ठेवायचं?कुणाची काय पात्रता याची अण्णांना अचूक माहिती आहे एवढंच नव्हे,स्वकीया प्रमाणेच परकीयांचे(विरोधकांचे)बलस्थाने आणि कच्चे दुवे अण्णांना माहिती असल्यामुळे योग्य प्रसंगी प्रसंगावधान राखून योग्य डाव टाकून विरोधकांना किंवा प्रसंगानुरूप स्वकीयांना सुध्दा नामोहरम करण्याचं कसब आत्मसात केलं आहे.मुळातच मुंडे घराण्याच्या तालमीत वाढलेला हा पठ्ठा कसरत,मेहनत करत हार- जीत,मानापमान सहन करून परळीच्या राजकीय आखड्यातल्या अनभिषिक्त उस्ताद बनलाय.

परळीच्या राजकीय सारीपटवरील सोंगट्या, घोडे,हत्ती, उंट यांच्या सरळ, आडव्या, उभ्या, तिरप्या, दुडक्या चालीचा योग्य आणि अचूक वापर करून घेणारा रिंगमास्टर उस्ताद वाल्मीक आण्णाचं.


👑*ना.धनंजय मुंडे साहेबांचा प्रधान-सेनापती* 👑


राज दरबारातली प्रधान आणि सेनापती ही महत्त्वाची दोन वेगवेगळी पद. त्यांचं कामही वेगळं,राज्यकारभार करताना प्रधानाला फार महत्त्व असतं, कारण प्रधानाच्या चातुर्यानं आणि राजाच्या न्याय्य निर्णयाने  कारभार चालतो तर युद्धात सेनापतीला महत्व आहे. सेनापती च्या आदेशानुसार सैन्य लढाई करत.सेनापतीच्या आणि सैन्याच्या शौर्याने लढाया जिंकल्या जातात.राजा सैन्य आणि सेनापती च्या मागे असतो.सेनापती फुटीर,भित्रा आणि लोभी असल्यामुळे इतिहासात बऱ्याच लढाया हरल्याची अनेक उदाहरण आपण वाचली, ऐकली आहेत."वजीर"चित्रपटात विक्रम गोखले सांगतो,की 'राज्याला पराजित करायचं असेल तर त्या राजाचा वजीर आपलासा करायला पाहिजे'.त्यावरुन प्रधानाचं महत्त्व लक्षात येईल. या दोन्ही विचारावरून प्रधान आणि सेनापती या दोन्ही जबाबदाऱ्या किती महत्वाच्या आहेत,हे लक्षात येईल.

   मंत्री महोदय ना.धनंजय मुंडे साहेबांच्या दरबारातल्या प्रधान आणि सेनापती दोन्ही जबाबदाऱ्या आत्तापर्यंत वाल्मीक आण्णांनी लीलया पार पाडलेल्या आहेत.निवडणूक म्हणजे युध्द. निवडणुकीत सेनापती आण्णा सैन्याला रसद, शस्त्र सामुग्री पुरवून वेगवेगळे डावपेच आखून विरोधकांना नामोहरम केलं. तसेच कारभाराच्या बाबतीत सुध्दा अण्णांचा शब्द मा.साहेब सुध्दा राखतात.बहुतांश ठिकाणी अण्णांचा शब्द अंतिम असतो."आण्णा बोले अन जिल्हा हले" अशी सद्यस्थिती आहे.वेगवेगळ्या आघाडीवर वेगळे वेगळे सेनापती असले तरी ते सुद्धा अण्णांच्या आशीर्वादानेच.त्यामुळे वाल्मीक आण्णा प्रधान-सेनापती.


अण्णांनी आतापर्यंत खूप लोकांना आपलंसं केलं. अनेकांचे संसार उभे केले. अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं, प्रेम वाटत गेलं, अणि पुण्य कमवत गेले.प्रेम पेरलं, प्रेमाच्या या बियाण्याला मोठी टपोरी कणसं लागली आहेत.कित्येक पटीने समाजातून प्रेम त्यांना परत मिळत आहे."क्षमा विरस्य भूषणम" या न्यायाने आण्णांनी त्रास झालेल्या लोकांचा आकस धरून बदला घेतला नाही, त्यांना मोठ्या मनाने माफ केलं पण डोक्यात बसलेल्या ना मात्र त्यांची जागा दाखवली.


💥"टुटे मन से कोई खडा नहि होता|

और छोटे मन से कोई बडा नहीं होता|"💥


अण्णांचं मन मोठं असल्यामुळे च अण्णा आज या ठिकाणी आहेत.

 अण्णांचं  आतापर्यंत च आयुष्य चंदनाप्रमाणे झिजवलं असल्याने त्याचा सर्वत्र सुगंध दरवळत आहे.


🌺"आनंद या जीवनाचा

सुगंधापरी दरवळावा

झिजूनी चांदनाने 

दुसऱ्यास मधूगंद द्यावा "🌺


या प्रमाणे अण्णांचं जीवन आहे.

अण्णांचा पूर्वार्ध आणि आज आजची परिस्थिती यांत खूप मोठा  बदल झाला आहे.यावरून मला आठवलं माझे आजोबा नेहमी म्हणायचे की,  "काळ साहाय्य असेल तर मातीचं सोनं, अन काळ साहाय्य नसेल तर सोन्याची माती होते"अण्णांच्या बाबतीत काळ अनुकूल  आहे.विशेष म्हणजे "कराड' नावाला चांगले दिवस आलेले आहेत

येणाऱ्या काळात अण्णांना निरोगी शतायुष्य लाभो,तसेच आण्णा विधानपरिषद आमदार(MLC) होवोत.ही प्रभू वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना.🎂💐💐💐💐💐💐💐

Happy Birthday आण्णा🌹🎂🌹

                        

                     .........         ऍड. श्रीनिवास मुंडे

        उपसरपंच पांगरी(गोपीनाथ गड)

                                 9822089864

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !