MB NEWS-प्रासंगिक लेख:अण्णा!

  अण्णा!.........


ग्रामीण व शहरीभागात आपल्या घरातील ,कुटुंबातील ,गल्लीतील,गावातील आदरणीय किंवा जेष्ट व्यक्तीला अण्णा म्हणुन आदराने बोलतात.

परळी व पंचक्रोशीत अण्णा हे नाव गेली अनेक वर्ष  राजकीय पटलावर उदगारलं जातं आज स्वर्गीय पंडीतअण्णा ह्यात नाही त्यांची ओळख ही संबंध बीड जिल्ह्यात अण्णा म्हणुनच होती.यशस्वी माणसं तयार करण्यासाठी जेष्टांचा साथ व आशिर्वाद असणे आवश्यक असते.अगदी त्याचप्रमाणे राजकारणातील लोकनेत्याला पाठबळ देण्यासाठी स्वर्गीय पंडीतअण्णा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले व मुंडे साहेबांना संबंध महाराष्ट्र व देशभर फिरण्यासाठी तत्पर ठेवले व मतदार संघात स्वर्गीय पंडीतअण्णा व ना.धनंजयजी मुंडे साहेब यांनी उत्तराधिकारी म्हणुन मतदार संघातील व जिल्हयातील जनतेची कामे केली व राज्याच्या राजकारणाला गोपीनाथराव मुंडे साहेबांसारखा नेता दिला.

आज बहुतांशी तीच पुनरावृत्ती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेबांच्या बाबतीत होत आहे. ज्याप्रमाणं राज्याच्या राजकारणात साहेब सक्रीय झाले व राजकारणात एक स्वतंत्र ठसा निर्माण केला त्यामागे मतदार संघातील व जिल्हयातील असंख्य लोकांच्या समस्या दादा,भैय्या व भाऊ वेळप्रसंगी जीव धोक्यात घालुन मतदार संघातील लोकांसाठी अहोरात्र काम करणारे ,साहेबांच्या कामाचं प्रभावीपणे सारथ्य करणारे ,कोणताही कार्यक्रम,सभा व मेळावे कार्यक्रमाचं नियोजन,त्यातील बारकावे तो कार्यक्रम यशस्वीपणे पुर्ण होत नाही तोपर्यंत त्याच ठिकाणी ठाण मांडुन बसणे ते काम पुर्ण करण्यासाठी दिवसरात्र एक करून यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारा परिश्रमार्थी.सकाळी 10:00 ते संध्याकाळी 10:00 पर्यंत साहेबांच्या जगमित्र कार्यालयात तत्परतेने लोकाभिमुख कामे करून साहेबांच्या कामाचा भार कमी करण्याची कुशलता तसेच सर्व पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व लोकांना खुश करणं व त्यांचा रोषही घेणं या दोन्ही बाजु स्वीकारून काम करणं फार जिक्रीचं असतं परंतु ते समर्थपणे पार पाडतात.कौटुंबिक जीवनात आपण घरातील सर्व सदस्यांचं समाधान करु शकत नाहीत मग राजकीय जीवनात अनेक चढउतार असतात तशाच प्रकारे सर्वांचं समाधान होत नसतं तरी सुद्धा अशा परिस्थितीवर मात करून अनेक लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणे म्हणजे  'आदरणीय वाल्मिकअण्णा कराड'होय.

अण्णा शब्दाला पुरक असं काम करणाऱ्या व कायम लोकांत असणाऱ्या या मतदार संघाच्या अण्णास अभिष्टचिंतन.

साहेबांच्या प्रभावशाली व क्रियाशील सारथ्यास जन्मदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!

     अनंत इंगळे 

    सरचिटणीस,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, 

                परळी वैजनाथ 

💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार