इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS- *राजकिशोर (पापा) मोदी यांच्या निवासस्थानी प्रा. प्रविण फुटके यांचा सत्कार संपन्न*

.  *राजकिशोर (पापा) मोदी यांच्या निवासस्थानी प्रा. प्रविण फुटके यांचा सत्कार संपन्न*



अंबाजोगाई (प्रतिनिधी)...


     मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाई च्या वतीने दर्पणदिन आणि मूकनायक दिनानिमित्त स्व. मौलाना मुश्ताक हुसेन यांच्या स्मृतीपित्यर्थ दिल्या जाणाऱ्या  पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या परळी वै. येथील सकाळचे बातमीदार प्रा. प्रवीण फुटके  यांचा अंबाजोगाई चे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजकिशोर पापा मोदी यांच्या निवास्थानी शाल श्रीफळ व वृक्षरोप देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.


    मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाई च्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजातील दुर्बल तथा वंचित घटकांना न्याय मिळवून देत त्यांचे कार्य आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजासमोर मांडणाऱ्या पत्रकारांना नेहमीच गौरविण्यात येते. आपल्या सडेतोड लेखणीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांची उकल करणाऱ्या व समाजातील विविध उपेक्षित घटकांना न्याय मिळावा यासाठी आपली लेखणी झिजवणाऱ्या परळी वै. येथील पत्रकार प्रा.प्रविण फुटके यांना स्व. मौलाना मुश्ताक हुसैन यांच्या स्मृतीपित्यर्थ दिला जाणारा  पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजकिशोर पापा मोदी यांच्या निवासस्थानी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ तसेच वृक्षांचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दैनिक सकाळचे अंबाजोगाई येथील बातमीदार प्रशांत बर्दापूरकर, दिव्य लोकप्रभाचे उपसंपादक आनंत कुलकर्णी, दैनिक तरुण भारतचे प्रतिनिधी श्रीराम लांडगे, नगरसेवक सुनील व्यवहारे, पत्रकार रानभरे, सूर्या प्रतिष्ठानचे निलेश देशमाने  विजयकुमार रापतवार आदिंसह मान्यवरांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!