पोस्ट्स

MB NEWS-परळी शिवसेनेच्या वतीने अंधेरी पोटनिवडणूक विजयाचा फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव

इमेज
   अंधेरीत पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंनी भगवा फडकवला Video News पहाण्यासाठी 👇👇 खालील ओळींवर क्लिक करा....  ● *अंधेरीचा विजय-परळीत फटाके | उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची घोषणाबाजी.* _#mbnews # subscribe #like #share #comments_ परळी शिवसेनेच्या वतीने अंधेरी पोटनिवडणूक विजयाचा फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव मशाल पेटली; अंधेरी जिंकली - अभयकुमार ठक्कर परळी वैजनाथ प्रतिनिधी  अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या नव्या चिन्हासह पहिल्याच निवडणुकीमध्ये  दणदणीत विजय मिळविला आहे. ऋतुजा लटके या विक्रमी  मतांनी विजयी झाल्या आहेत. याबद्दल परळी शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू  ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. वाचा:  ● *अंधेरी पूर्व पोटनिवडणुक : ऋतुजा लटके विजयी दोन नंबरची मते नोटाला* परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टावर चौक येथे आज रविवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू  ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली व युवा

MB NEWS-अंधेरी पूर्व पोटनिवडणुक: ऋतुजा लटके विजयी दोन नंबरची मते नोटाला

इमेज
  अंधेरी पूर्व  पोटनिवडणुक: ऋतुजा लटके विजयी दोन नंबरची मते नोटाला मुंबई – अंधेरी पूर्व मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके या विजयी झाल्या आहेत.लटके याना 52 हजार मते मिळाली तर दुसऱ्या पसंतीची मते नोटा ला मिळाली आहेत.भाजपने या निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतली होती. शिवसेनेचे आ रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्व मतदार संघात पोट निवडणूक जाहीर झाली होती.भाजपने मुरजी पटेल यांना मैदानात उतरवल्याने चुरस वाढली होती.मात्र ऐनवेळी भाजपने माघार घेतल्याने निवडणूक एकतर्फी होणार हे स्पष्ट झाले होते. या निवडणुकीत केवळ 31 टक्के मतदान झाले होते.त्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.रविवारी मतमोजणी सुरू झाल्यानंतर ऋतुजा लटके यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली.13 व्या फेरीअखेर त्यांना 52 हजार 946 मते मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर मतदारांनी नोटा ला पसंती दिली.

MB NEWS-राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा - दीपक सिरसाट

इमेज
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा - दीपक सिरसाट परळी वैजनाथ/ प्रतिनिधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सात नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात दाखल होत आहे. काँग्रेस आयचे  सिद्धार्थ हत्तेआंबेरे  ,प्रदेशअध्यक्ष अनु .जाती विभाग महाराष्ट्र, ‌  बीड जिल्हाध्यक्ष  दत्ताभाऊ कांबळे अनु जाती विभाग महाराष्ट्र, बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख परळी शहराध्यक्ष सय्यद आणि उर्फ बहादुर भाई यांच्या नेतृत्वाखाली परळी शहर व पंचक्रोशीतील हजारो काँग्रेस प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन  शहराध्यक्ष  दीपक सिरसाट.अनु. जाती. विभाग. परळी. वै.   यांनी केले आहे. Click-●  राज्यसेवा (पूर्व) परीक्षा – २०२२ चा निकाल जाहीर; मुख्य परीक्षा २१ ते २३ जानेवारी दरम्यान होणार महागाई बेरोजगारी संविधान बचाव लोकशाही वाचवा सार्वजनिक उद्योगाचे खाजगीकरण थांबवा आदिवासी अनुसूचित जाती महिला वरील अत्याचार थांबवा अल्पसंख्याक समाजावर  अत्याचार थांबवा नफरत सोडा भारत जोडा हा संदेश घेऊन मा.खा.राहुलजी गांधींनी हे लक्षवेधी यात्रा कन्याकुमारी ते श्रीनगर पर

07 नोव्हेंबरला शिवा अ.भा.वीरशैव युवक संघटनेच्या 27 वा राज्यव्यापी वार्षिक मेळावा

इमेज
  कपिलधार येथे 07 नोव्हेंबरला शिवा अ.भा.वीरशैव युवक संघटनेच्या 27 वा राज्यव्यापी वार्षिक मेळावा वीरशैव समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-अनिल अष्टेकर यांचे आवाहन *परळी वैजनाथ / प्रतिनिधी* शिवा अखिल भारतीय शिवा वीरशैव युवक सघटनेच्या वतीने प्रतिवर्षी कार्तिक शुध्द पौर्णिमेच्या निमित्त होणार्‍या यात्रेमध्ये श्रीक्षेत्र कपीलधार, ता. जि. बीड येथे भव्य राज्यव्यापी वार्षिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी राज्यभरातून सुमारे 4 ते 5 लाख कार्यकर्ते व भाविक उपस्थित राहतात. शिवा संघटनेच्या मागणीनुसार श्रीक्षेत्र कपीलधार येथे पंढरपुर प्रमाणेच सन 2002 पासुन महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासकीय महापुजा करण्यात येत आहे. दि. 19 नोव्हेंबर 2002 रोजी पहीली शासकीय महापुजा संपन्न झाल्यानंतर कार्तिक शुध्द पौर्णिमेच्या यात्रेनिमीत्त प्रतिवर्षी शासकिय महापुजा संपन्न होत आहे. यंदा 21 वी शासकीय महापुजा आणि शिवा संघटनेचा 27 वा राज्यव्यापी वार्षिक मेळावा मोठया उत्साहात संपन्न होणार असून या कार्यक्रमास परळी तालुका व शहरातील सर्व वीरशैव समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवा

MB NEWS-लोकसेवा आयोगाकडून सरळसेवा भरतीकरिता १ व २ डिसेंबरला चाळणी परीक्षा

इमेज
  लोकसेवा आयोगाकडून सरळसेवा भरतीकरिता १ व २ डिसेंबरला चाळणी परीक्षा मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीकरिता  विविध संवर्गासाठी  संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा १ व २ डिसेंबर २०२२ रोजी  घेण्यात येणार आहे. परीक्षा योजना, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्याप्रमाणे राहणार आहे. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांची कार्यपद्धत, परीक्षेचे ठिकाण, दिनांक इत्यादी तपशील स्वतंत्रपणे अवगत करण्यात येणार आहे. विविध विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी गट अ, प्रशासकीय अधिकारी गट ब व सहाय्यक प्रशासन अधिकारी गट ब संवर्ग करिता एकत्रितरीत्या चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. एकत्रित चाळणी परीक्षा मधील गुणांच्या आधारे अर्ज केलेल्या संबंधित संवर्गाच्या निवडीसाठी गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांचा विचार करण्यात येईल, तसेच एकत्रित परीक्षेमधील गुणांच्या आधारे पुढील निवड प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव दक्षता, धोरण व संशोधन यांनी सांगितले आहे. या परीक्षेची माहिती उद

MB NEWS- ‘यूपीएससी’ परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन; प्रवेश प्रक्रिया सुरु

इमेज
  ‘यूपीएससी’ परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन; प्रवेश प्रक्रिया सुरु मुंबई,  : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज २५ नोव्हेंबरपर्यंत भरता येणार असल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.के.एस.जैन यांनी दिली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (YASHADA) संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (एसीईसी), पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) संचलित सावित्रीबाई फुले ॲकॅडमी, पुणेमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२३ साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरिता सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज २५ नोव्हेंबरपर्यंत भरता येतील.

MB NEWS-राज्यसेवा (पूर्व) परीक्षा – २०२२ चा निकाल जाहीर; मुख्य परीक्षा २१ ते २३ जानेवारीदरम्यान होणार

इमेज
  राज्यसेवा (पूर्व) परीक्षा – २०२२ चा निकाल जाहीर; मुख्य परीक्षा २१ ते २३ जानेवारीदरम्यान होणार मुंबई दि. ४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २१ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्यसेवा (पूर्व) परीक्षा-२०२२ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.मुख्य परीक्षा २१, २२ व २३ जानेवारी, २०२३ रोजी घेण्यात येणार असल्याचे आयोगाचे उपसचिव (परीक्षोत्तर – राजपत्रित परीक्षा)यांनी कळविले आहे. पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे ६२३ पदांसाठी १० हजार २०० उमेदवार मुख्य परीक्षेच्या प्रवेशाकरिता पात्र ठरले आहेत . पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांन

MB NEWS-कलावंतांसाठी महत्वपूर्ण:राज्य कला प्रदर्शनासाठी २२ नोव्हेंबरपर्यंत कलाकृती सादर करण्याचे आवाहन

इमेज
  कलावंतांसाठी महत्वपूर्ण:राज्य कला प्रदर्शनासाठी २२ नोव्हेंबरपर्यंत कलाकृती सादर करण्याचे आवाहन मुंबई, दि. 4 :- 62 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (व्यावसायिक कलाकार विभाग) जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शात चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या कलावंतांकडून ऑनलाईन कलाकृती मागविण्यात येत आहेत.    या प्रदर्शात पारितोषिकपात्र कलाकृतींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांप्रमाणे एकूण 15 पारितोषिके देण्यात येणार आहेत. इच्छुक कलावंतांनी दि. 07 ते 22 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत कला संचालनालयाच्या  www.doa.maharashtra.gov.in या संकेतस्थाळावर ऑनलाईन स्वरुपात कलाकृती सादर कराव्यात, असे आवाहन प्र.कला संचालक, कला संचालनालय, मुंबई यांनी केले आहे.

MB NEWS-आरोग्य विभाग:अर्ज मागवले,मुलाखती झाल्या,काहीजण रुजुही झाले अन् भरती प्रक्रियेला स्थगिती

इमेज
  लोखंडी सावरगाव दवाखाना : अर्ज मागवले,मुलाखती झाल्या,काहीजण रुजुही झाले अन् भरती प्रक्रियेला स्थगिती परळी वैजनाथ, प्रतिनिधी......              TELE MANAS (Tele mental Health Assistance & Networking across State) कार्यक्रम वृध्यत्व आरोग्य व मानसीक आजार केंद्र लोखंडी सावरगाव, अंबाजोगाई येथे कंत्राटी स्वरुपात १ ) Assistant Professor / Sr.Consultant 2 ) Senior Resident / Consultant, 3 ) Clinical Psychologist / PSW/Psychiatric Nurse 4 ) Project Co-Ordicator 5 ) Data Entry Operator 6 ) Counsellor 7) Attendants या पदाची जाहिरात राज्य स्तरावरून प्रसिध्द करण्यात आलेली होती. प्रसिध्द जाहिराती अंती उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून सदर अर्जाची छाननी करण्यात येऊन पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत.          तसेच काहि पदाच्या उमेदवारांना ( १ ) Assistant Professor / Sr. Consultant 2) Senior Resident / Consultant, 3) Clinical Psychologist / PSW / Psychiatric Nurse 4 ) Project Co-Ordicator 5) Counsellor ) नियुक्ती आदेश ही देण्यात आले आहेत. तसेच काहि उमेदवार सदर पदावर रुजू हि झाले

MB NEWS-घरफोडीचे सत्र सुरूच :परळीतील माधवबाग मध्येही घरफोडी

इमेज
  घरफोडीचे सत्र सुरूच : परळीतील माधवबाग मध्येही घरफोडी परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        परळी शहर व तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून हनुमान मंदिरातील दानपेट्यांच्या चोरीनंतर बँक कॉलनीतील मोठी घरफोडी व त्यानंतर आता परळीतील माधवबाग परिसरातही घरफोडीची घटना घडल्याचे पुढे आले आहे. या घरफोडीत सोन्याचे दागिने  चोरट्याने पळविले आहेत .                 माधवबाग परिसरात राहणारे फिर्यादी हरिदास रामदास बडे वय 50 यांच्या घरी दिनांक 3 रोजी मध्यरात्री घरामध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश केला व घरातील सोन्याचे दागिने अंदाजे किंमत 47 हजार 350 रुपये चोरून नेला. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार होळंबे हे करत आहेत.      दरम्यान परळी शहर व परिसरातील वाढत्या चोऱ्याचे सत्र भीतीदायक बनले असून कोणत्याही चोऱ्याचा तपास लागत नसल्याने व चोरटे पकडण्यात पोलिसांना यश येत नसल्याने या चोऱ्यांचे सत्र वाढत चालल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चोरीच्या घटनेतील आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान परळी पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
इमेज
 श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयात "मराठी रंगभूमी दिन" साजरा सिरसाळा (वार्ताहार):-   येथील श्री पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालयात नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने दि. 5 नोव्हेंबर-2022 रोजी मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एच पी कदम यांच्या हस्ते रंगदेवता नटराज प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले. या प्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. एस. बी. फुलारी, डॉ. गणपत  गटी, विभागप्रमुख डॉ. सी. बी. कणसे हे उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे प्रस्ताविक नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ सी बी कणसे यांनी केले. तर प्रमुख वक्ते प्रा. एस.बी. फुलारी यांनी मराठी रंगभूमीचा उदय व विकास तसेच मराठवाड्याची रंगभूमी याविषयी उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ एच पी कदम  यांनी केला. प्रसंगी बोलताना मराठी रंगभूमी व तिचा सांस्कृतिक वारसा प्राचीन असून मराठी रंगभूमी ही समृद्ध असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मराठी रंगभूमीने सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय मागासलेपण दूर केले. तसेच नाट्यशास्त्र विभागाचे ग्रामीण भागात कलेची जाणिव आणि जागृत

MB NEWS-डाॅ.शालिनी कराड यांना मातृशोक

इमेज
  डाॅ.शालिनी कराड यांना मातृशोक कराड हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. शालिनीताई कराड यांच्या मातोश्री बाळूताई शामराव गदळे यांना शुक्रवारी संध्याकाळी रात्री ११ च्या सुमारास देवाज्ञा झाली. मृत्युसमयी त्या ६८ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या, आजाराशी झुंजत असतांना त्यांची प्राणज्योत मालवली.  शिक्षण महर्षी स्व. शामराव  गदळे यांच्या पत्नी आणि डॉ. शालिनीताई कराड यांच्या मातोश्री बाळूताई शामराव गदळे यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी रात्री निधन झाले. धार्मिक आणि सामाजिक कार्याची बाळूताई यांना प्रचंड आवड होती. स्व. शामराव दादा गदळे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्याला त्यांनी नेटाने पुढे नेले. अतिशय शांत आणि संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून त्या सुपरिचित होत्या. बाळुताई यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगी डॉ. शालिनीताई कराड, बीड येथील दीप हॉस्पिटलचे संचालक डॉ. शशिकांत व इंजि. शरद गदळे अशी दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. गदळे आणि कराड परिवारावर कोसळलेल्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

MB NEWS-#जोशींचीतासिका:✍️अनिरुद्ध जोशी>>>>>How's the JOSH?

इमेज
  How's the JOSH? This time not its not HIGH, today its deliverd by LITTLE ----------------------------------------------------- # जोशींचीतासिका:✍️अनिरुद्ध जोशी -----------------------------------------------------         को णाला कमी कधीच समजू नका कारण काळ हा सगळ्यात बलवान असतो. आज काही तासांपूर्वी त्याची जगाला प्रचिती आलीचं असेल. आयर्लंड या क्रिकेट जगतातील लिंबू टीमच्या जॉश लिटिल या गोलंदाजांने विश्वचषकाच्या प्रबळ दावेदार असलेल्या न्यूझीलंड संघाविरुद्ध अखेरच्या षटकात हॅटट्रिक घेतली.  T20 विश्वचषक इतिहासात हा कारनामा करणारा जॉश लिटिल हा जगातील केवळ दुसरा गोलंदाज आहे. मला त्यांचे नावं मनापासून आवडलं कारण ते माझ्या आडनावाशी साधर्म्य असल्यामुळे. पण, त्यात एक गंमत वाटली त्याचा नावात दुसरा शब्द आहे "लिटिल" आहे. थोडक्यात, 'छोटा पॅकेट बडा धमाका' होतोच मग ते क्षेत्र कोणतेही असो. You never know when what and how can happen. पण, एकदा काळ चांगला झाला की फक्त कोणत्याही यशस्वी व्यक्तीने वि. स. खांडेकर यांनी सांगितलेली एक गोष्ट नक्की लक्षात ठेवावी. हे उन्मत्त सागरा उगीच गर्

MB NEWS-विश्वनाथ रामभाऊ मिसाळ यांचे निधन

इमेज
  विश्वनाथ रामभाऊ मिसाळ यांचे निधन परळी,(प्रतिनिधी):- शिवाजी नगर येथील रहिवाशी विश्वनाथ रामभाऊ मिसाळ यांचे दि.3 नोव्हेंबर 2022 रोजी अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 65 वर्षे होते. स्वामी रामानंद तीर्थ रुणालय अंबाजोगाई येथे उपचारा दरम्यान रात्री 10 वा. त्यांची प्राणज्योत मालवली.       त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा भरगच्य परिवार आहे. दि.4 नोव्हेंबर 2022 सकाळी 11 वा. परळी येथील  स्मशानभुमी येथे त्यांच्या पार्थिव देहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मिसाळ कुटुंबीयावर कोसळलेल्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.   राख सावडण्याचा विधि विश्वनाथ रामभाऊ मिसाळ यांचा राख सावडण्याचा विधी आज शनिवार दि.5 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 8 वा. होणार आहे.

MB NEWS-पत्रकार महादेव गित्ते यांना पुरस्कार: जानिमिया कुरेशी यांनी केला सत्कार

इमेज
  पत्रकार महादेव गित्ते यांना पुरस्कार: जानिमिया कुरेशी यांनी केला सत्कार  परळी : निर्वाण फाउंडेशनच्या वतिने दिला जाणारा पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दलचा सावित्रीज्योती हा राज्यस्तरीय पुरस्कार महादेव गित्ते (पत्रकार) यांना मिळाल्याबद्दल उपासभापती जनिमियाँ कुरेशी यांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी विशवनाथ गायकवाड, विष्णुपंत देशमुख, निळंकठ दराडे, गिरी, दुबे, बळवत, शेख जावेद, निवृतीअप्पा, आदी उपस्थित होते

MB NEWS-महत्वाची बातमी: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ

इमेज
  महत्वाची बातमी: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ पुणे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या परीक्षा देऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत, तर दहावीच्या विद्यार्थ्यांना 25 नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्क देऊन अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. फेब्रुवारी- मार्च 2023 च्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणार्‍या नियमित, व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (आयटीआय) ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणार्‍या विद्यार्थ्यांचे अर्ज दिलेल्या मुदतीत शाळा, महाविद्यालयांमार्फत ऑनलाइन पद्धतीने “www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर भरायचे आहेत. बारावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज करण्याची मु

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

इमेज
  पंकजाताई मुंडे यांनी घेतली  मुख्यमंत्र्यांची भेट मतदारसंघातील विविध विकास कामांबाबतही झाली चर्चा वैद्यनाथ मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, कॉरिडॉरसाठी मिळाला सकारात्मक प्रतिसाद परळी वैजनाथ ।दिनांक ०४। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी परळी मतदारसंघातील विविध विकास कामासंदर्भात   काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. वैद्यनाथ मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडयास गती देऊन उज्जैनच्या धर्तीवर वैद्यनाथ काॅरिडाॅर निर्माण करून विकास करावा अशी मागणी त्यांनी केली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले.    पंकजाताई मुंडे यांनी गुरूवारी मुख्यमंत्री शिंदे यांची निवासस्थानी भेट घेतली. आमदार माधुरीताई मिसाळ हया देखील त्यांच्यासमवेत होत्या. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिराचा सर्वांगीण विकास आणि भाविक भक्तांची सोय होण्याच्या दृष्टीने मंदिर परिसराचा विकास आराखडा मंजूर होणे आवश्यक आहे. यापूर्वी सन २०१९ मध्ये १३३  कोटी ५८ लाख रूपयांचा विकास आराखडा मंजूर झालेला होता, त्याअंतर्गत ३५ कोटीचा निधी पुरवणी मागणीद्वारे मंजूरही झाला प

MB NEWS-२० कोटीचे कर्ज मिळवून देण्यासाठी परळीतील डॉक्टरला 2 कोटीचा गंडा

इमेज
  २० कोटीचे कर्ज मिळवून देण्यासाठी परळीतील डॉक्टरला 2 कोटीचा गंडा बीड,  प्रतिनिधी...       तुमच्या दवाखान्याला फायनान्स कंपनीकडून वीस कोटीचे कर्ज मिळवून देतो असे म्हणत गुजरात राज्यातल्या काही भामट्यांनी परळी शहरातील डॉ. गायकवाड यांना चक्क 2 कोटीचे चंदन लावले. कर्जापायी त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळण्यात आले. याप्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे गायकवाड यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली.        रवींद्र माणीकराव गायकवाड (वय 51 वर्षे) रा. वल्लभनगर शिवाजी चौक, परळी यांचे परळीमध्ये कृष्णाई नावाचे हॉस्पीटल आहे त्यांचे हॉस्पिटल त्यांना अत्याधुनिक करायचे होते, त्यासाठी त्यांनी विविध बँकेमध्ये कर्ज प्रस्ताव दाखल केले होते. मात्र बँकेकडून त्यांचे प्रस्ताव मंजूर झाले नाहीत. डॉ. गायकवाड यांना 9879966666 या क्रमांकावरून फोन आला व संबंधीतांनी डॉ. गायकवाड यांची चौकशी केली. भुज कच्छ फायनान्स अॅण्ड इन्व्हेस्टमेंट पाटनर फर्म भुज राज्य गुजरात येथून आम्ही कर्ज देवू असा तो व्यक्ती म्हणाला. या आमिषाला डॉ. बळी पडले. कर्ज तुम्हाला असं मिळणार

MB NEWS- श्री.दिनकरराव मुंडे (गुरुजी) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कन्या विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषा किरण गित्ते यांनी व्यक्त केलेल्या भावना... शब्दबद्ध : अभिष्टचिंतन लेख>>>आमचे कुटुंबवत्सल 'अण्णा'

इमेज
  आण्णांचा आज ७४ वा वाढदिवस आणि अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण ! 🌹 अ ण्णा मागील ५० वर्षांपासून आमच्या मोठ्या कुटु्ंबाचा आधारवड. आमचे आजोबा 'साधू नारायण' म्हणून पंचक्रोशी मध्ये विख्यात होते. त्यांच्या अध्यात्मिक संस्कारात अण्णांची जडणघडण झाली. अण्णांनी शिक्षकाची नोकरी पत्करली. कमी वयातच कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी लागली ती आजपर्यंत जबाबदारीने पाळतात. नातीगोती कशी जपावीत हे अण्णांकडून शिकावे. इतक्या वयातही सगळ्या बहिणींकडे राखी पौर्णिमेला, भाऊबीजेला आवर्जून जातात. खूप लांबपर्यंतची नाती अण्णा लक्षात ठेवून सुख-दुःखात जवळीक साधतात.  मुंडे साहेब आणि अण्णा चुलत बंधू, शाळा कॉलेज मध्ये सोबत आणि अतिशय जवळचे मित्र. स्व मुंडे साहेबांना राजकीय क्षेत्रात साथ देण्यासाठी क्षणाचाही विचार न करता अण्णांनी सरकारी नोकरी सोडली व अतिशय धावपळीचे जीवन पत्करले. मुंडे साहेब विरोधी पक्ष नेते असतांना सहज नांदेडपर्यंत सोबत गेले आणि मुंडे साहेब म्हणाले, 'चला माझ्यासोबत मुंबईला'. अण्णांजवळ शिल्लक कपडेही नव्हते. मुंबईत पोहचल्यास मुंडे साहेबांनी दोन ड्रेस घ्यायला लावले आणि, 'आजपासून तुम्ही माझे स

MB NEWS-वैद्यनाथ मंदिरात गर्दी तर जगमित्रनागा मंदिर येथे मनमोहक श्रंगारपुजा

इमेज
  कार्तिकी  एकादशी पर्वकाळात भाविकांची श्रद्धा ओसंडली ! 🕳️ वैद्यनाथ मंदिरात  गर्दी तर जगमित्रनागा मंदिर येथे मनमोहक श्रंगारपुजा परळी वैजनाथ, प्रतिनिधी ..           परळीत कार्तिकी  एकादशी  पर्वकाळात भाविकांची श्रद्धा ओसंडली असल्याचे पहावयास मिळाले.त्याचप्रमाणे टाळ मृदंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात काही दिंड्याही वैद्यनाथ नगरीत दाखल झाल्या. ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.         एकादशी  म्हटलं की परळीचा मंदिर परिसर भाविकांच्या उपस्थितीने फुलून जातो. वैद्यनाथ मंदिर,संत जगमित्रनागा मंदिर आदींसह शहरातील मंदिरात दर्शनासाठी परळीत पंचक्रोशीतील हजारो भाविक येतात.आज वैद्यनाथ मंदिर, संत जगमित्रनागा मंदिर, विठ्ठल मंदिर अंबेवेस, जाजुवाडी विठ्ठल मंदिर आदी परिसरात  गर्दीचे हे चित्र बघायला मिळाले.  एकादशी निमित्त आज सकाळपासुन परळी शहरातील वैद्यनाथ मंदिर, विठ्ठल मंदीर,संत जगमिञनागा मंदिर, गणेश मंदिरात  दर्शन घेतले.  मंदिर परीसरात सकाळपासुन गर्दी झाल्याचे दिसून आले.   Click &watch: ● *पहा: कार्तिकी एकादशीनिमित्त संत जगमित्रनागा मंदिरात भाविकांची रीघ | विशेष श्रृ

MB NEWS-🕳️ वैद्यनाथ मंदिरात गर्दी तर जगमित्रनागा मंदिर येथे मनमोहक श्रंगारपुजा

इमेज
  कार्तिकी   एकादशी   पर्वकाळात भाविकांची श्रद्धा ओसंडली ! 🕳️ वैद्यनाथ मंदिरात  गर्दी तर जगमित्रनागा मंदिर येथे मनमोहक श्रंगारपुजा परळी वैजनाथ, प्रतिनिधी ..           परळीत कार्तिकी   एकादशी  पर्वकाळात भाविकांची श्रद्धा ओसंडली असल्याचे पहावयास मिळाले.त्याचप्रमाणे टाळ मृदंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात काही दिंड्याही  वैद्यनाथ  नगरीत दाखल झाल्या. ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.          एकादशी  म्हटलं की परळीचा मंदिर परिसर भाविकांच्या उपस्थितीने फुलून जातो.  वैद्यनाथ  मंदिर,संत जगमित्रनागा मंदिर आदींसह शहरातील मंदिरात दर्शनासाठी परळीत पंचक्रोशीतील हजारो भाविक येतात.आज  वैद्यनाथ  मंदिर, संत जगमित्रनागा मंदिर, विठ्ठल मंदिर अंबेवेस, जाजुवाडी विठ्ठल मंदिर आदी परिसरात  गर्दीचे हे चित्र बघायला मिळाले.   एकादशी   निमित्त  आज सकाळपासुन परळी शहरातील  वैद्यनाथ  मंदिर, विठ्ठल मंदीर,संत जगमिञनागा मंदिर, गणेश मंदिरात  दर्शन घेतले.  मंदिर परीसरात सकाळपासुन गर्दी झाल्याचे दिसून आले.   Click &watch:  ● *पहा: कार्तिकी एकादशीनिमित्त संत जगमित्रनागा मंदिरात भाविकांच

MB NEWS-मंदिरातील चोरीनंतर आता परळीत घरफोडी करुन अकरा लाखांची चोरी

इमेज
  मंदिरातील चोरीनंतर आता परळीत घरफोडी करुन अकरा लाखांची चोरी परळी वैजनाथ, प्रतिनिधी        परळी शहर व तालुक्यात चोर्यांचा सुळसुळाट सुरूच आहे. दररोज चोऱ्यांच्या घटना घडतच आहेत. परळी शहरातील हनुमान मंदिरातील दोन दान पेट्या फोडून चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच आता शहरातील बँक कॉलनी भागात घरफोडीची मोठी घटना घडली आहे. या घटनेत 11 लाखापेक्षा अधिक रकमेचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. वाढत्या चोऱ्या हे परळी पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.       परळी शहरातील बँक कॉलनी भागात राहणाऱ्या एका हॉटेलचालकाच्या घरातील कपाटातून ११ लाख ८७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम, टीव्ही, दुचाकी असा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ३ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँक कॉलनी भागात राहणारे हॉटेल व्यावसायिक बाबासाहेब नानाभाऊ मुंडे हे बाहेरगावी आपल्या कुटुंबासह गेले होते. घरात कोणीही नव्हते. याचा फायदा घेत त्यांच्या घराचा दरवाजा दोन नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्याने तोडून आत प्रवेश केला. घरातील ११ लाख ८७ हजार रुपय

MB NEWS-संत ,महंतांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण

इमेज
  अपघातात ठार झालेल्या वारकऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत द्या----- बब्रुवान शेंडगे  वडवणी (प्रतिनिधी):- कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी येथील वारकरी कार्तिकी यात्रेचे निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या पायी दिंडीत पाठीमागून येत असलेली टाटा नेक्सन कार घुसत्यांनी दिंडीतील सहा वारकरी जागीच ठार झाली तर  उपचार चालू असताना एका वारकऱ्याचे निधन झाले अशी एकूण सात भाविक ठार झाली असून यात एका चिमुकल्याचही समावेश आहे,ही दुर्दैवी घटना  31 ऑक्टोंबर रोजी घडले आहे, वारकऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मयतांच्या वारसांना 5 लाख रुपये व जखमींना 50 हजार रुपये तात्काळ आर्थिक मदत द्या अशी मागणी  जगद्गुरु संत तुकाराम महाराज सामाजिक आर्थिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बब्रुवान शेंडगे पाटील यांनी केली आहे.        जठारवाडी ता. करवीर जिल्हा कोल्हापूर येथील वारकरी कार्तिक यात्रेच्या निमित्ताने पंढरपूरला पायी  जात असताना भरधाव वेगात असलेली कार दिंडीत घुसली यात सहा वारकरी जागीच ठार झाले तर एका वारकऱ्यावर उपचार सुरू असताना आपले प्राण गमावावे लागले, या मृतामध्ये एका चिमुकल्याचा  समावेश आ

MB NEWS-मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

इमेज
  परळीची 'सुवर्णकन्या' श्रद्धा गायकवाड नागरी सत्कार नियोजन ; महत्वपूर्ण व्यापक बैठकीचे आयोजन • मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....            परळीसाठी अतिशय अभिमानाची बाब म्हणजे परळीची कन्या कुमारी श्रद्धा गायकवाड हिने 36 व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असून फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिंपिक साठी भारतीय संघात तिची निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ऑलम्पिक साठी निवड होणारी परळीतील ती पहिलीच खेळाडू ठरली आहे. परळी साठी ही अत्यंत गौरवाची बाब ठरली आहे. तिचा परळीकरांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे.या नागरी सत्कार सोहळ्याचे नियोजन ठरविण्यासाठी एका व्यापक बैठकीचे आयोजन शुक्रवार दि.4 रोजी करण्यात आले आहे.       शुक्रवार दि.4 रोजी सकाळी 11 वा .श्रद्धा गायकवाड नागरी सत्कार नियोजन बैठक लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे होणार आहे.  अहमदाबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत परळीच्या  कु.श्रध्दा रविंद्र गायकवाड हिने "स्केट बोर्डिंग" या स्पर्धेत सुवर्णपदक

MB NEWS-संवेदनशील वाहक व चालकाच्या भूमिकेचे सर्वस्तरातून कौतुक !

इमेज
कार्यतत्पर वाहक – चालकाच्या सतर्कतेमुळे वाचले एक वर्षाच्या बाळाचे प्राण  ! बस थेट नोनस्टॉप हॉस्पिटलमध्ये नेली ; संवेदनशील वाहक व चालकाच्या भूमिकेचे सर्वस्तरातून कौतुक ! परळी(प्रतींनिधी)रत्नागिरी आगाराची बस अंबाजोगाई मार्गे बीड ला जात असताना नेकनूर ते बीड प्रवास करताना एका महिलेच्या 1 वर्षाच्या लहान मुलाला ताप जास्त असल्याने ह्रदय विकाराचा झटका आला होता,त्यावेळी रत्नागिरी आगारातील कर्तव्यदक्ष वाहक महादेव फड यांच्या लक्षात हे गोष्ट येताच त्यांनी चालकाला बस कुठेच न थांबवता थेट हॉस्पिटलमध्ये घेण्यास सांगितले,त्यामुळे मुलाला तातडीचा उपचार मिळाला जर 10 मिनिटे उशीर झाला असता तर काही उपयोग नव्हता असे डॉक्टरांनी सांगितल्याचे त्या मुलाचे बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेले पावडील विशाल कदम यांनी सांगितले.      याबाबत सविस्तर वृत्त की,रत्नागिरी आगाराची बस क्रमांक 2995 ही बस अंबाजोगाई – केज मार्गे बीडला जात असताना नेकनूर येथून पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेले विशाल कदम यांच्या पत्नी बस मधून आपल्या 1 वर्षाच्या लहान मुलासह प्रवास करत होत्या,तेव्हा अचानक मांजरसुंभा येथे त्या लहान मुल