MB NEWS-संत ,महंतांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण

 अपघातात ठार झालेल्या वारकऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत द्या----- बब्रुवान शेंडगे


 वडवणी (प्रतिनिधी):- कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी येथील वारकरी कार्तिकी यात्रेचे निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या पायी दिंडीत पाठीमागून येत असलेली टाटा नेक्सन कार घुसत्यांनी दिंडीतील सहा वारकरी जागीच ठार झाली तर  उपचार चालू असताना एका वारकऱ्याचे निधन झाले अशी एकूण सात भाविक ठार झाली असून यात एका चिमुकल्याचही समावेश आहे,ही दुर्दैवी घटना  31 ऑक्टोंबर रोजी घडले आहे, वारकऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मयतांच्या वारसांना 5 लाख रुपये व जखमींना 50 हजार रुपये तात्काळ आर्थिक मदत द्या अशी मागणी  जगद्गुरु संत तुकाराम महाराज सामाजिक आर्थिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बब्रुवान शेंडगे पाटील यांनी केली आहे.

       जठारवाडी ता. करवीर जिल्हा कोल्हापूर येथील वारकरी कार्तिक यात्रेच्या निमित्ताने पंढरपूरला पायी  जात असताना भरधाव वेगात असलेली कार दिंडीत घुसली यात सहा वारकरी जागीच ठार झाले तर एका वारकऱ्यावर उपचार सुरू असताना आपले प्राण गमावावे लागले, या मृतामध्ये एका चिमुकल्याचा  समावेश आहे, ही दुर्दैव घटना 31 ऑक्टोंबर रोजी घडले असून मतांमध्ये पाच महिला, एक पुरुष व एक मुलगा यांचा समावेश आहे, या भीषण अपघातात आणखीन पाच वारकरी गंभीर  जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती फक्त होत आहे ,अपघातात ठार झालेल्या वारकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत द्या अशी मागणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज सामाजिक अध्यात्मिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बब्रुवान शेंडगे पाटील यांनी केले असून या संदर्भात बोलताना ते म्हणाले की वारकऱ्यांच्या संदर्भात शासनाने आजवर कधीच गांभीर्याने घेतले नाही, महाराष्ट्र ही संतांची भुमी आहे, येथे  शेकडो दिंड्या निघतात, हिंदू धर्म जोपासणाऱ्या वापरकर्त्यांना शासनाचे कवच मिळाले पाहीजे, आपण स्वतः जातीने मुख्यमंत्री यांची भेट घेणार असून त्यांना वारकऱ्यांना मदत करण्यासाठी विनंती करणार असुन, मृत वारकऱ्यांच्या वारसांना व जखमींना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत  मिळवुन देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार  असे ते म्हणाले.

संत ,महंतांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण

----------------------------------------------------

पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांवर काळाने घाला घातला ,भीषण अपघातात ठार झालेल्या वारकऱ्यांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज सामाजिक व आध्यात्मिक प्रतिष्ठानच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, यावेळी अमृत आश्रम स्वामी नवगण राजुरी, लक्ष्‍मण महाराज मेंगडे, चैतन्य महाराज कबीर आळंदी देवाची, पंडित महाराज क्षीरसागर आळंदी देवाची, ह भ प बाळासाहेब मोहिते पाटील परभणी , जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे बब्रुवांनजी शेंडगे, ह भ प सुनील महाराज पारगावकर ,दिनूभाऊ शेंडगे, पुरुषोत्तम महाराज कोठुळे ,शिवाजीराव मस्के, बाबासाहेब फपाळ सह प्रतिष्ठांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार