MB NEWS-संवेदनशील वाहक व चालकाच्या भूमिकेचे सर्वस्तरातून कौतुक !


कार्यतत्पर वाहक – चालकाच्या सतर्कतेमुळे वाचले एक वर्षाच्या बाळाचे प्राण  !

बस थेट नोनस्टॉप हॉस्पिटलमध्ये नेली ; संवेदनशील वाहक व चालकाच्या भूमिकेचे सर्वस्तरातून कौतुक !


परळी(प्रतींनिधी)रत्नागिरी आगाराची बस अंबाजोगाई मार्गे बीड ला जात असताना नेकनूर ते बीड प्रवास करताना एका महिलेच्या 1 वर्षाच्या लहान मुलाला ताप जास्त असल्याने ह्रदय विकाराचा झटका आला होता,त्यावेळी रत्नागिरी आगारातील कर्तव्यदक्ष वाहक महादेव फड यांच्या लक्षात हे गोष्ट येताच त्यांनी चालकाला बस कुठेच न थांबवता थेट हॉस्पिटलमध्ये घेण्यास सांगितले,त्यामुळे मुलाला तातडीचा उपचार मिळाला जर 10 मिनिटे उशीर झाला असता तर काही उपयोग नव्हता असे डॉक्टरांनी सांगितल्याचे त्या मुलाचे बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेले पावडील विशाल कदम यांनी सांगितले.


     याबाबत सविस्तर वृत्त की,रत्नागिरी आगाराची बस क्रमांक 2995 ही बस अंबाजोगाई – केज मार्गे बीडला जात असताना नेकनूर येथून पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेले विशाल कदम यांच्या पत्नी बस मधून आपल्या 1 वर्षाच्या लहान मुलासह प्रवास करत होत्या,तेव्हा अचानक मांजरसुंभा येथे त्या लहान मुलाला ह्रदय विकाराचा झटका आला,त्यावेळी बाळाच्या आईने घाबरून गेल्या व त्यांनी वाहक महादेव भालचंद्र फड यांना याबाबत माहिती दिली,त्यावेळी महादेव फड यांनी त्यांना धीर देत चालक शिवाजी मुंडे यांना सूचना करत बस थेट सिव्हिल हॉस्पिटल बीड येथे घेण्यास सांगितले,त्यावेळी मांजरसुंभा ते बीड या दरम्यान बस कुठेही न थांबवता थेट बीडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेली,त्यावेळी बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात कर्तव्यावर असलेले पण ट्रॅकिंगसाठी सहकार्‍या सोबत अहमदनगर – बीडच्या हद्दीवर गेलेल्या विशाल कदम यांना माहिती देण्यात आली,तेव्हा त्यांनी वेदांत हॉस्पिटल.बीड येथे बाळास नेण्यास सांगितले असता,महादेव फड यांनी समोरील ट्रॅफिक क्लियर करत एक रिक्षा बोलावून त्यात महिलेला व बाळाला बसवून दिले व त्यानंतर डॉक्टरांनी तातडीने उपचार केल्याने लहान बाळाचे प्राण वाचले,10 मिनिट उशीर झाला असता तर काहीही हात लागले नसते हे डॉक्टरांनी विशाल कदमाना सांगितल्याचे ते म्हणाले.अशी संवेदनशील माणसे समाजात असल्याने अनेकांना आधार मिळतो तसेच अशा कार्याची इत्तर वाहक चालकांनीच नाही तर प्रशासनात काम करणार्‍या प्रत्येकाने प्रेरणा घेऊन कार्य करायला पाहिजे दरम्यान वाहक व चालकाच्या सतर्कतेमुळे मुलाचे प्राण वाचवल्याने बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात असलेल्या विशाल कदम यांनी वाहकाच्या तिकीटावरील नावावरून रत्नागिरी आगारातून मोबाईल क्रमांक घेऊन फोन करत धन्यवाद मानले,दरम्यान माणुसकीचे दर्शन घडवणार्‍या वाहक महादेव फड व चालक शिवाजी मुंडे यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.


रत्नागिरी आगाराच्या वाहक–चालकाच्या माणुसकीने राज्यपरिवहन विभागाची प्रतिमा जणमाणसात उंचावली !


   रत्नागिरी आगाराचे पण परळी तालुक्यातील नंदागौळचे रहिवाशी असलेले वाहक महादेव फड व नाथरा येथील रहिवाशी असलेले चालक शिवाजी मुंडे हे अंबाजोगाई – केज मार्गे बीड ही बस घेऊन जात होते त्यावेळी त्यांनी संवेदनशीलपणे माणुसकीचे दर्शन घडवल्याने राज्य परिवहन विभागाची मान उंचावली असून, एस टी ही सामान्य माणसाला नेहमी आपली वाटते एस टीचा प्रवास सुखाचा व सुरक्षित प्रवास वाटतो त्यात अशा घटनामध्ये सतर्कता व तत्परता दाखवल्याने इतर कर्मचार्‍यासाठी प्रेरणा तर आहेच पण त्या सोबत सामान्य नागरिकांचा एसटी प्रती विश्वास वाढतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार