MB NEWS-वैद्यनाथ मंदिरात गर्दी तर जगमित्रनागा मंदिर येथे मनमोहक श्रंगारपुजा

 कार्तिकी एकादशी पर्वकाळात भाविकांची श्रद्धा ओसंडली !



🕳️ वैद्यनाथ मंदिरात  गर्दी तर जगमित्रनागा मंदिर येथे मनमोहक श्रंगारपुजा





परळी वैजनाथ, प्रतिनिधी ..

          परळीत कार्तिकी  एकादशी पर्वकाळात भाविकांची श्रद्धा ओसंडली असल्याचे पहावयास मिळाले.त्याचप्रमाणे टाळ मृदंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात काही दिंड्याही वैद्यनाथ नगरीत दाखल झाल्या. ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.

        एकादशी म्हटलं की परळीचा मंदिर परिसर भाविकांच्या उपस्थितीने फुलून जातो. वैद्यनाथ मंदिर,संत जगमित्रनागा मंदिर आदींसह शहरातील मंदिरात दर्शनासाठी परळीत पंचक्रोशीतील हजारो भाविक येतात.आज वैद्यनाथ मंदिर, संत जगमित्रनागा मंदिर, विठ्ठल मंदिर अंबेवेस, जाजुवाडी विठ्ठल मंदिर आदी परिसरात  गर्दीचे हे चित्र बघायला मिळाले.  एकादशी निमित्त आज सकाळपासुन परळी शहरातील वैद्यनाथ मंदिर, विठ्ठल मंदीर,संत जगमिञनागा मंदिर, गणेश मंदिरात  दर्शन घेतले.  मंदिर परीसरात सकाळपासुन गर्दी झाल्याचे दिसून आले.  

Click &watch:● *पहा: कार्तिकी एकादशीनिमित्त संत जगमित्रनागा मंदिरात भाविकांची रीघ | विशेष श्रृंगारदर्शन.* #mbnews #subscribe #like #share #comments


संत जगमित्रनागा मंदिर येथे श्रंगारपुजा......

     दरम्यान,संत जगमित्रनागा मंदिर येथे श्रृंगारपुजा करण्यात आली.विठ्ठल रुक्मिणी व संत जगमित्रनागा यांच्या समाधीची विशेष पुजा व आरास मांडण्यात आली होती.आकर्षक श्रृंगारपुजा मन मोहित करणारी होती.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !