प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-घरफोडीचे सत्र सुरूच :परळीतील माधवबाग मध्येही घरफोडी

 घरफोडीचे सत्र सुरूच : परळीतील माधवबाग मध्येही घरफोडी


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       परळी शहर व तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून हनुमान मंदिरातील दानपेट्यांच्या चोरीनंतर बँक कॉलनीतील मोठी घरफोडी व त्यानंतर आता परळीतील माधवबाग परिसरातही घरफोडीची घटना घडल्याचे पुढे आले आहे. या घरफोडीत सोन्याचे दागिने  चोरट्याने पळविले आहेत .

        

       माधवबाग परिसरात राहणारे फिर्यादी हरिदास रामदास बडे वय 50 यांच्या घरी दिनांक 3 रोजी मध्यरात्री घरामध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश केला व घरातील सोन्याचे दागिने अंदाजे किंमत 47 हजार 350 रुपये चोरून नेला. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार होळंबे हे करत आहेत.


     दरम्यान परळी शहर व परिसरातील वाढत्या चोऱ्याचे सत्र भीतीदायक बनले असून कोणत्याही चोऱ्याचा तपास लागत नसल्याने व चोरटे पकडण्यात पोलिसांना यश येत नसल्याने या चोऱ्यांचे सत्र वाढत चालल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चोरीच्या घटनेतील आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान परळी पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या