प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

 श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयात "मराठी रंगभूमी दिन" साजरा



सिरसाळा (वार्ताहार):-   येथील श्री पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालयात नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने दि. 5 नोव्हेंबर-2022 रोजी मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यात आला.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एच पी कदम यांच्या हस्ते रंगदेवता नटराज प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले. या प्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. एस. बी. फुलारी, डॉ. गणपत  गटी, विभागप्रमुख डॉ. सी. बी. कणसे हे उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे प्रस्ताविक नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ सी बी कणसे यांनी केले. तर प्रमुख वक्ते प्रा. एस.बी. फुलारी यांनी मराठी रंगभूमीचा उदय व विकास तसेच मराठवाड्याची रंगभूमी याविषयी उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ एच पी कदम  यांनी केला. प्रसंगी बोलताना मराठी रंगभूमी व तिचा सांस्कृतिक वारसा प्राचीन असून मराठी रंगभूमी ही समृद्ध असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मराठी रंगभूमीने सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय मागासलेपण दूर केले. तसेच नाट्यशास्त्र विभागाचे ग्रामीण भागात कलेची जाणिव आणि जागृती करण्यासाठी अधिकचे प्रयत्न करणे गरजेचे व आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. सर्व उपस्थितांनी नटराज प्रतिमेला अभिवादन केले.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि  आभार डॉ. सी. बी. कणसे यांनी मानले. या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी,  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या