MB NEWS-आरोग्य विभाग:अर्ज मागवले,मुलाखती झाल्या,काहीजण रुजुही झाले अन् भरती प्रक्रियेला स्थगिती

 लोखंडी सावरगाव दवाखाना : अर्ज मागवले,मुलाखती झाल्या,काहीजण रुजुही झाले अन् भरती प्रक्रियेला स्थगिती


परळी वैजनाथ, प्रतिनिधी......
             TELE MANAS (Tele mental Health Assistance & Networking across State) कार्यक्रम वृध्यत्व आरोग्य व मानसीक आजार केंद्र लोखंडी सावरगाव, अंबाजोगाई येथे कंत्राटी स्वरुपात १ ) Assistant Professor / Sr.Consultant 2 ) Senior Resident / Consultant, 3 ) Clinical Psychologist / PSW/Psychiatric Nurse 4 ) Project Co-Ordicator 5 ) Data Entry Operator 6 ) Counsellor 7) Attendants या पदाची जाहिरात राज्य स्तरावरून प्रसिध्द करण्यात आलेली होती. प्रसिध्द जाहिराती अंती उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून सदर अर्जाची छाननी करण्यात येऊन पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. 


        तसेच काहि पदाच्या उमेदवारांना ( १ ) Assistant Professor / Sr. Consultant 2) Senior Resident / Consultant, 3) Clinical Psychologist / PSW / Psychiatric Nurse 4 ) Project Co-Ordicator 5) Counsellor ) नियुक्ती आदेश ही देण्यात आले आहेत. तसेच काहि उमेदवार सदर पदावर रुजू हि झालेले आहेत. अशा सर्व उमेदवारांना सदर प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात येते की, सदरील सर्व पदाची भरती प्रक्रीया मा. अतिरिक्त संचालक (मा.आ.) आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांच्या दुरध्वनीव्दारे देण्यात आलेले आदेशान्वये निवड झालेल्या व सर्व पात्र करण्यात आलेल्या उमेदवारांच्या पद भरती प्रक्रियेला सध्या स्वगिती देणेबाबत आदेश प्राप्त आहेत. 


    
   त्यामुळे पुढील आदेशापर्यंत वरील सर्व पदाची भरती प्रक्रिया स्थगीत करण्यात येत आहे. तरी वरिष्ठ कार्यालायाकडुन सदर भरती प्रक्रियेबाबत नव्याने आदेश प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्याबाबतची सर्व माहिती वेळो वेळी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल यांची सर्व संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी.
              - (डॉ. सुरेश साबळे) अध्यक्ष निवड समिती तथा जिल्हा शल्यचिकीत्सक,बीड.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार