इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-परळी शिवसेनेच्या वतीने अंधेरी पोटनिवडणूक विजयाचा फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव

  अंधेरीत पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंनी भगवा फडकवला


Video News पहाण्यासाठी 👇👇 खालील ओळींवर क्लिक करा.... 

परळी शिवसेनेच्या वतीने अंधेरी पोटनिवडणूक विजयाचा फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव

मशाल पेटली; अंधेरी जिंकली - अभयकुमार ठक्कर

परळी वैजनाथ प्रतिनिधी

 अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या नव्या चिन्हासह पहिल्याच निवडणुकीमध्ये  दणदणीत विजय मिळविला आहे. ऋतुजा लटके या विक्रमी  मतांनी विजयी झाल्या आहेत. याबद्दल परळी शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू  ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

वाचा: ● *अंधेरी पूर्व पोटनिवडणुक : ऋतुजा लटके विजयी दोन नंबरची मते नोटाला*

परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टावर चौक येथे आज रविवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू  ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली व युवा सेनेचे बीड जिल्हा समन्वयक अतुल दुबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके या प्रचंड मतांनी विजयी झाल्याचे समजतात  शिवसैनिक एकत्र आले. 

Click-● राज्यसेवा (पूर्व) परीक्षा – २०२२ चा निकाल जाहीर; मुख्य परीक्षा २१ ते २३ जानेवारी दरम्यान होणार

यावेळी बोलताना अभयकुमार ठक्कर म्हणाले की अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकला असून मशाल पेटली; अंधेरी जिंकली असे सांगून यापुढे महाराष्ट्रात सर्वत्र मशाल पेटवून आनंद उत्सव साजरा करणार असल्याचे सांगितले.

Click-■ *खरीपात शेतकऱ्यांना बसला फटका पण रब्बी हंगामात अच्छे दिन येण्याची चिन्हं* _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा.

 यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यकर्त्यांच्या वतीने राणी लक्ष्मीबाई टावर चौक येथे फटाके फोडून व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जय भवानी जय शिवाजी विश्व हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा गगनभेदी घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. यामुळे टॉवर चौक परिसर दणाणून गेला होता. 

Click-● *दुर्दम्य आत्मविश्वास : ८० वर्षाचा 'चिरतरुण'....!* _#mbnews # subscribe #like #share #comments_

यावेळी शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर युवा सेनेचे बीड जिल्हा समन्वयक अतुल दुबे, माजी तालुकाप्रमुख जगन्नाथ साळुंके,माजी शहरप्रमुख नागनाथ पवार, शिवसेना जेष्ठ नेते सतीश जगताप, शिवसेना माजी परळी शहर संघटक संजय कुकडे, युवा सेनेचे विधानसभा प्रमुख मोहन परदेशी शिवसेना उपशहर प्रमुख किशन बुंदेले, मोहन राजमाने, विद्यार्थी सेना  माजी तालुका समन्वयक अमित कचरे, शिवाजी नगर विभाग प्रमुख सुरेश परदेशी, छत्रपती शिवाजी महाराज चौक विभाग प्रमुख संजय सोमाने, तळ प्रमुख श्रीनिवास सावजी, योगेश घेवारे, बबन ढेंबरे,मनीष जोशी, प्रकाश देवकर, नवनाथ वरवटकर, सोमनाथ गायकवाड, बजरंग औटी,यांच्यासह  शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

_________________________________

हे देखील वाचा\पहा......

Click-■ *कलावंतांसाठी महत्वपूर्ण: राज्य कला प्रदर्शनासाठी २२ नोव्हेंबर पर्यंत कलाकृती सादर करण्याचे आवाहन*


Click-■ *आरोग्य विभाग:अर्ज मागवले,मुलाखती झाल्या, नियुक्तीपत्र दिले, काही जण रुजुही झाले अन् भरती प्रक्रियेला स्थगिती

□ *पहा: चोरट्यांनी फोडले घर अन् पळविला ११लाखांचा ऐवज. | परळी पोलीसांना चोरट्यांचे आव्हान.* #mbnews # subscribe #like #share #comments


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या