MB NEWS-#जोशींचीतासिका:✍️अनिरुद्ध जोशी>>>>>How's the JOSH?

 How's the JOSH?



This time not its not HIGH, today its deliverd by LITTLE

-----------------------------------------------------

#जोशींचीतासिका:✍️अनिरुद्ध जोशी

-----------------------------------------------------

       कोणाला कमी कधीच समजू नका कारण काळ हा सगळ्यात बलवान असतो. आज काही तासांपूर्वी त्याची जगाला प्रचिती आलीचं असेल. आयर्लंड या क्रिकेट जगतातील लिंबू टीमच्या जॉश लिटिल या गोलंदाजांने विश्वचषकाच्या प्रबळ दावेदार असलेल्या न्यूझीलंड संघाविरुद्ध अखेरच्या षटकात हॅटट्रिक घेतली. 


T20 विश्वचषक इतिहासात हा कारनामा करणारा जॉश लिटिल हा जगातील केवळ दुसरा गोलंदाज आहे.


मला त्यांचे नावं मनापासून आवडलं कारण ते माझ्या आडनावाशी साधर्म्य असल्यामुळे. पण, त्यात एक गंमत वाटली त्याचा नावात दुसरा शब्द आहे "लिटिल" आहे. थोडक्यात, 'छोटा पॅकेट बडा धमाका' होतोच मग ते क्षेत्र कोणतेही असो. You never know when what and how can happen.


पण, एकदा काळ चांगला झाला की फक्त कोणत्याही यशस्वी व्यक्तीने वि. स. खांडेकर यांनी सांगितलेली एक गोष्ट नक्की लक्षात ठेवावी.


हे उन्मत्त सागरा उगीच गर्जना करू नकोस. या क्षणी दैव तुला अनुकूल आहे म्हणून भूमीचा एक एक भाग जिंकीत तू पुढे चालला आहेस

पण थोडा काळ थांब...

ते उलटले की मग तुला त्याचा प्रताप लक्षात येईल. जिंकलेला प्रत्येक भाग परत करत तुला नतमस्तक होऊन परत जावेच लागेल.

(संदर्भ : ययाती, वि. स. खांडेकर)


जॉश लिटिलचं उदाहरण एक गोष्ट अधोरेखित करत की 'दुनियामें सिर्फ काम बोलता हैं'. सगळे समालोचक आणि तथाकथित क्रिकेट पंडित हे हॅटट्रिकची अपेक्षा ऑस्ट्रेलियन, न्यूझीलंड, पाकिस्तान अशा दिग्गज पेस बॅटरी समजल्या जाणाऱ्या संघांच्या गोलंदाजांकडून करत होतो. मात्र "धमाका केला तो लिटलने".


Kane Williamson ❌ 

James Neesham ❌  

Mitchell Santner ❌


JOSH LITTLE WRITES HIS NAME IN THE HISTORY BOOKS 🔥 


Bravo JOSH 


जय हिंद,

अनिरुद्ध जोशी, परळी वैजनाथ

दि. 4 नोव्हेंबर 2022



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार