MB NEWS-अंधेरी पूर्व पोटनिवडणुक: ऋतुजा लटके विजयी दोन नंबरची मते नोटाला
अंधेरी पूर्व पोटनिवडणुक: ऋतुजा लटके विजयी दोन नंबरची मते नोटाला
मुंबई – अंधेरी पूर्व मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके या विजयी झाल्या आहेत.लटके याना 52 हजार मते मिळाली तर दुसऱ्या पसंतीची मते नोटा ला मिळाली आहेत.भाजपने या निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतली होती.
शिवसेनेचे आ रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्व मतदार संघात पोट निवडणूक जाहीर झाली होती.भाजपने मुरजी पटेल यांना मैदानात उतरवल्याने चुरस वाढली होती.मात्र ऐनवेळी भाजपने माघार घेतल्याने निवडणूक एकतर्फी होणार हे स्पष्ट झाले होते.
या निवडणुकीत केवळ 31 टक्के मतदान झाले होते.त्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.रविवारी मतमोजणी सुरू झाल्यानंतर ऋतुजा लटके यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली.13 व्या फेरीअखेर त्यांना 52 हजार 946 मते मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर मतदारांनी नोटा ला पसंती दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा