07 नोव्हेंबरला शिवा अ.भा.वीरशैव युवक संघटनेच्या 27 वा राज्यव्यापी वार्षिक मेळावा

 कपिलधार येथे 07 नोव्हेंबरला शिवा अ.भा.वीरशैव युवक संघटनेच्या 27 वा राज्यव्यापी वार्षिक मेळावा

वीरशैव समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-अनिल अष्टेकर यांचे आवाहन


*परळी वैजनाथ / प्रतिनिधी*

शिवा अखिल भारतीय शिवा वीरशैव युवक सघटनेच्या वतीने प्रतिवर्षी कार्तिक शुध्द पौर्णिमेच्या निमित्त होणार्‍या यात्रेमध्ये श्रीक्षेत्र कपीलधार, ता. जि. बीड येथे भव्य राज्यव्यापी वार्षिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी राज्यभरातून सुमारे 4 ते 5 लाख कार्यकर्ते व भाविक उपस्थित राहतात. शिवा संघटनेच्या मागणीनुसार श्रीक्षेत्र कपीलधार येथे पंढरपुर प्रमाणेच सन 2002 पासुन महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासकीय महापुजा करण्यात येत आहे. दि. 19 नोव्हेंबर 2002 रोजी पहीली शासकीय महापुजा संपन्न झाल्यानंतर कार्तिक शुध्द पौर्णिमेच्या यात्रेनिमीत्त प्रतिवर्षी शासकिय महापुजा संपन्न होत आहे. यंदा 21 वी शासकीय महापुजा आणि शिवा संघटनेचा 27 वा राज्यव्यापी वार्षिक मेळावा मोठया उत्साहात संपन्न होणार असून या कार्यक्रमास परळी तालुका व शहरातील सर्व वीरशैव समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवा अ.भा.वीरशैव युवक संघटनेचे परळी तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक अनिल भगवानअप्पा अष्टेकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.


प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यातील लाखो वीरशैव लिंगायत भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्री क्षेत्र कपिलधार ता. जि. बीड येथे 16 व्या शतकातील वीरशैव संत श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांची संजिवन समाधी मंदिर आहे. प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र कपिलधार येथे दि. 07 नोव्हे. 2022 रोज सोमवारी दुपारी ठिक 4.00 वाजता 21 वी शासकीय महापुजा बीडचे पालकमंत्री  अतुल सावे, खा.डॉ.सौ.प्रितमताई मुंडे, माजी मंत्री आ.धनंजय मुंडे, शिवसेना नेते  श्री चंद्रकांत खैरे, माजी मंत्री  श्री जयदत्त अण्णा क्षिरसागर, लातुरचे खासदार सुधाकर श्रृंगारे शिवा अ.भा.वीरशैव युवक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे व अनेक शिवाचार्य यांच्या हस्ते संपन्न होणार असुन त्यानंतर या मान्यवरांच्या उपस्थितीत शिवा संघटनेचा 27 वा राज्यव्यापी वार्षिक मेळावा शिवातीर्थ मैदान, कपिलधार येथे संपन्न होणार आहे. त्यामुळे या भव्य सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने सर्व शिवा पदाधिकारी, कार्यकर्ते, सांप्रदायिक मंडळी व वीरशैव लिंगायत समाज बांधवानी जल्लोषात उपस्थित रहावे असे आवाहन शिवा अ.भा.वीरशैव युवक संघटनेचे परळी तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक अनिल भगवानअप्पा अष्टेकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !