MB NEWS-२० कोटीचे कर्ज मिळवून देण्यासाठी परळीतील डॉक्टरला 2 कोटीचा गंडा

 २० कोटीचे कर्ज मिळवून देण्यासाठी परळीतील डॉक्टरला 2 कोटीचा गंडा


बीड,  प्रतिनिधी...
      तुमच्या दवाखान्याला फायनान्स कंपनीकडून वीस कोटीचे कर्ज मिळवून देतो असे म्हणत गुजरात राज्यातल्या काही भामट्यांनी परळी शहरातील डॉ. गायकवाड यांना चक्क 2 कोटीचे चंदन लावले. कर्जापायी त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळण्यात आले. याप्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे गायकवाड यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली.

       रवींद्र माणीकराव गायकवाड (वय 51 वर्षे) रा. वल्लभनगर शिवाजी चौक, परळी यांचे परळीमध्ये कृष्णाई नावाचे हॉस्पीटल आहे त्यांचे हॉस्पिटल त्यांना अत्याधुनिक करायचे होते, त्यासाठी त्यांनी विविध बँकेमध्ये कर्ज प्रस्ताव दाखल केले होते. मात्र बँकेकडून त्यांचे प्रस्ताव मंजूर झाले नाहीत. डॉ. गायकवाड यांना 9879966666 या क्रमांकावरून फोन आला व संबंधीतांनी डॉ. गायकवाड यांची चौकशी केली. भुज कच्छ फायनान्स अॅण्ड इन्व्हेस्टमेंट पाटनर फर्म भुज राज्य गुजरात येथून आम्ही कर्ज देवू असा तो व्यक्ती म्हणाला. या आमिषाला डॉ. बळी पडले. कर्ज तुम्हाला असं मिळणार नाही, त्यासाठी 10 टक्के टक्केवारी द्यावी लागेल असंही संबंधीत व्यक्ती म्हणाला. तुम्हाला आम्ही 20 कोटी कर्ज मिळवून देवू असं संबंधी6ताकडून सांगण्यात आले.




 त्यानुसार कागदपत्रांची संबंधीतांनी छाननी केली आणि 4-12-2017 रोजी उस्मान नोडे, शेख कासीम आणि दिलावर वली मोहम्मद कक्कल यांना बीडच्या शासकीय विश्रामगृहावर 47 लाख रुपये नगदी देण्यात आले. त्यानंतर डॉ. गायकवाड आणि संबंधीतांमध्ये चर्चा होत राहिली आणि पुन्हा मग संबंधीतांनी पैशाची मागणी केली त्यानुसार गायकवाड यांनी पैसे दिले. 26-02-2022 रोजी पुन्हा व्यवहार झाला असे एकूण 2 कोटी डॉ.गायकवाड यांच्याकडून  उस्मान नोडे, लियाकत अली, कासीम शेख, रफीक शेख, राजु पटेल, रामजी पटेल, हैदर बवावु यांच्यासह आदींनी घेतले. 


     पैसे दिल्यानंतर कर्जाचे काय झाले याबाबत गायकवाड यांनी संबंधीताकडे विचारपूस केली असता संबंधीत नेहमीच उडवाउडवीची उत्तरे देत होते. आपली यामध्ये मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार