MB NEWS-पंकजाताई मुंडे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

 पंकजाताई मुंडे यांनी घेतली  मुख्यमंत्र्यांची भेट


मतदारसंघातील विविध विकास कामांबाबतही झाली चर्चा

वैद्यनाथ मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, कॉरिडॉरसाठी मिळाला सकारात्मक प्रतिसाद


परळी वैजनाथ ।दिनांक ०४।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी परळी मतदारसंघातील विविध विकास कामासंदर्भात   काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. वैद्यनाथ मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडयास गती देऊन उज्जैनच्या धर्तीवर वैद्यनाथ काॅरिडाॅर निर्माण करून विकास करावा अशी मागणी त्यांनी केली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले.



   पंकजाताई मुंडे यांनी गुरूवारी मुख्यमंत्री शिंदे यांची निवासस्थानी भेट घेतली. आमदार माधुरीताई मिसाळ हया देखील त्यांच्यासमवेत होत्या. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिराचा सर्वांगीण विकास आणि भाविक भक्तांची सोय होण्याच्या दृष्टीने मंदिर परिसराचा विकास आराखडा मंजूर होणे आवश्यक आहे. यापूर्वी सन २०१९ मध्ये १३३  कोटी ५८ लाख रूपयांचा विकास आराखडा मंजूर झालेला होता, त्याअंतर्गत ३५ कोटीचा निधी पुरवणी मागणीद्वारे मंजूरही झाला पण नंतर मात्र निधी न मिळाल्याने कामे पूर्ण होऊ शकली नाहीत परिणामी मंदिर परिसराचा विकास झाला नाही ही बाब पंकजाताईंनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणुन दिली.

Click-● *पहा: कार्तिकी एकादशीनिमित्त संत जगमित्रनागा मंदिरात भाविकांची रीघ | विशेष श्रृंगारदर्शन.* #mbnews #subscribe #like #share #comments


  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील काशी विश्वनाथ, उज्जैन महाकाल मंदिराचा काॅरिडाॅर निर्माण करून जसा विकास केला अगदी त्याच प्रमाणे प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा देखील काॅरिडाॅर निर्माण करून विकास करावा अशी  मागणी त्यांनी केली. आहे. यावेळी मतदारसंघातील विविध विकास कामासंदर्भातही चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !