MB NEWS-डाॅ.शालिनी कराड यांना मातृशोक

 डाॅ.शालिनी कराड यांना मातृशोक



कराड हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. शालिनीताई कराड यांच्या मातोश्री बाळूताई शामराव गदळे यांना शुक्रवारी संध्याकाळी रात्री ११ च्या सुमारास देवाज्ञा झाली. मृत्युसमयी त्या ६८ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या, आजाराशी झुंजत असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. 


शिक्षण महर्षी स्व. शामराव  गदळे यांच्या पत्नी आणि डॉ. शालिनीताई कराड यांच्या मातोश्री बाळूताई शामराव गदळे यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी रात्री निधन झाले. धार्मिक आणि सामाजिक कार्याची बाळूताई यांना प्रचंड आवड होती. स्व. शामराव दादा गदळे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्याला त्यांनी नेटाने पुढे नेले. अतिशय शांत आणि संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून त्या सुपरिचित होत्या. बाळुताई यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगी डॉ. शालिनीताई कराड, बीड येथील दीप हॉस्पिटलचे संचालक डॉ. शशिकांत व इंजि. शरद गदळे अशी दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. गदळे आणि कराड परिवारावर कोसळलेल्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !