MB NEWS-मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

 परळीची 'सुवर्णकन्या' श्रद्धा गायकवाड नागरी सत्कार नियोजन ; महत्वपूर्ण व्यापक बैठकीचे आयोजन



• मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

           परळीसाठी अतिशय अभिमानाची बाब म्हणजे परळीची कन्या कुमारी श्रद्धा गायकवाड हिने 36 व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असून फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिंपिक साठी भारतीय संघात तिची निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ऑलम्पिक साठी निवड होणारी परळीतील ती पहिलीच खेळाडू ठरली आहे. परळी साठी ही अत्यंत गौरवाची बाब ठरली आहे. तिचा परळीकरांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे.या नागरी सत्कार सोहळ्याचे नियोजन ठरविण्यासाठी एका व्यापक बैठकीचे आयोजन शुक्रवार दि.4 रोजी करण्यात आले आहे.


      शुक्रवार दि.4 रोजी सकाळी 11 वा .श्रद्धा गायकवाड नागरी सत्कार नियोजन बैठक लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे होणार आहे. 

अहमदाबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत परळीच्या  कु.श्रध्दा रविंद्र गायकवाड हिने "स्केट बोर्डिंग" या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.  तिची "स्केट बोर्डिंग" या क्रीडा प्रकारात फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवड झाली आहे. रविंद्र गायकवाड हे परळी येथील रहिवाशी असून ते सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात त्यांच्या कन्येने या क्रीडा प्रकारात घेतलेली आंतरराष्ट्रीय पातळीवरील परळीच्या अभिमानाची ठरली आहे. हा नागरी सत्कार सोहळा भव्य दिव्य व्हावा,याचे स्वरुप व अन्य नियोजन करण्यासाठी व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे.तरी या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन 'सुवर्णकन्या' श्रद्धा गायकवाड नागरी सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार