पोस्ट्स

MB NEWS:महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून पवार साहेबांनी लोकशाहीची ताकत दाखवून दिली - धनंजय मुंडे*

इमेज
 * महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून पवार साहेबांनी लोकशाहीची ताकत दाखवून दिली - धनंजय मुंडे* *भाजपला आता 'जय' चालत नाहीत, जयसिंगराव गायकवाड यांच्या राजीनाम्यावरून मुंडेंची भाजपला टोलेबाजी* परभणी (दि. २१) ----- : ५६ आमदार असलेल्या शिवसेनेचे मुख्यमंत्री, ५४ आमदार असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री, ४४ आमदार असलेल्या काँग्रेसचे मंत्री आणि सर्वाधिक १०५ आमदार असलेला भाजप विरोधी पक्षात ही केवळ लोकशाहीची ताकत असून ही किमया करणारे खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी भाजप नेत्यांमधून आत्मविश्वास काढून घेतला आहे, पराभूत मानसिकतेत भाजप पदवीधरची निवडणूक लढवत आहे, असे मत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.  मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ परभणी येथे आयोजित पदवीधर व कार्यकर्ता मेळाव्यात ना. मुंडे बोलत होते.  धनंजय मुंडे यांच्या आधी नव्यानेच भाजपला सोडचिठ्ठी दिलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी मंचावर येऊन आपल्या भाषणातून आपल्या व्यथा मांडल्या. श्री गायकवाड यांनी भा

MB NEWS:वैद्यनाथ साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा गाळप शुभारंभ दि. 25 नोव्हेंबर रोजी

इमेज
  वैद्यनाथ साखर कारखान्याचा बाॅयलर अग्नी प्रदीपन उत्साहात  पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यनाथ पुन्हा गतवैभव प्राप्त करील - फुलचंद कराड  शेतकऱ्यांनी वैद्यनाथ कारखान्यालाच ऊस देण्याचे आवाहन  परळी वैजनाथ दि. २१....        वैद्यनाथ कारखाना यावर्षी पुर्ण क्षमतेने चालवण्याचा निर्धार अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी केला असुन त्यांच्या नेतृत्वाखाली " वैद्यनाथ" पुन्हा गतवैभव प्राप्त करील असा विश्वास व्यक्त करून शेतकऱ्यांनी इतरत्र ऊस न देता वैद्यनाथलाच ऊस द्यावा असे आवाहन कारखान्याचे जेष्ठ संचालक फुलचंद कराड यांनी आज केले. दरम्यान कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ बुधवार दि. 25 नोव्हेंबर रोजी पंकजाताई मुंडे यांच्या शुभ हस्ते होणार आहे.         वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या २० व्या गळीत हंगामाचा बाॅयलर अग्नी प्रदीपन समारंभ आज फुलचंद कराड यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव अघाव, संचालक सर्वश्री शिवाजी गुट्टे, पांडुरंगराव फड, ज्ञानोबा मुंडे, माधवराव मुंडे, किशनराव शिनगारे, व्यंकटराव कराड, दत्ताभाऊ देशमुख, भाऊसाहेब घोडके, त्रिंबकराव तांबडे,

MB NEWS:*मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक: आज ना.धनंजय मुंडे यांच्या शुभहस्तेआ.सतिष चव्हाण यांच्या प्रचाराचा शुभारंभ*

इमेज
  *मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक: आज ना.धनंजय मुंडे यांच्या शुभहस्तेआ.सतिष चव्हाण यांच्या प्रचाराचा शुभारंभ* परळी वैजनाथ, प्रतिनिधी...            औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ.सतिष चव्हाण यांच्या प्रचारार्थ परळीत महाविकास आघाडीच्या वतीने आज रविवार दि.२२ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते आ.सतिष चव्हाण यांच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.        राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते व आ.संजय दौंड यांच्या उपस्थितीत रविवार दि.२२ रोजी सकाळी ११ वा. प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. इमदादुल उलुम प्राथमिक शाळा प्रांगण,पाॅवर हाउसच्यामागे परळी वैजनाथ येथे समारंभ होणार आहे. तरी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक अंजुमन एज्युकेशन सोसायटी व विनीत मराठवाडा पदवीधर मतदार संघ महाविकास आघाडी प्रचार समिती परळी वैजनाथ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

MB NEWS:परभणी जिल्ह्यातील सोनपेठ,पाथरी,मानवत,सेलू,जिंतूर व परभणी येथील पदवीधरांची सिद्धेश्वर मुंडेंनाच पसंती!

इमेज
  मराठवाड्यातील पदवीधर व पदवीधर कर्मचाऱ्याना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासा साथ द्या - सिद्धेश्वर मुंडे     परभणी जिल्ह्यातील सोनपेठ,पाथरी,मानवत,सेलू,जिंतूर व परभणी येथील पदवीधरांची सिद्धेश्वर मुंडेंनाच पसंती! औरंगाबाद प्रतिनिधी दि.20.... औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सिध्देश्वर मुंडे यांनी परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, पाथरी, मानवत,सेलु,जिंतुर परभणी येणे प्रचार दौरा करत पदवीधर मतदारांसी संवाद साधला.परभणीतील पदवीधरांची पसंतीत सिध्देश्वर मुंडे मुंडे असल्याचे दिसून आले. सध्या पदवीधर निवडणुकीच्या प्रचारासाठी अपक्ष उमेदवार सिध्देश्वर मुंडे मराठवाडा दौऱ्यावर आहेत.मुंडे यांनी दि.19 रोजी परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, पाथरी, मानवत, सेलु,जिंतुर व परभणी येथे प्रचार दौरा करत पदवीधरांच्या बैठका घेतल्या. सोनपेठे येथील पदवीधरांसी संवाद साधताना त्यांनी मराठवाड्यातील पदवीधर व पदवीधर कर्मचारी यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मला साथ देण्याचे आव्हान केले.सध्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील प्रश्न जशाच्या तसेच कसे काय राहीले असा सवाल ही मुंडे यांनी उपस्थित केला. परभणी जिल्ह्यातील दौऱ्यात त्यांचे जा

MB NEWS:बीड जिल्ह्यातील एस.टी कर्मचाऱ्यांना बेस्ट वाहतूक सेवेतून सूट दया* खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केली परिवहन मंत्र्यांकडे मागणी

इमेज
 * बीड जिल्ह्यातील एस.टी कर्मचाऱ्यांना बेस्ट वाहतूक सेवेतून सूट दया* खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केली परिवहन मंत्र्यांकडे मागणी बीड.दि.२०----- बीड जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ठराविक कालावधीसाठी मुंबई येथे बेस्ट बसची वाहतूक सेवा करण्यासाठी टप्प्याटप्प्याने पाठवण्यात येत असल्याची माहिती समजताच खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्र लिहून जिल्ह्यातील एस.टी कर्मचाऱ्यांना बेस्ट बसच्या वाहतूक सेवेतून सूट द्यावी आणि मुंबईत बेस्टमध्ये कर्तव्य बजावण्यास मनाई करावी अशी मागणी केली आहे. जिल्ह्यातील एस.टी कर्मचाऱ्यांना ठराविक कालावधीसाठी बेस्टच्या वाहतूक सेवेचे कर्तव्य दिल्यामुळे एस.टी कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.यासंदर्भात खा.प्रितमताई मुंडे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्र लिहून कर्मचाऱ्यांच्या अडचणी मांडल्या आहेत.बीड जिल्ह्यातील परिवहन महामंडळाच्या चारशे कर्मचाऱ्यांना आतापर्यंत मुंबईला बेस्टमध्ये वाहतूक सेवेसाठी पाठवण्यात आले होते.यापैकी १४६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.कोरोनाची लागण झालेल्या एस.टी क

MB NEWS:मुंबई प्रमाणेच राज्यातील इतर भागातील शाळाही तूर्त बंद ठेवण्याची आ.कपील पाटील यांची मागणी

इमेज
  मुंबई प्रमाणेच राज्यातील इतर भागातील शाळाही तूर्त बंद ठेवण्याची आ.कपील पाटील यांची मागणी  मुंबई दि.२० – सोमवार पासून मुंबई वगळता राज्यातील 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे आदेश राज्यसरकारने दिल्या नंतर पालक आणि विद्यार्थी वर्गातून चिंता व्यक्त केली जात असल्याने आ. कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून मुंबई प्रमाणेच राज्यातील इतर भागातील शाळाही तूर्त बंद ठेवण्याची मागणी केली आहे.           एकीकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे उच्चस्तरीय पातळीवरून सांगण्यात येत असताना व मागच्या आठ दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत जात असताना राज्यसरकारने येत्या 23 तारखेपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने ज्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्या कितपत अंमलात येतील याबद्दल पालकांना शंका आहे. शिक्षणापेक्षा बालकांचे आरोग्य महत्वाचे असल्याचे मत कित्येक पालक बोलून दाखवत आहेत. या सर्व प्रतिक्रियेच्या पार्श्वभूमीवर शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी आज शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहिले असून ऑनलाईन शिक्षण चालू ठेवून तूर्त शाळा बंद ठेवण्याच

MB NEWS:परळी तालुका कामगार, कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर संयुक्त कृती समितीच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर निदर्शने - प्रा.बी.जी खाडे.

इमेज
  परळी तालुका कामगार, कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर संयुक्त कृती समितीच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर निदर्शने - प्रा.बी.जी खाडे परळी वै. (प्रतिनिधी) ः परळी तालुक्यातील कामगार, कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर कृती समितीची दिनांक १७ नोव्हेंबर रोजी सीटू कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत २६ नोव्हेंबर रोजी देशव्यापी संपाच्या निमित्ताने तहसील कार्यालयापुढे दुपारी १ वाजता निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संयुक्त कृतीसमितीचे निमंत्रक प्रा.बी.जी.खाडे यांनी दिली. देशातील सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी व कामगार संघटांच्या महासंघाने दि.२६ नोव्हेंबर २०२० रोजी देशव्यापी सार्वत्रिक संप करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने पुर्वीचे कामगार कायदे रद्द केले आहेत व कामगारांचेे हक्क हिरावून घेतले आहेत. नविन कामगार कायद्याला कामगार संघटनांचा विरोध आहे. केंद्र सरकारने केलेल्या नविन कृषी कायदा शेतकरी विरोधी असून या कायद्याला देशातील सर्व शेतकर्‍यांचा विरोध आहे. केंद्र सरकारने कामगार संहितेची निर्मिती फक्त उद्योगपतीच्या फायद्यासाठीच केलेली आहे. त्यात कामगारांच्या ह

MB NEWS:लोकशाही न्यूज चॅनल आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत अथर्व नेमचंद कुरकुट यास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक

इमेज
  लोकशाही न्यूज चॅनल आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत अथर्व नेमचंद कुरकुट यास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक परळी वैजनाथ दि. 20  लोकशाही न्यूज चॅनलच्या वतीने कोरोना विषयी जनजागृती करण्यासाठी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात अथर्व नेमचंद कुरकुट यास द्वितीय पारितोषिक मिळाले आहे.  संपूर्ण जगाला भेडसावणार्‍या कोरोना वायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समाजाने काय करावे, काय करु नये याचे प्रबोधन करण्यासाठी लोकशाही न्यूज चॅनलने राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. यात परळी येथील फाऊंडेशन स्कुलचा विद्यार्थी अथर्व नेमचंद कुरकुट यास द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. अथर्वने स्टे होम हे वारंवार सांगितले जात होते याचाच वापर करुन त्याने चित्र रेखाटले होते. रोख रक्कम व प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरुप आहे.

MB NEWS:ग्रामपंचायत निवडणुका स्थगीत: निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहीर होणार, राज्य निवडणूक आयोगाची माहिती

इमेज
ग्रामपंचायत निवडणुका स्थगीत: निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहीर होणार, राज्य निवडणूक आयोगाची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने आता 1 जानेवारी 2020 या अर्हता  ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार, राज्य निवडणूक आयोगाची माहिती मुंबई : राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोविडमुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता रद्द करण्यात आला आहे. लवकरच नवीन कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. मदान यांनी सांगितले की, राज्यातील 19 जिल्ह्यांतील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 फेब्रुवारी 2020 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. परंतु कोविडची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी उमेदवारी अर्ज छाननीच्या टप्प्यावर हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. तत्पूर्वी 31 जानेवारी 2020 पर्यंत अद्ययावत केलेली विधानसभेच्या मतदार यादीवरून ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या. विधानसभेची

MB NEWS:पेन्शन धारकांसाठी पोस्टात हयातनामा देण्याची सुविधा

इमेज
  पेन्शन धारकांसाठी पोस्टात हयातनामा देण्याची सुविधा बीड,दि. 19 :- (जि.मा.का) जिल्हयातील सर्व पेन्शन धारकांना प्रत्येक वर्षी द्यावा लागणाऱ्या हयातनामा प्रमाण पत्राची सुविधा बीड विभागातील सर्व डाक कार्यालयामध्ये सुरु करण्या आली आहे. सर्व पेन्शन धारकांना दर वर्षी हयातनामा (जीवन प्रमाण पत्र) आपल्या संबंधित पेन्शन कार्यालयास सादर करावे लागते. यापुर्वी सदरील प्रमाण पत्र लेखी स्वरुपात द्यावे लागत होते. केंद्र सरकारच्या नविन आदेशाप्रमाणे सदरील प्रमाणपत्र ऑनलाईन आधार प्रणाली द्वारे द्यावे लागते. बीड विभागातील सर्व डाकघरामध्ये पोस्टमन व डाक सेवकांमार्फत सदरील प्रमाण पत्र रु. 70/- (सत्तर फक्त) एवढी नाममात्र शुल्क घेऊन हयातनामा प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध आहे. यापुढे पेन्शन धारक कोणत्याही जवळच्या डाक घरामध्ये जाऊन तात्काळ प्रमाणपत्र सादर करु शकतात. सर्व पेन्शन धारकांनी सदरील सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बीड विभागाचे डाकघर अधिक्षक एस.एन.शास्त्री यांनी केले आहे. *-*-*-*-*-*-*-*

MB NEWS:निळा येथे भाग्यलक्ष्मी शेतकरी बचत गटाच्या हळद प्रक्रिया उद्योगास सुरुवात अधिकारी व शेतकर्यांच्या उपस्थितीत उद्घाटन

इमेज
  निळा येथे भाग्यलक्ष्मी शेतकरी बचत गटाच्या हळद प्रक्रिया उद्योगास सुरुवात अधिकारी व शेतकर्यांच्या उपस्थितीत उद्घाटन  सोनपेठ (प्रतिनिधी)   प्रकल्प संचालक आत्मा मराठवाडा विकास विशेष निधीतुन मंजुर झालेल्या सोनपेठ तालुक्यातील निळा येथील भाग्यलक्ष्मी शेतकरी बचत गटाच्या हळद प्रक्रिया उद्योगाचे वरिष्ठ अधिकारी व शेतकर्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.भाग्यलक्ष्मी शेतकरी बचत गटाच्या या उद्योगामुळे निळा परिसरासह सोनपेठ,गंगाखेड व परळी परिसरातील हळद उत्पादक शेतकर्यांना हळद प्रक्रियेसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.  सोनपेठ तालुक्यातील निळा येथील शेतकर्यांनी एकत्रित येत भाग्यलक्ष्मी शेतकरी बचत गटाची स्थापना करुन एकत्रितपणे व्यवसाय उभारणी सुरु केली.या बचत गटास शासनाच्या आत्मा योजनेतून हळद प्रक्रिया उद्योगाची मंजुरी मिळाली.यात शेतकर्यांच्या शेतातील हळद उकडणे,वाळलेल्या हळदीवर प्रक्रिया करणे (ढोल करणे),तयार हळकुंडापासुन नैसर्गिक पध्दतीने हळद तयार करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.पुर्वी हळद उत्पादक शेतकर्यांना हळद काढल्यानंतर ती उकडण्यासाठी व प्रक्रिया करण्यासाठी बाहेरुन यंत्र आणावी लागत असत आता बाजारपेठे

MB NEWS:बीड जिल्ह्यात 18 दिवसात एसटीचे 109 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह परळीत आगारातही लागण; चिंतेची बाब

इमेज
  बीड जिल्ह्यात 18 दिवसात एसटीचे 109 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह  परळीत आगारातही लागण; चिंतेची बाब बीड - प्रतिनिधी: मुंबईच्या प्रवासी सेवेसाठी राज्यातून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध आगारात कर्मचारी मुंबई येथे मुंबई बेस्ट सेवेत कार्यरत आहेत.1 नोव्हेंबर पासून बीड विभागातील साधारण 800 कर्मचारी आत्तापर्यंत मुंबई येथे आपले कर्तव्य बजावत आहेत.18 दिवसात या कर्मचाऱ्यांपैकी बीड जिल्ह्यातील 109 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने ही जिल्हावासीयांना चिंतेची बाब वाटू लागली आहे. मुंबई बेस्ट वाहतुकी साठी वाहक- चालक मिळून राज्यातील विविध आगारांच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.परळी, माजलगाव सह जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.कोरोना संसर्गाची संभाव्य दुसरी लाट लक्षात घेता एसटीच्या कर्मचाऱ्यांना बाधा होऊ नये म्हणून व त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होऊ नये या काळजीतून परत आपापल्या आगारात बोलण्याची गरज आहे.बीड विभागातील काही कर्मचारी संभाव्य कोरोना लागण लक्षात घेऊन मुंबईत सेवा करण्यास तयार नसल्याच

MB NEWS: *चारित्र्यावर संशय घेऊन कत्तीने वार करत पत्नीचा खून; विषारी औषध घेत पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न* • _परळी तालुक्यातील बोधेगाव येथे घडली घटना_ •

इमेज
 *चारित्र्यावर संशय घेऊन कत्तीने वार करत पत्नीचा खून; विषारी औषध घेत पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न*   • _परळी तालुक्यातील बोधेगाव येथे घडली घटना_ • परळी  वैजनाथ : पुढारी वृत्तसेवा         हात मोडल्याने पत्नी दोन महिन्यापासून माहेरी थांबली होती. ती नांदण्यास येत नसल्याने रागाने बेभान झालेल्या पतीने चारित्र्यावर संशय घेत कत्तीने पत्नीच्या मानेवर आणि डोक्यात सपासप वार केले आणि स्वतः विषारी औषध प्राशन केले. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला.ज्ञानेश्वरी धनराज उर्फ योगीराज सोनवर (वय २७, रा. होळ, ता. केज) असे त्या मृत महिलेचे नाव आहे.  ही घटना परळी तालुक्यातील बोधेगाव येथे सोमवारी (दि.१६) दुपारी घडली.          याबाबत सिरसाळा पोलिस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,परळी तालुक्यातील बोधेगाव येथील ज्ञानेश्वरीचा विवाह सहा वर्षांपूर्वी होळ येथील धनराज उर्फ योगीराज वनराज सोनवर याच्यासोबत झाला होता. या दांपत्याला एक मुलगी (वय ५) आणि एक मुलगा (वय ३) आहे. काही महिन्यापूर्वी ज्ञानेश्वरी आणि धनराज औरंगाबाद येथे कामानिमित्त गेले होते. तिथे दोन महिन्यापूर्वी पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वरीचा हात मोडला.

MB NEWS:धनंजय मुंडेंनी घेतला चैत्यभूमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा आढावा*

इमेज
 * धनंजय मुंडेंनी घेतला चैत्यभूमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा आढावा* *मार्च २०२३ मधेच आंबेडकर स्मारकाचे काम पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना* *महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी वरील कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण करणार* मुंबई (दि. 18) ---- :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी येथे सुरु असलेल्या तयारीच्या नियोजनाचा तसेच इंदू मिल येथे उभे राहत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामाचा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक मार्च २०२३ मध्येच पूर्ण केले जाईल आणि त्याचा लोकार्पण सोहळा १४ एप्रिल २०२३ रोजी केला जाईल, यासाठीची तयारी सुरू असल्याची माहिती मुंडे यांनी दिली. आंबेडकर स्मारकाच्या दोन्ही तळमजल्याचे काम पूर्ण झाले असून मुख्य प्रवेशद्वार आमच्या सूचनेनंतर ते साडेसहा फुटावर नेण्यात आले आहे. इतर कामे ही वेगात असल्याची माहितीही मुंडे यांनी यावेळी दिली. स्मारक बांधकामाच्या सनियंत्रणाची जबाबदारी सामाजिक न्याय खात्याकड

MB NEWS:वृक्षसंवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणार्या समाजबांधवांचा माजी विद्यार्थी संघाकडुन गौरव

इमेज
  वृक्षसंवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणार्या समाजबांधवांचा माजी विद्यार्थी संघाकडुन गौरव परळी (प्रतिनीधी ) वृक्षलागवड करुन त्याची जोपासणा करत हरित परळीचे स्वप्न साकारण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून वृक्ष संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणार्या परळीतील संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांचा माजी विद्यार्थी संघाच्या वतिने सन्मान करण्यात आला.  परळी शहरातील वेगवेगळ्या शाळेत शिक्षण घेतलेले वर्गमित्र दीपावली निमीत्त एकत्र येवुन दरवर्षी सामाजीक उपक्रम राबवत असतात.यावर्षी परळी शहर परिसरात वृक्ष लागवड करून संवर्धनाचे कार्य करणार्या व परळी शहर हे 'हरित परळी' बनवण्याच्या दृष्टिकोनातून शहरातील अनेक संस्था व व्यक्ती प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी वृक्ष संवर्धन चळवळ पुढे यावी यासाठी माजी विद्यार्थी संघातर्फे त्यांचा परळी शहरातील रस्त्यावर हजारो झाडे लावुन ती जोपासण्यासाठी पुढाकार घेणार्या नगराध्यक्षा सौ.सरोजिनी हालगे,परळी जवळील नंदागौळ रोड,कन्हेरवाडी परिसरात माळरानावर शासनाची घनदाट वृक्ष लागवड योजना प्रभावीपणे राबवुन विविध जातीच्या वृक्षांची प्रयत्नपूर्वक वाढ करून व

MB NEWS: *ब्राह्मण समाजाच्या संघर्षांत पूर्ण ताकतीने सोबत- आ.सुरेश धस* *प्रलंबित मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशनात सरकारला स्मरण करून देण्याची संघर्ष समितीस ग्वाही*

इमेज
 *ब्राह्मण समाजाच्या संघर्षांत पूर्ण ताकतीने सोबत- आ.सुरेश धस* *प्रलंबित मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशनात सरकारला स्मरण करून देण्याची संघर्ष समितीस ग्वाही* बीड- ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ व्हावे समाजातील तरूणांना उद्योग सुरू करता यावेत त्यांना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी आपण आग्रही आहोतच मला समाजाच्या सर्व मागण्या माहीत आहेत ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या संघर्षात मी पूर्ण ताकतीने सोबत आहे असे सांगत हिवाळी अधिवेशनात सरकारला या बाबत योग्य रीतीने स्मरण करून देणार असल्याची ग्वाही आ.सुरेश धस यांनी प्रलंबित मागण्यांचे स्मरणपत्र स्वीकारताना संघर्ष समिती शिष्टमंडळास दिली. ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने जागो सरकार जागो आंदोलन सुरू आहे. राज्यातील सर्व पक्षीय आजी माजी मंत्री, खासदार, आमदार या सर्व लोकप्रतिनिधींना स्मरण करून दिले जात आहे. याच प्रलंबित मागण्यांचे मंगळवार रोजी माजी मंत्री तथा बीड,उस्मानाबाद,लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांची आष्टी येथे त्यांच्या निवासस्थानी समितीचे मुख्य समन्वयक प्र

MB NEWS: *पंकजाताई मुंडे यांचे शिवसेनाप्रमुखांना वंदन*

इमेज
 *पंकजाताई मुंडे यांचे शिवसेनाप्रमुखांना वंदन* मुंबई....शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज शिवतीर्थावरील त्यांच्या स्मृती स्थळावर जाऊन त्यांना विनम्र अभिवादन केले.

MB NEWS: *मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक: महाविकास आघाडीची गुरुवारी बैठक व शनिवारी ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ*

इमेज
 *मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक: महाविकास आघाडीची गुरुवारी बैठक व शनिवारी ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ* परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ.सतिष चव्हाण यांच्या प्रचारार्थ परळीत महाविकास आघाडीची गुरुवारी(दि.१९) बैठक आयोजित करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे शनिवार दि.२१ रोजी ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.               गुरुवारी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस परळी शहर कार्यालाय येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीला महाविकास आघाडीचे नेतेगण, प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.सहविचार सभा आणि पदवीधर मेळावा घेवून महाविकास आघाडीने आधीच प्रचारात आघाडी घेतलेली आहे. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत शनिवार दि.२१ रोजी प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुर्वतयारी,प्रचार नियोजन तसेच प्रचारादरम्यान शहरात प्रत्येक प्रभागात पदवीधर मतदारांना गृहभेट घेतली जाणार आहे याचे नियोजन

MB NEWS: स्पाॅट न्युज-दादाहरि वडगाव जवळदादाहरि वडगाव जवळ भिषण अपघात; मोटारसायकलस्वार जागेवर ठार

इमेज
  दादाहरि वडगाव जवळ भिषण अपघात; मोटार सायकलस्वार जागेवर ठार परळी वैजनाथ, प्रतिनिधी       दादाहरि वडगाव जवळ  भिषण अपघात झाला असुन मोटारसायकलस्वार जागेवर ठार झाल्याची घटना आत्ता ८.४० वा.घडली आहे. ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.           दादाहरि वडगाव जवळ एक मोटारसायकल स्वार जात असताना एका टेम्पोने जोराची धडक दिली. या भिषण आपघातात मोटारसायकल स्वार जागीच गतप्राण झाला. मयत अंबाजोगाई चा असल्याचे प्रथमदर्शनी समजते.  दिलीप संतराम ताटकर असे मयताचे नाव आहे. ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचुन वाहतूक पुर्ववत केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.

MB NEWS:अंबाजोगाईत बनावट नोटा वटविण्याच्या प्रयत्नांतील तरुण जेरबंद; साथीदार फरार* *धक्कादायक : शहरात बनावट नोटांचे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय*

इमेज
 * अंबाजोगाईत बनावट नोटा वटविण्याच्या प्रयत्नांतील तरुण जेरबंद; साथीदार फरार*   *धक्कादायक : शहरात बनावट नोटांचे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय*   अंबाजोगाई : शहरातील स्वाराती रुग्णालयाच्या परिसरात दोन तरुण कारमध्ये बसून बनावट नोटा शहरात वटविण्याच्या उद्देशाने खरेदी करत असल्याची गुप्त माहिती अंबाजोगाई शहर पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करून बनावट नोटा आणि कारसह एका तरुणास ताब्यात घेतले. यावेळी त्याचा साथीदार पलायन करण्यात यशस्वी झाला. ही कारवाई सोमवारी (दि.१६) रात्री करण्यात आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून बनावट नोटांच्या कथित रॅकेटची पाळेमुळे कुठवर पसरलेली आहेत याचा पोलीस कसून तपास करत आहेत.    स्वाराती रुग्णालय परिसरात संजय सखाराम चौधरी (वय २९) आणि संजय बाळासाहेब पांचाळ (दोघेही रा. चनई, ता. अंबाजोगाई) हे दोघे तरुण बनावट नोटा बाळगून असल्याची गुप्त माहिती अंबाजोगाई शहरचे प्रभारी ठाणेप्रमुख संदीप दहिफळे यांना सोमवारी रात्री ९ वा. मिळाली. सध्या हे तरुण स्विफ्ट कारमध्ये (एमएच ४४ जी १९९३) बसलेले असून त्यांच्यात सदरील नोटा शहरात वटविण्यासाठी व्यवहार होत असल्

MB NEWS:विद्यार्थी सेनेच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन साजरा.

इमेज
  विद्यार्थी सेनेच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन साजरा परळी वै.(प्रतिनिधी) शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन भारतीय विद्यार्थी सेना परळी वैजनाथ यांच्या वतीने साजरा करण्यात आला. 17 नोव्हेंबर हा दिवस हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन महाराष्ट्र भर साजरा केला जातो. याच अनुषंगाने परळी वैजनाथ येथे भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन भारतीय विद्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे,शिवसेना माजी उप शहर प्रमुख सतिष जगताप यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले. या वेळी शिवसेना उप शहर प्रमुख किशन बुंदेले,भारतीय विद्यार्थी सेना उप जिल्हा प्रमुख मोहन परदेशी,तालुका समन्वयक अमित कचरे, शहर प्रमुख गजानन कोकीळ,वैभव जगताप,प्रा.वैजनाथ कानगुले,प्रकाश देवकर,सिद्धार्थ गायकवाड, नवनाथ वरवटकर, सोमनाथ गायकवाड,योगेश घेवारे,लक्ष्मण मुंडे,अशोक पवार,गोरख चव्हाण आदि उपस्थित होते.

MB NEWS: *पंकजाताई मुंडे यांच्या भेटीने बालिकांच्या निरागस चेहर्‍यावर फुलले हास्य !* *आशा सदनच्या बालगृहात साजरी केली भाऊबीज*

इमेज
 *पंकजाताई मुंडे यांच्या भेटीने बालिकांच्या निरागस चेहर्‍यावर फुलले हास्य !* *आशा सदनच्या बालगृहात साजरी केली भाऊबीज*  मुंबई दि. १६ ------- बहिण - भावाचे नाते अधिक दृढ करणारा भाऊबीजेचा सण भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी डोंगरी परिसरातील आशा सदनच्या बाल गृहातील अनाथ बालिकां समवेत साजरा केला.  आजच्या आनंदाच्या दिवशी त्यांच्या भेटीमुळे  तेथील बालिकांच्या निरागस चेहर्‍यावर हास्य फुलले. यावेळी त्यांनी बालिकांच्या सानिध्यात राहून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस तर केलीच शिवाय भाऊबीजेची भेटवस्तू व मिठाईही दिली.  पंकजाताई गेल्या दहा वर्षापासून सामाजिक जाणिवेतून  भाऊबीजेचा सण अशा प्रकारे  साजरा करतात हे विशेष!    दिवाळी म्हटलं की आनंदाची पर्वणीच..अशा उत्सवात समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना सामावून घेत त्यांच्या जीवनातही आनंद निर्माण करण्याचे काम  पंकजाताई मुंडे गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत.  आजचा भाऊबीजेचा दिवस त्यांनी या बालिकांच्या सहवासात घालवला. डोंगरी परिसरातील महाराष्ट्र राज्य वुमन्स कौन्सिल आशा सदन या बालगृहाला आज दुपारी  त्यांनी भेट देऊन तेथील बालिकां सोबत कोरोनाचे नियम

MB NEWS:स्वरलक्ष्मी लहानेंच्या सुमधूर आवाजाने रंगली पहाट गाणी मारवाडी युवा मंचने परंपरा कायम ठेवली-ह.भ.प.तुळशीराम महाराज गुट्टे

इमेज
  स्वरलक्ष्मी लहानेंच्या सुमधूर आवाजाने रंगली पहाट गाणी मारवाडी युवा मंचने परंपरा कायम ठेवली-ह.भ.प.तुळशीराम महाराज गुट्टे परळी (प्रतिनिधी) सलग 22 वर्ष एखाद्या कार्यक्रमाचे सातत्य ठेवणे हे सहज सोपे मुळीच नाही. मारवाडी युवा मंचने मात्र कोरोना परिस्थितीचे गांभिर्य ठेवत, सुरक्षा उपाय योजना अंमलात आणत पहाटगाणी कार्यक्रमाची परंपरा कायम ठेवल्याचे मत ह.भ.प.भागवताचार्य तुळशीराम महाराज गुट्टे यांनी व्यक्त केले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे शनिवारी मारवाडी युवा मंच आयोजित व स्वर लक्ष्मी लहाने यांच्या स्वर मिलाप ऑर्केस्ट्राच्या वतिने पहाटगाणी कार्यक्रम पार पडला. हिंदी आणि मराठी भाषेतील गीत, भावगीत, आणि भक्तीगीतांची अनोखी मैफील यावेळी पार पडली. हा कार्यक्रम मराठवाडा साथी पीसीएन न्यूज चॅनेलवरून तसेच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हजारो घरापर्यंत पोहचला होता. नटराज मध्ये सुद्धा रसिकांनी चांगली गर्दी केली होती.  मारवाडी मंच आणि स्वर मिलाप ऑर्केस्ट्रा प्रस्तुत पहाटगाणी कार्यक्रमाने परळीकरांची मने पुन्हा एकदा जिंकली आहेत. सलग 22 वर्ष पहाटगाणी कार्यक्रम दिवाळीच्या अभ्यंगस्नाला स्वरांची जोड

MB NEWS:बीड जिल्ह्यात रब्बी पिकासाठी पाण्याचे जलसंपदा विभागाने नियोजन करावे - वसंत मुंडे

इमेज
  बीड जिल्ह्यात रब्बी पिकासाठी पाण्याचे जलसंपदा विभागाने नियोजन करावे -  वसंत मुंडे  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....   यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी रब्बी पिकासाठी उत्साहित आहे. कारण खरीप अतिवृष्टीमुळे हातचे आलेले पीक डोळ्यादेखत नुकसान झाली तरीही शेतकरी रब्बी पेरणीसाठी ज्वारी गहू भुईमूग हरभरा कर्डी जवस व इतर पिके घेण्यासाठी तयारीला लागला. बारामाही पिकासाठी ऊस लागवड सह इतर फळबाग पिकाचे तयारी शेतकरी करीत आहे, असे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी माहिती दिली. परंतु जलसंपदा, पाटबंधारे विभागाने सर्व मुख्य कॅनल चाऱ्या गेट दुरुस्त करणे काळाची गरज आहे. त्यामुळे शेतक-याला व्यवस्थित पाणी त्याच्या शेतीमध्ये पिकला देता येईल. महाराष्ट्र शासनाकडे पाटबंधारे विभागा संदर्भातील व्यवस्थित शेतकऱ्यांना पाणी बांधापर्यंत पोहोचण करिता शासना मार्फत नियोजन करून शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्याकडे मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी निवेदनाद्वारे शासनाला विनंती केली. परळी तालुका अंतर्गत वाण धरण कासारवाडी चांदापूर अंबल

MB NEWS: *बीडची घटना दुर्दैवी ; स्पेशल टास्क फोर्स नेमून चौकशी करा - पंकजाताई मुंडे यांची मागणी* *_मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालून आरोपींवर कडक कारवाई करावी_*

इमेज
 *बीडची घटना दुर्दैवी ; स्पेशल टास्क फोर्स नेमून चौकशी करा - पंकजाताई मुंडे यांची मागणी* *_मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालून आरोपींवर कडक कारवाई करावी_* मुंबई दि. १५ ------ बीड जिल्हयातील येळंबघाट येथे तरूणीला जिवंत जाळण्यात आल्याची घटना अतिशय दुर्दैवी व माणूसकीला काळीमा फासणारी आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी यात तातडीने लक्ष घालावे आणि स्पेशल टास्क फोर्स नियुक्त करून घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.     नांदेड जिल्हयातील एका तरूणीला येळंबघाट परिसरात ॲसिड व पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याचा प्रकार काल पहाटे घडला. हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे, एखाद्याला जिवंत जाळणं हेच मुळात वेदनादायी आहे. महाराष्ट्रात अशा घटना वारंवार घडताहेत याच दुःख वाटतयं. या घटनेचा मी निषेध करते. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने मन सुन्न झाले. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालून तात्काळ घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करावी तसेच स्पेशल टास्क फोर्स नेमून याची चौकशी करावी. यासंदर्भात मी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहमंत्री अनिल दे