MB NEWS:पेन्शन धारकांसाठी पोस्टात हयातनामा देण्याची सुविधा

 पेन्शन धारकांसाठी पोस्टात हयातनामा देण्याची सुविधा



बीड,दि. 19 :- (जि.मा.का) जिल्हयातील सर्व पेन्शन धारकांना प्रत्येक वर्षी द्यावा लागणाऱ्या हयातनामा प्रमाण पत्राची सुविधा बीड विभागातील सर्व डाक कार्यालयामध्ये सुरु करण्या आली आहे. सर्व पेन्शन धारकांना दर वर्षी हयातनामा (जीवन प्रमाण पत्र) आपल्या संबंधित पेन्शन कार्यालयास सादर करावे लागते. यापुर्वी सदरील प्रमाण पत्र लेखी स्वरुपात द्यावे लागत होते. केंद्र सरकारच्या नविन आदेशाप्रमाणे सदरील प्रमाणपत्र ऑनलाईन आधार प्रणाली द्वारे द्यावे लागते.


बीड विभागातील सर्व डाकघरामध्ये पोस्टमन व डाक सेवकांमार्फत सदरील प्रमाण पत्र रु. 70/- (सत्तर फक्त) एवढी नाममात्र शुल्क घेऊन हयातनामा प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध आहे. यापुढे पेन्शन धारक कोणत्याही जवळच्या डाक घरामध्ये जाऊन तात्काळ प्रमाणपत्र सादर करु शकतात.


सर्व पेन्शन धारकांनी सदरील सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बीड विभागाचे डाकघर अधिक्षक एस.एन.शास्त्री यांनी केले आहे.

*-*-*-*-*-*-*-*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !