MB NEWS:निळा येथे भाग्यलक्ष्मी शेतकरी बचत गटाच्या हळद प्रक्रिया उद्योगास सुरुवात अधिकारी व शेतकर्यांच्या उपस्थितीत उद्घाटन

 निळा येथे भाग्यलक्ष्मी शेतकरी बचत गटाच्या हळद प्रक्रिया उद्योगास सुरुवात



अधिकारी व शेतकर्यांच्या उपस्थितीत उद्घाटन 

सोनपेठ (प्रतिनिधी)

  प्रकल्प संचालक आत्मा मराठवाडा विकास विशेष निधीतुन मंजुर झालेल्या सोनपेठ तालुक्यातील निळा येथील भाग्यलक्ष्मी शेतकरी बचत गटाच्या हळद प्रक्रिया उद्योगाचे वरिष्ठ अधिकारी व शेतकर्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.भाग्यलक्ष्मी शेतकरी बचत गटाच्या या उद्योगामुळे निळा परिसरासह सोनपेठ,गंगाखेड व परळी परिसरातील हळद उत्पादक शेतकर्यांना हळद प्रक्रियेसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.

 सोनपेठ तालुक्यातील निळा येथील शेतकर्यांनी एकत्रित येत भाग्यलक्ष्मी शेतकरी बचत गटाची स्थापना करुन एकत्रितपणे व्यवसाय उभारणी सुरु केली.या बचत गटास शासनाच्या आत्मा योजनेतून हळद प्रक्रिया उद्योगाची मंजुरी मिळाली.यात शेतकर्यांच्या शेतातील हळद उकडणे,वाळलेल्या हळदीवर प्रक्रिया करणे (ढोल करणे),तयार हळकुंडापासुन नैसर्गिक पध्दतीने हळद तयार करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.पुर्वी हळद उत्पादक शेतकर्यांना हळद काढल्यानंतर ती उकडण्यासाठी व प्रक्रिया करण्यासाठी बाहेरुन यंत्र आणावी लागत असत आता बाजारपेठेसह सर्व एकाच ठिकाणी व गावातच उपलब्ध झाल्याने हळद उत्पादक शेतकर्यांना चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे.भाग्यलक्ष्मी शेतकरी बचत गटाच्या या हळद उद्योगाचे उद्घाटन एस.बी.आळसे प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी परभणी यांच्या हस्ते व यु.एन.आळसे प्रमुख शास्त्रज्ञ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, के.आर.सराफ प्रकल्प उप संचालक आत्मा परभणी,तुपे शास्त्रज्ञ केव्हिके परभणी,जी के कोरेवाड तालुका कृषी अधिकारी सोनपेठ,वाय.जी.पतंगे तालुका तंत्र व्यवस्थापक आत्मा सोनपेठ सुहास कौलगे मंडळ कृषी अधिकारी सोनपेठ,बि.एल.जाधव,नागरगोजे सौ इंगळे मॅडम,भाजयुमो परभणी जिल्हाध्यक्ष रंगनाथ सोळंके आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी उपस्थित अधिकारी व शेतकर्यांचे भाग्यलक्ष्मी शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष विष्णु सोळंके,सचिव रूस्तुम सोळंके,कोषाध्यक्ष धनंजय आढाव,सदस्य रामचंद्र सोळंके,सिध्देश्वर सोळंके,लक्ष्मण आढाव,परमेश्वर सोळंके,देवीदास सोळंके,रंगनाथ सोळंके,अंकुश सोळंके,त्र्यंबक सोळंके,विवेक कुलकर्णी,गणेश सोळंके,भगवान सोळंके,पांडुरंग सोळंके आदींनी स्वागत केले.या कार्यक्रमास शेतकरी मदन सोळंके,शिवाजी सोळंके,मोकिंद सोळंके,प्रेमप्रकाश भारती,माणिक आढाव,रामराव सोळंके,निवृत्ती सोळंके,दत्ता सोळंके,भागवत यादव,बाळु सोळंके,बाबुराव सोळंके,बाळु घायतिडक,अवधुत सोळंके,काशिनाथराव कुलकर्णी,सुदर्शन सोळंके,विठ्ठल सोळंके,अंकुश गरड,शेषेराव गरड,रतन सोळंके,विनायक कुलकर्णी,राजेभाऊ कुलकर्णी,राहुल शिंदे,अवधुत सोळंके,बबन गरड,भरत आढाव,विजय क्षीरसागर,नवनाथ पवार,भगवान सावंत,अशोकराव कलिंदर,प्रताप भारती,दत्ता शिंदे,अतुल कुलकर्णी,राजेभाऊ सोळंके,वैजनाथ सोळंके,बाब बाबुराव आढाव,बळीराम आढाव,सदाशिव गरड,अशोक सोळंके आदीसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !