MB NEWS:विद्यार्थी सेनेच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन साजरा.

 विद्यार्थी सेनेच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन साजरा



परळी वै.(प्रतिनिधी)

शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन भारतीय विद्यार्थी सेना परळी वैजनाथ यांच्या वतीने साजरा करण्यात आला.

17 नोव्हेंबर हा दिवस हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन महाराष्ट्र भर साजरा केला जातो.

याच अनुषंगाने परळी वैजनाथ येथे भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन भारतीय विद्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे,शिवसेना माजी उप शहर प्रमुख सतिष जगताप यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी शिवसेना उप शहर प्रमुख किशन बुंदेले,भारतीय विद्यार्थी सेना उप जिल्हा प्रमुख मोहन परदेशी,तालुका समन्वयक अमित कचरे, शहर प्रमुख गजानन कोकीळ,वैभव जगताप,प्रा.वैजनाथ कानगुले,प्रकाश देवकर,सिद्धार्थ गायकवाड, नवनाथ वरवटकर, सोमनाथ गायकवाड,योगेश घेवारे,लक्ष्मण मुंडे,अशोक पवार,गोरख चव्हाण आदि उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार