MB NEWS: *चारित्र्यावर संशय घेऊन कत्तीने वार करत पत्नीचा खून; विषारी औषध घेत पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न* • _परळी तालुक्यातील बोधेगाव येथे घडली घटना_ •

 *चारित्र्यावर संशय घेऊन कत्तीने वार करत पत्नीचा खून; विषारी औषध घेत पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न* 



 • _परळी तालुक्यातील बोधेगाव येथे घडली घटना_ •


परळी  वैजनाथ : पुढारी वृत्तसेवा

        हात मोडल्याने पत्नी दोन महिन्यापासून माहेरी थांबली होती. ती नांदण्यास येत नसल्याने रागाने बेभान झालेल्या पतीने चारित्र्यावर संशय घेत कत्तीने पत्नीच्या मानेवर आणि डोक्यात सपासप वार केले आणि स्वतः विषारी औषध प्राशन केले. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला.ज्ञानेश्वरी धनराज उर्फ योगीराज सोनवर (वय २७, रा. होळ, ता. केज) असे त्या मृत महिलेचे नाव आहे.  ही घटना परळी तालुक्यातील बोधेगाव येथे सोमवारी (दि.१६) दुपारी घडली. 

        याबाबत सिरसाळा पोलिस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,परळी तालुक्यातील बोधेगाव येथील ज्ञानेश्वरीचा विवाह सहा वर्षांपूर्वी होळ येथील धनराज उर्फ योगीराज वनराज सोनवर याच्यासोबत झाला होता. या दांपत्याला एक मुलगी (वय ५) आणि एक मुलगा (वय ३) आहे. काही महिन्यापूर्वी ज्ञानेश्वरी आणि धनराज औरंगाबाद येथे कामानिमित्त गेले होते. तिथे दोन महिन्यापूर्वी पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वरीचा हात मोडला. त्यानंतर ती राहण्यासाठी माहेरी बोधेगावला तळावर नामक शेतातील घरी आली होती.

         सोमवारी दुपारी धनराज बोधेगावला आला. सासरवाडीत ज्ञानेश्वरीचा भाऊ वैजनाथने धनराज सोबत जेवण केले आणि शेळ्या चारण्यासाठी निघून गेला. दुपारी ४ वाजता धनराज पुन्हा सासरवाडीच्या घरी आला. सासरी नांदण्यास का येत नाहीस असे म्हणत त्याने चारित्र्यावर संशय घेत ज्ञानेश्वरीला शिवीगाळ सुरु केली. त्यानंतर रागाने बेभान झालेल्या धनराजने धारदार कत्तीने तीच्या गळ्यावर, मानेवर आणि डोक्यात सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वरीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मयतेची बहिण कल्पना शामराव सोडगीर यांच्या फिर्यादीवरून धनराज सोनवर याच्यावर सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा. पोलीस निरिक्षक श्रीकांत डोंगरे करत आहेत.

@@@

*पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न*

         दरम्यान, मयत महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून तिची बहिण कल्पना हिने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे नातेवाईक धावत आले. यावेळी धनराजने सोबत आणलेल्या बाटलीतील विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. नातेवाईकांनी अत्यवस्थ झालेल्या धनराजला उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार