MB NEWS: *बीडची घटना दुर्दैवी ; स्पेशल टास्क फोर्स नेमून चौकशी करा - पंकजाताई मुंडे यांची मागणी* *_मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालून आरोपींवर कडक कारवाई करावी_*

 *बीडची घटना दुर्दैवी ; स्पेशल टास्क फोर्स नेमून चौकशी करा - पंकजाताई मुंडे यांची मागणी*

*_मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालून आरोपींवर कडक कारवाई करावी_*



मुंबई दि. १५ ------ बीड जिल्हयातील येळंबघाट येथे तरूणीला जिवंत जाळण्यात आल्याची घटना अतिशय दुर्दैवी व माणूसकीला काळीमा फासणारी आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी यात तातडीने लक्ष घालावे आणि स्पेशल टास्क फोर्स नियुक्त करून घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. 


   नांदेड जिल्हयातील एका तरूणीला येळंबघाट परिसरात ॲसिड व पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याचा प्रकार काल पहाटे घडला. हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे, एखाद्याला जिवंत जाळणं हेच मुळात वेदनादायी आहे. महाराष्ट्रात अशा घटना वारंवार घडताहेत याच दुःख वाटतयं. या घटनेचा मी निषेध करते. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने मन सुन्न झाले. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालून तात्काळ घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करावी तसेच स्पेशल टास्क फोर्स नेमून याची चौकशी करावी. यासंदर्भात मी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांना आजच पत्र लिहित आहे. आरोपींविरुद्ध कडक कारवाई झाली पाहिजे तसेच राज्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत ठोस पावलं उचलली गेली पाहिजेत अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.

••••

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार