MB NEWS:लोकशाही न्यूज चॅनल आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत अथर्व नेमचंद कुरकुट यास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक

 लोकशाही न्यूज चॅनल आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत



अथर्व नेमचंद कुरकुट यास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक

परळी वैजनाथ दि. 20

 लोकशाही न्यूज चॅनलच्या वतीने कोरोना विषयी जनजागृती करण्यासाठी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात अथर्व नेमचंद कुरकुट यास द्वितीय पारितोषिक मिळाले आहे.

 संपूर्ण जगाला भेडसावणार्‍या कोरोना वायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समाजाने काय करावे, काय करु नये याचे प्रबोधन करण्यासाठी लोकशाही न्यूज चॅनलने राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. यात परळी येथील फाऊंडेशन स्कुलचा विद्यार्थी अथर्व नेमचंद कुरकुट यास द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. अथर्वने स्टे होम हे वारंवार सांगितले जात होते याचाच वापर करुन त्याने चित्र रेखाटले होते. रोख रक्कम व प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरुप आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!