MB NEWS:बीड जिल्ह्यात रब्बी पिकासाठी पाण्याचे जलसंपदा विभागाने नियोजन करावे - वसंत मुंडे

 बीड जिल्ह्यात रब्बी पिकासाठी पाण्याचे जलसंपदा विभागाने नियोजन करावे -  वसंत मुंडे



 परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... 

 यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी रब्बी पिकासाठी उत्साहित आहे. कारण खरीप अतिवृष्टीमुळे हातचे आलेले पीक डोळ्यादेखत नुकसान झाली तरीही शेतकरी रब्बी पेरणीसाठी ज्वारी गहू भुईमूग हरभरा कर्डी जवस व इतर पिके घेण्यासाठी तयारीला लागला. बारामाही पिकासाठी ऊस लागवड सह इतर फळबाग पिकाचे तयारी शेतकरी करीत आहे, असे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी माहिती दिली. परंतु जलसंपदा, पाटबंधारे विभागाने सर्व मुख्य कॅनल चाऱ्या गेट दुरुस्त करणे काळाची गरज आहे. त्यामुळे शेतक-याला व्यवस्थित पाणी त्याच्या शेतीमध्ये पिकला देता येईल. महाराष्ट्र शासनाकडे पाटबंधारे विभागा संदर्भातील व्यवस्थित शेतकऱ्यांना पाणी बांधापर्यंत पोहोचण करिता शासना मार्फत नियोजन करून शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्याकडे मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी निवेदनाद्वारे शासनाला विनंती केली. परळी तालुका अंतर्गत वाण धरण कासारवाडी चांदापूर अंबलवाडी धर्मापुरी कनेरवाडी मालेवाडी तर छोटे-मोठे धरण आहेत परंतु अनेक वीटभट्ट्या उद्योग करणाऱ्या लोकांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून कॅनॉल उकडून टाकले आहेत त्यामुळे शेवटच्या शेतकऱ्याला पाणी पोहोचणे अवघड आहे या सर्व बाबी जलसंपदा, पाटबंधारे विभागाने तपासून व दुरुस्ती करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे.त्वरित शासन स्तरावर आदेश देण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे रब्बी पिकाचे नियोजन केल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात शेती मधून उत्पन्न मिळेल कारण वातावरण योग्य असल्यामुळे पिके चांगली येण्याची शेतकऱ्यांना शक्यता वाटते करिता शासनाने खत बी बियाणे औषधी तेलंगणा राज्याच्या पॅटर्नप्रमाणे शेतकऱ्याला उपलब्ध करून दिल्यास अथवा बी बियाणे खते औषधे खरेदी करण्यासाठी पैसे लागतात. बँकेच्या खात्यात वर्ग केल्यास शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या आर्थिक मदत होईल करिता महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री, कृषीमंत्री, जलसंपदा मंत्री संबंधित प्रधान सचिव यांना निवेदनाद्वारे पाटबंधारे,जलसंपदा संदर्भात व कृषी खात्यामार्फत खते बी-बियाणे औषध उपलब्ध करून देण्यासंदर्भात निवेदनाद्वारे विनंती केली असल्याची माहिती काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार