युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS: *मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक: महाविकास आघाडीची गुरुवारी बैठक व शनिवारी ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ*

 *मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक: महाविकास आघाडीची गुरुवारी बैठक व शनिवारी ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ*



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

    औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ.सतिष चव्हाण यांच्या प्रचारार्थ परळीत महाविकास आघाडीची गुरुवारी(दि.१९) बैठक आयोजित करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे शनिवार दि.२१ रोजी ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.

    

         गुरुवारी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस परळी शहर कार्यालाय येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीला महाविकास आघाडीचे नेतेगण, प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.सहविचार सभा आणि पदवीधर मेळावा घेवून महाविकास आघाडीने आधीच प्रचारात आघाडी घेतलेली आहे. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत शनिवार दि.२१ रोजी प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुर्वतयारी,प्रचार नियोजन तसेच प्रचारादरम्यान शहरात प्रत्येक प्रभागात पदवीधर मतदारांना गृहभेट घेतली जाणार आहे याचे नियोजन बुथ समिती आणि विविध जबाबदाऱ्या निश्चित करणे आदींबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.या महत्त्वपुर्ण बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन मराठवाडा पदवीधर मतदार संघ महाविकास आघाडी प्रचार समिती परळी वैजनाथ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या