इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

MB NEWS: *ब्राह्मण समाजाच्या संघर्षांत पूर्ण ताकतीने सोबत- आ.सुरेश धस* *प्रलंबित मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशनात सरकारला स्मरण करून देण्याची संघर्ष समितीस ग्वाही*

 *ब्राह्मण समाजाच्या संघर्षांत पूर्ण ताकतीने सोबत- आ.सुरेश धस*


*प्रलंबित मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशनात सरकारला स्मरण करून देण्याची संघर्ष समितीस ग्वाही*



बीड-


ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ व्हावे समाजातील तरूणांना उद्योग सुरू करता यावेत त्यांना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी आपण आग्रही आहोतच मला समाजाच्या सर्व मागण्या माहीत आहेत ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या संघर्षात मी पूर्ण ताकतीने सोबत आहे असे सांगत हिवाळी अधिवेशनात सरकारला या बाबत योग्य रीतीने स्मरण करून देणार असल्याची ग्वाही आ.सुरेश धस यांनी प्रलंबित मागण्यांचे स्मरणपत्र स्वीकारताना संघर्ष समिती शिष्टमंडळास दिली.


ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने जागो सरकार जागो आंदोलन सुरू आहे. राज्यातील सर्व पक्षीय आजी माजी मंत्री, खासदार, आमदार या सर्व लोकप्रतिनिधींना स्मरण करून दिले जात आहे. याच प्रलंबित मागण्यांचे मंगळवार रोजी माजी मंत्री तथा बीड,उस्मानाबाद,लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांची आष्टी येथे त्यांच्या निवासस्थानी समितीचे मुख्य समन्वयक प्रमोद पुसरेकर, प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,नितीन कुलकर्णी,अशोक कडेकर,अनंता जोशी,गजानन घायाळ,सुमित देशपांडे,विठ्ठल कुलकर्णी,महेंद्र पोतदार,मनोहर पोतदार,विजय सहस्त्रबुद्धे,मनोज देशपांडे, मंगेश कुलकर्णी,सचिन रानडे,शैलेश सहस्त्रबुद्धे

रोहित देशपांडे,प्रसाद देशपांडे यांनी भेट घेऊन स्मरणपत्र दिले. यावेळी आ.सुरेश धस यांनी समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करत ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ होणे गरजेचे यासाठी आहे की मला समाजाच्या अडीअडचणी माहीत आहेत ब्राह्मण समाज माझ्या सोबत कायम राहिला आहे, अडचणीच्या काळात देखील समाज भक्कम साथ कसलीही अपेक्षा न करता मला देत आला आहे. एक कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे मी त्यांच्या सोबत आणि ते माझ्या सोबत आहेत. समाजात बुद्धीमत्ता आहे पण सरकारी नोकरीचे प्रमाण कमी झाले आहे, अनेक तरुण होतकरू असताना देखील आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने उद्योग व्यवसाय करू शकत नाहीत, समाजाचा आर्थिकस्तर खालावला आहे अशा परिस्थितीत समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ हा सक्षम उपाय आहे. यासाठी सर्व प्रकिया भाजपा सरकारच्या काळात पूर्ण करण्यात आली होती मधल्या काळात सरकार मध्ये होऊ नये ते बदल झाले आणि ते राहून गेले समाजाच्या संघर्षात मी कायम ताकतीने सॊबत असून प्रलंबित मागण्यासाठी हिवाळी अधिवेशनात सरकारला या बाबत योग्य रीतीने स्मरण करून देणार असल्याची ग्वाही आ.सुरेश धस त्यांनी यावेळी दिली.समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने जागो सरकार जागो आंदोलना अंतर्गत राज्यातील सर्व पक्षीय आजी माजी मंत्री, खासदार, आमदार या सर्व लोकप्रतिनिधींना प्रलंबित मागण्यांचे निवेदन देऊन स्मरण करून देण्यात येत असून शासन-प्रशासनाने तात्काळ ठोस पावले न उचलल्यास आंदोलनाचा तिसरा टप्पा आणखी तीव्र करणार असल्याचेही समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती च्या वतीने सांगण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....