युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS: *पंकजाताई मुंडे यांच्या भेटीने बालिकांच्या निरागस चेहर्‍यावर फुलले हास्य !* *आशा सदनच्या बालगृहात साजरी केली भाऊबीज*

 *पंकजाताई मुंडे यांच्या भेटीने बालिकांच्या निरागस चेहर्‍यावर फुलले हास्य !*



*आशा सदनच्या बालगृहात साजरी केली भाऊबीज* 


मुंबई दि. १६ ------- बहिण - भावाचे नाते अधिक दृढ करणारा भाऊबीजेचा सण भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी डोंगरी परिसरातील आशा सदनच्या बाल गृहातील अनाथ बालिकां समवेत साजरा केला.  आजच्या आनंदाच्या दिवशी त्यांच्या भेटीमुळे  तेथील बालिकांच्या निरागस चेहर्‍यावर हास्य फुलले. यावेळी त्यांनी बालिकांच्या सानिध्यात राहून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस तर केलीच शिवाय भाऊबीजेची भेटवस्तू व मिठाईही दिली.  पंकजाताई गेल्या दहा वर्षापासून सामाजिक जाणिवेतून  भाऊबीजेचा सण अशा प्रकारे  साजरा करतात हे विशेष! 


  दिवाळी म्हटलं की आनंदाची पर्वणीच..अशा उत्सवात समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना सामावून घेत त्यांच्या जीवनातही आनंद निर्माण करण्याचे काम  पंकजाताई मुंडे गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत.  आजचा भाऊबीजेचा दिवस त्यांनी या बालिकांच्या सहवासात घालवला. डोंगरी परिसरातील महाराष्ट्र राज्य वुमन्स कौन्सिल आशा सदन या बालगृहाला आज दुपारी  त्यांनी भेट देऊन तेथील बालिकां सोबत कोरोनाचे नियम पाळून भाऊबीज साजरी केली.  दिवाळीचा फराळ, मिठाई तसेच आवश्यक वस्तू त्यांनी यावेळी त्यांना भेट स्वरूपात दिल्या आणि त्यांच्याशी संवादही साधला.  पंकजाताईंच्या  मनमोकळ्या संवादाने त्या निरागस बालिकांच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंद दिसून आला.  आशा सदनच्या अधीक्षक ज्योती टेमकर, बेला माहीमसुरा, सामाजिक कार्यकर्त्या राजश्री वाडिले आदी यावेळी उपस्थित होत्या. 


   यावेळी उपस्थित माध्यमांशी बोलताना ना. पंकजाताई म्हणाल्या की, गेल्या दहा वर्षापासून मी राज्यातील विविध ठिकाणी वंचित, उपेक्षित, अनाथ मुलांसोबत दरवर्षी मुलाचा वाढदिवस, स्वतःचा वाढदिवस तसेच भाऊबीज अशा प्रकारे सामाजिक जाणिवेतून साजरी करते. मला यातून आनंद व समाज कार्याची प्रेरणा मिळते. आजची भाऊबीजही दरवर्षीप्रमाणे माझ्या सदैव स्मरणात  राहील.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या