MB NEWS:वैद्यनाथ साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा गाळप शुभारंभ दि. 25 नोव्हेंबर रोजी

 वैद्यनाथ साखर कारखान्याचा बाॅयलर अग्नी प्रदीपन उत्साहात 



पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यनाथ पुन्हा गतवैभव प्राप्त करील - फुलचंद कराड 


शेतकऱ्यांनी वैद्यनाथ कारखान्यालाच ऊस देण्याचे आवाहन 


परळी वैजनाथ दि. २१....

       वैद्यनाथ कारखाना यावर्षी पुर्ण क्षमतेने चालवण्याचा निर्धार अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी केला असुन त्यांच्या नेतृत्वाखाली " वैद्यनाथ" पुन्हा गतवैभव प्राप्त करील असा विश्वास व्यक्त करून शेतकऱ्यांनी इतरत्र ऊस न देता वैद्यनाथलाच ऊस द्यावा असे आवाहन कारखान्याचे जेष्ठ संचालक फुलचंद कराड यांनी आज केले. दरम्यान कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ बुधवार दि. 25 नोव्हेंबर रोजी पंकजाताई मुंडे यांच्या शुभ हस्ते होणार आहे. 

       वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या २० व्या गळीत हंगामाचा बाॅयलर अग्नी प्रदीपन समारंभ आज फुलचंद कराड यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव अघाव, संचालक सर्वश्री शिवाजी गुट्टे, पांडुरंगराव फड, ज्ञानोबा मुंडे, माधवराव मुंडे, किशनराव शिनगारे, व्यंकटराव कराड, दत्ताभाऊ देशमुख, भाऊसाहेब घोडके, त्रिंबकराव तांबडे, केशवराव माळी, आश्रोबा काळे, संदीप लाहोटी, कार्यकारी संचालक जी. पी. एस. के. दिक्षीतुलू आदींची उपस्थिती होती. प्रारंभी फुलचंद कराड व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुमनबाई कराड यांच्या शुभ हस्ते विधीवत पूजा व होमहवन करण्यात आले. 

      फुलचंद कराड पुढे बोलताना म्हणाले की, लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या अथक परिश्रमाने वैद्यनाथची उभारणी झाली आहे. साहेबांमुळे शेतकरी आणि नागरीकांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडली आहे. मुंडे साहेबांचा वसा आणि वारसा पंकजाताई मुंडे चालवत असुन खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांची त्यांना साथ आहे. त्यांनी कारखाना चांगला चालवला पण निसर्गाने अडचणी आणल्या. मात्र यावर्षी निसर्ग प्रसन्न झाला असुन पंकजाताई यांनी कारखाना पुर्ण क्षमतेने चालवण्याचा पक्का निर्धार केला आहे. त्यांची राजकीय ताकद मोठी आहे. कारखाना चालविण्यासाठी त्या अतिशय सक्षम आहेत. त्यांच्या राजकीय ताकदीच्या आणि प्रशासकीय कौशल्याच्या जोरावर वैद्यनाथ पुन्हा गतवैभव प्राप्त करील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंकजाताई आणि खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यनाथ पुर्ण क्षमतेने चालणार असुन त्यांना सर्व संचालक मंडळाची पुर्ण साथ राहणार आहे. अधिकारी, कर्मचारी यांनी चांगले काम करून योगदान द्यावे असे आवाहन करून कर्मचाऱ्यांच्या अडचणी पंकजाताई सोडवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संचालक शिवाजी गुट्टे म्हणाले की, वैद्यनाथ साखर कारखाना पुर्ण क्षमतेने चालवण्याचा निर्णय पंकजाताई मुंडे यांनी घेतला असुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी इतर कारखान्यांना ऊस न देता आपल्यासाठी कामधेनू असलेल्या वैद्यनाथ कारखान्यालाच ऊस द्यावा असे आवाहन केले. 

      कार्यक्रमाला रमेशराव कराड, सतीश मुंडे, श्रीराम मुंडे, सुरेश माने, सुर्यकांत मुंडे, विठ्ठल मुंडे, वृक्षराज निर्मळ, ज्ञानदेव तांदळे, हनुमंत नागरगोजे, प्रभाकरराव कदम, तुकाराम कराड, चंद्रकांत सोनवणे, जयवंत कराड, गोविंद मुंडे, मोहन गित्ते, फुलचंद मुंडे, गणेश मोहेकर, चंद्रकांत देवकते यांच्यासह विविध गावचे सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधी, ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मजूर, मुकादम, कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन ज्ञानोबा सुरवसे यांनी केले. 


*बुधवारी गळीत हंगामाचा शुभारंभ*

       दरम्यान वैद्यनाथ साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा गाळप शुभारंभ बुधवार दि. 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. कारखान्याच्या अध्यक्षा तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार असल्याचे कारखान्याच्या वतीने सांगण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !