MB NEWS:परळी तालुका कामगार, कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर संयुक्त कृती समितीच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर निदर्शने - प्रा.बी.जी खाडे.

 परळी तालुका कामगार, कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर संयुक्त कृती समितीच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर निदर्शने - प्रा.बी.जी खाडे



परळी वै. (प्रतिनिधी) ः परळी तालुक्यातील कामगार, कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर कृती समितीची दिनांक १७ नोव्हेंबर रोजी सीटू कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत २६ नोव्हेंबर रोजी देशव्यापी संपाच्या निमित्ताने तहसील कार्यालयापुढे दुपारी १ वाजता निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संयुक्त कृतीसमितीचे निमंत्रक प्रा.बी.जी.खाडे यांनी दिली.

देशातील सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी व कामगार संघटांच्या महासंघाने दि.२६ नोव्हेंबर २०२० रोजी देशव्यापी सार्वत्रिक संप करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने पुर्वीचे कामगार कायदे रद्द केले आहेत व कामगारांचेे हक्क हिरावून घेतले आहेत. नविन कामगार कायद्याला कामगार संघटनांचा विरोध आहे. केंद्र सरकारने केलेल्या नविन कृषी कायदा शेतकरी विरोधी असून या कायद्याला देशातील सर्व शेतकर्‍यांचा विरोध आहे. केंद्र सरकारने कामगार संहितेची निर्मिती फक्त उद्योगपतीच्या फायद्यासाठीच केलेली आहे. त्यात कामगारांच्या हिताचा कोठेही विचार केलेला नाही. कोरोना महामारीच्या काळात अनेक कामगारांचे काम गेले आहे. परंतू सरकारने त्यांना काहीही मदत केलेली नाही. कामगारांच्या, शेतकर्‍यांच्या व कर्मचार्‍यांच्या प्रश्नावर बैठकीत चर्चा होवून उत्पन्न कर (इन्कम टॅक्स) लागू नसणार्‍या कुटूंबास प्रत्येक महिना ७५००/- रूपये द्या, प्रत्येक गरजू कुटूंबाला मानसी १० किलो धान्य द्या, मनरेगाचे काम प्रत्येकास २०० दिवस द्या व मजूरी ५०० रूपये द्या, सार्वजनिक उद्योेगाचे खाजगीकरण थांबवा, नविन पेन्शन योजना रद्द करा व जुनीच पेन्शन योजना लागू करा, कंत्राटीकरण थांबवा व कायमस्वरूपी नियुुक्त्या द्या इत्यादी मागण्यांसाठी दि.२६ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी १ वाजता निदर्शने करण्यात येणार आहेत.  

संयुक्त कृती समितीच्या बैठकीस कृती समितीचे निमंत्रक प्रा.खाडे बी.जी., किरण सावजी, मुरलीधर नागरगोजे, अशिष अवचारे, शरणम ताटे, राजाभाऊ जगतकर, सुरेश वाल्मीकी, ज्ञानेश्वर गुंडाळे, शिवरत्न आघाव, हंसराज गंडले, अनिता गिराम, छाया रणदिवे, महादेव हजारे, संजय जाधव, सुधाकर तेलगे, अश्विनी खेत्रे इत्यादी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार