MB NEWS:बीड जिल्ह्यात 18 दिवसात एसटीचे 109 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह परळीत आगारातही लागण; चिंतेची बाब

 बीड जिल्ह्यात 18 दिवसात एसटीचे 109 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह 

परळीत आगारातही लागण; चिंतेची बाब





बीड - प्रतिनिधी: मुंबईच्या प्रवासी सेवेसाठी राज्यातून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध आगारात कर्मचारी मुंबई येथे मुंबई बेस्ट सेवेत कार्यरत आहेत.1 नोव्हेंबर पासून बीड विभागातील साधारण 800 कर्मचारी आत्तापर्यंत मुंबई येथे आपले कर्तव्य बजावत आहेत.18 दिवसात या कर्मचाऱ्यांपैकी बीड जिल्ह्यातील 109 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने ही जिल्हावासीयांना चिंतेची बाब वाटू लागली आहे.


मुंबई बेस्ट वाहतुकी साठी वाहक- चालक मिळून राज्यातील विविध आगारांच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.परळी, माजलगाव सह जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.कोरोना संसर्गाची संभाव्य दुसरी लाट लक्षात घेता एसटीच्या कर्मचाऱ्यांना बाधा होऊ नये म्हणून व त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होऊ नये या काळजीतून परत आपापल्या आगारात बोलण्याची गरज आहे.बीड विभागातील काही कर्मचारी संभाव्य कोरोना लागण लक्षात घेऊन मुंबईत सेवा करण्यास तयार नसल्याचे समजते.कर्मचाऱ्यांना लागण होऊन पुढे संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार