MB NEWS:वृक्षसंवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणार्या समाजबांधवांचा माजी विद्यार्थी संघाकडुन गौरव

 वृक्षसंवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणार्या समाजबांधवांचा माजी विद्यार्थी संघाकडुन गौरव



परळी (प्रतिनीधी )

वृक्षलागवड करुन त्याची जोपासणा करत हरित परळीचे स्वप्न साकारण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून वृक्ष संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणार्या परळीतील संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांचा माजी विद्यार्थी संघाच्या वतिने सन्मान करण्यात आला.

 परळी शहरातील वेगवेगळ्या शाळेत शिक्षण घेतलेले वर्गमित्र दीपावली निमीत्त एकत्र येवुन दरवर्षी सामाजीक उपक्रम राबवत असतात.यावर्षी परळी शहर परिसरात वृक्ष लागवड करून संवर्धनाचे कार्य करणार्या व परळी शहर हे 'हरित परळी' बनवण्याच्या दृष्टिकोनातून शहरातील अनेक संस्था व व्यक्ती प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी वृक्ष संवर्धन चळवळ पुढे यावी यासाठी माजी विद्यार्थी संघातर्फे त्यांचा परळी शहरातील रस्त्यावर हजारो झाडे लावुन ती जोपासण्यासाठी पुढाकार घेणार्या नगराध्यक्षा सौ.सरोजिनी हालगे,परळी जवळील नंदागौळ रोड,कन्हेरवाडी परिसरात माळरानावर शासनाची घनदाट वृक्ष लागवड योजना प्रभावीपणे राबवुन विविध जातीच्या वृक्षांची प्रयत्नपूर्वक वाढ करून वनखात्याला साजेशे वन निर्माण करणारे वनरक्षक व्ही.एम.दौंड,डोंगर माथ्यावर असलेल्या परळी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या परिसरातील रुक्ष वातावरणात वृक्ष लावून परिसर रम्य करणारे पो.नि.शिवलाल पुरभे,शहरातील उजाड माळरानावर प्रयत्नपूर्वक, तन-मन-धन व वेळ खर्च करून वृक्ष लागवड करून हिरवीगार वनराई निर्माण करणार्या व शहरातील वाळत असलेल्या वृक्षांची जोपासणा करणार्या वृक्षसंवर्धन चळवळीतील वृक्षमित्रांचा दि.16 नोव्हेंबर रोजी सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी संयोजक इंजि नेताजी पालकर, अध्यक्ष अश्विन मोगरकर, सचिव शौकत पठाण, उपाध्यक्ष प्रा राम पेंटेवार, मुकेश काबरा, रवींद्र देशमुख, गोपाळ आंधळे, सचिन स्वामी, नितीन समशेट्टे, संजय मुकदम, डॉ निलेश देशमुख, शेख हुमायून, शिवाजी पालाकुडतेवार, शिवप्रसाद राजनाळे, युसूफ खान, योगेश वांजरखेडे, राजेश राख, जगन्नाथ वडुळकर, अमोल संघई, प्रितेश तोतला, सिद्धेश्वर घोंगडे, मंगेश अलमलकर, वैभव मानवतकर, मकरंद अंबेकर, रवी कुलकर्णी, वैभव कुरकूट, अमर देशमुख, विजय भुतडा, अभिजित वारद, कैलास शिंदे, सचिन मुळे, आशिष चौधरी, आशिष कुसुमकर, किशोर मोदाणी, गणेश टिंबे, जगदीश पोपडे, गणेश भट्ट, दत्ता जोगदंड, अभिजित खके, अजय डूबे, अमोल टेकाळे, कल्याण देशमुख आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार