युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:परभणी जिल्ह्यातील सोनपेठ,पाथरी,मानवत,सेलू,जिंतूर व परभणी येथील पदवीधरांची सिद्धेश्वर मुंडेंनाच पसंती!

 मराठवाड्यातील पदवीधर व पदवीधर कर्मचाऱ्याना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासा साथ द्या - सिद्धेश्वर मुंडे



   परभणी जिल्ह्यातील सोनपेठ,पाथरी,मानवत,सेलू,जिंतूर व परभणी येथील पदवीधरांची सिद्धेश्वर मुंडेंनाच पसंती!


औरंगाबाद प्रतिनिधी दि.20....


औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सिध्देश्वर मुंडे यांनी परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, पाथरी, मानवत,सेलु,जिंतुर परभणी येणे प्रचार दौरा करत पदवीधर मतदारांसी संवाद साधला.परभणीतील पदवीधरांची पसंतीत सिध्देश्वर मुंडे मुंडे असल्याचे दिसून आले.


सध्या पदवीधर निवडणुकीच्या प्रचारासाठी अपक्ष उमेदवार सिध्देश्वर मुंडे मराठवाडा दौऱ्यावर आहेत.मुंडे यांनी दि.19 रोजी परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, पाथरी, मानवत, सेलु,जिंतुर व परभणी येथे प्रचार दौरा करत पदवीधरांच्या बैठका घेतल्या. सोनपेठे येथील पदवीधरांसी संवाद साधताना त्यांनी मराठवाड्यातील पदवीधर व पदवीधर कर्मचारी यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मला साथ देण्याचे आव्हान केले.सध्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील प्रश्न जशाच्या तसेच कसे काय राहीले असा सवाल ही मुंडे यांनी उपस्थित केला.


परभणी जिल्ह्यातील दौऱ्यात त्यांचे जागोजागी मोटार रँली व हार तुरे घालून जंगी स्वागत केले.परभणीच्या पदवीधरांनी अपक्ष उमेदवार मुंडे यांनाच नंबर एकची पसंती देऊन निवडून देण्याचा विश्वा व्यक्त केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या