MB NEWS:स्वरलक्ष्मी लहानेंच्या सुमधूर आवाजाने रंगली पहाट गाणी मारवाडी युवा मंचने परंपरा कायम ठेवली-ह.भ.प.तुळशीराम महाराज गुट्टे

 स्वरलक्ष्मी लहानेंच्या सुमधूर आवाजाने रंगली पहाट गाणी

मारवाडी युवा मंचने परंपरा कायम ठेवली-ह.भ.प.तुळशीराम महाराज गुट्टे



परळी (प्रतिनिधी)

सलग 22 वर्ष एखाद्या कार्यक्रमाचे सातत्य ठेवणे हे सहज सोपे मुळीच नाही. मारवाडी युवा मंचने मात्र कोरोना परिस्थितीचे गांभिर्य ठेवत, सुरक्षा उपाय योजना अंमलात आणत पहाटगाणी कार्यक्रमाची परंपरा कायम ठेवल्याचे मत ह.भ.प.भागवताचार्य तुळशीराम महाराज गुट्टे यांनी व्यक्त केले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे शनिवारी मारवाडी युवा मंच आयोजित व स्वर लक्ष्मी लहाने यांच्या स्वर मिलाप ऑर्केस्ट्राच्या वतिने पहाटगाणी कार्यक्रम पार पडला. हिंदी आणि मराठी भाषेतील गीत, भावगीत, आणि भक्तीगीतांची अनोखी मैफील यावेळी पार पडली. हा कार्यक्रम मराठवाडा साथी पीसीएन न्यूज चॅनेलवरून तसेच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हजारो घरापर्यंत पोहचला होता. नटराज मध्ये सुद्धा रसिकांनी चांगली गर्दी केली होती. 

मारवाडी मंच आणि स्वर मिलाप ऑर्केस्ट्रा प्रस्तुत पहाटगाणी कार्यक्रमाने परळीकरांची मने पुन्हा एकदा जिंकली आहेत. सलग 22 वर्ष पहाटगाणी कार्यक्रम दिवाळीच्या अभ्यंगस्नाला स्वरांची जोड देत असून यावर्षी श्री लक्ष्मी महापुजनाचे दिवशी म्हणजेच पहिल्या स्नानाला पहाटगाणी कार्यक्रम मैफल पार पडली. याप्रसंगी ह.भ.प.भागवताचार्य तुळशीराम महाराज गुट्टे यांच्या हस्ते पहाटगाणीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संजय अघाव, पत्रकार संघाचे अध्यक्ष संभाजी मुंडे, ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे, पत्रकार दत्तात्रय काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्य गायिका स्वरलक्ष्मी लहाने यांचा सत्कार मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या हस्ते करण्यात आला. मराठी आणि हिंदी भाषेतील जुन्या नव्या गाण्यासोबतच भक्तीगीत आणि भावगीत यावेळी सादर करण्यात आले. पहाटगाणी कार्यक्रम कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने होणार किंवा नाही याबाबत निश्चिती नव्हती. एैनवेळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यासोबतच फे सबुक, मराठवाडा साथी पीसीएन न्युज चॅनेलवरून कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले. 

कार्यक्रमास मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, ओमप्रकाश सारडा, जयपाल लाहोटी, सतिश सारडा, रतन कोठारी, गोविंद सोमाणी, संजय दरक, अनिल मोदाणी, सतिश बंग, ओमप्रकाश मुंदडा, अजय पुजारी, आनंद हाडबे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमात स्वरलक्ष्मी लहाने यांनी आपल्या गायनाने उपस्थितांची मने जिंकली,. त्यांच्यासोबतच नामदेव इंगळे, शंकर सोनतोंडे, कु.प्रांजल बोधक, महिंद्र कदम, कु.तन्वी दहिवाळ, स्वप्नील धुळे, अंकुश डाखोरे, निलेश मुंडे यांनी गीत गायनात साथ दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !