पोस्ट्स

MB NEWS-ऑक्सिजन बंद झाल्याने बीडमध्ये दोन रूग्णांचा मृत्यू* *जिल्हा रूग्णालयातील प्रकाराची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करा - पंकजाताई मुंडे यांची मागणी*

इमेज
 * ऑक्सिजन बंद झाल्याने बीडमध्ये दोन रूग्णांचा मृत्यू*  *जिल्हा रूग्णालयातील प्रकाराची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करा - पंकजाताई मुंडे यांची मागणी* बीड । दिनांक २४।  अचानक ऑक्सिजन बंद झाल्याने दोन रूग्णांचा झालेला मृत्यू अतिशय दुर्दैवी आहे, या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.    आज पहाटे जिल्हा रूग्णालयातील वाॅर्ड क्रमांक सातमध्ये पाॅझेटिव्ह असलेले दोन रूग्ण दगावल्याची घटना घडली. अचानक ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे रूग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून रूग्णालयाचा भोंगळ कारभार यानिमित्ताने समोर आला आहे. जिल्हा प्रशासनाने देखील या घटनेला दुजोरा दिला आहे. हा प्रकार अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगून पंकजाताई मुंडे यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, याची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ••••

MB NEWS-दुःखद बातमी: संतोष शिंदे यांना मातृशोक; श्रीमती रंजना शिंदे यांचे निधन

इमेज
दुःखद बातमी: संतोष शिंदे यांना मातृशोक; श्रीमती रंजना शिंदे यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी....              राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष संतोष शिंदे यांच्या  मातोश्री श्रीमंती रंजना जीवनराव शिंदे यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज दिनांक 24 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता परळी येथे अंत्यसंस्कार होणार आहे.       श्रीमंती रंजना जीवनराव शिंदे  या अतिशय मनमिळाऊ व कुटुंबवत्सल गृहिणी म्हणून परिचित होत्या.शिंदे परिवाराच्या आधारवड असलेल्या श्रीमंती रंजना शिंदे या सर्वपरिचित होत्या.त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष संतोष शिंदे यांच्या त्या मातोश्री होत. शिंदे परिवारावर कोसळलेल्या या दु:खद प्रसंगी सर्व स्तरातून शोकभावना व्यक्त होत आहेत.शिंदे परिवारावर कोसळलेल्या या दु:खात एमबी न्युज परिवार सहभागी आहे. ⬛ *आज सायंकाळी अंत्यसंस्कार*....        दरम्यान श्रीमंती रंजना जीवनराव शिंदे यांच्या पार्थिवावर परळी येथे आज दिनांक 24 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

MB NEWS-विकेंड लाॅकडाउनचे काटेकोर पालन करा - तहसीलदार शेजूळ यांचे आवाहन

इमेज
  विकेंड लाॅकडाउनचे काटेकोर पालन करा - तहसीलदार शेजूळ यांचे आवाहन परळी – प्रतिनिधी  शनिवार व रविवार रोजी विकेंड लॉक डाऊन असल्याने परळी शहर व तालुक्यातील व्यापारीवर्गांनी फक्त दवाखाने व मेडिकल दुकान वगळता सर्व व्यवहार बंद ठेऊन लॉकडाऊन पाळावा असे आवाहन परळी तहसील चे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी केले आहे.     🔴🔴🔴परळी वै शहरांतील सर्व नागरिक, व्यापारी,दुकानदार यांना कळवण्यात येते की,उद्या दि 24 व 25 तारखेचा विकेंड पाळला जात असून 100%दुकाने ( फक्त दवाखाने व मेडिकल वगळून)बंद राहतील याची नोंद घ्यावी.🔴🔴🔴  उद्या व परवा जी दुकाने चालू असतील त्यांच्यावर (1) गुन्हे नोंद करणे(2) 1 तारखेपर्यंत (लॉक डाऊन काळ)दुकान सिल करणे (3)लायसन जप्त करण्याची कारवाई करणे अशी कारवाई अनुसरण्यात येईल याची नोंद घ्यावी. 🔴महसूल,पोलीस,नप यांचे गोपनीय पथके शहरात फिरणार आहेत🔴                      सुरेश शेजुळ                  तहसीलदार परळी वै

MB NEWS-अंगरक्षकाच्या दुःखद निधनाने पंकजाताई मुंडे हळहळल्या ; व्हिडीओ काॅल करून अश्रूंना वाट मोकळी करून दिली* *गोविंद मुंडे यांचे दुःखद निधन*

इमेज
 * अंगरक्षकाच्या दुःखद निधनाने पंकजाताई मुंडे हळहळल्या ; व्हिडीओ काॅल करून अश्रूंना वाट मोकळी करून दिली* *गोविंद मुंडे यांचे दुःखद निधन* परळी । दिनांक २२।  अंगरक्षक गोविंद मुंडे यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाल्याचे समजताच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे हळहळल्या. परिवाराला व्हिडीओ काॅल करून त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. गेल्या कांही दिवसांपासून त्याला या आजारातून बरे करण्यासाठी त्या खूप प्रयत्न करत होत्या परंतू काळाने त्याला अखेर हिरावून नेले.   कन्हेरवाडी येथील रहिवासी असलेले गोविंद मुंडे (वय ४०) हे पंकजाताई मुंडे यांचे २००९ पासून अंगरक्षक होते. मागील आठवडय़ात ते कोरोना पाॅझेटिव्ह आल्यानंतर त्यांचेवर परळीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते पण प्रकृती सुधारत नसल्याने त्यांना लातूर येथे हलविण्यात आले. गोविंदची तब्येत सुधारावी ते यातून सुखरूपपणे बाहेर यावेत यासाठी पंकजाताई मुंडे दररोज डाॅक्टर, रूग्णालयातील यंत्रणा आणि त्याच्या कुटूंबियांशी बोलत होत्या, त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतू बुधवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मावळली, त्यांच्या पश्चात आई, वडिल, भा

MB NEWS-बालरोग तज्ञ डॉ.देशपांडे 18 वर्षाखालील गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांना देणार मोफत कोविड विषयक सल्ला*

इमेज
 * बालरोग तज्ञ डॉ.देशपांडे 18 वर्षाखालील गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांना देणार मोफत कोविड विषयक सल्ला* परळी वैजनाथ(प्रतिनिधी) - शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. गुरुप्रसाद देशपांडे यांनी गृह 18 वर्षांखालील विलगिकरणात असलेल्या रुग्णांना कोविड विषयक सल्ला व टेली उपचार मोफत देणार आहेत.नुकताच नवजीवन हॉस्पिटल चा 17 वा वर्धापन दिन संपन्न झाला त्याचे अवचित्त साधत या अभिनव उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी 9822484202 या क्र. संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सध्या लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे. या लहानमुलांमध्ये लक्षणे दिसून येत नसले तरी संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. या मुलांची संख्या ही लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जोपासत 18 वर्षा खालील कोविड पाँझिटीव्ह गृह विलगिकरणात असलेल्या पेशंटना मोफत उपचार व्हाँटसापवर सल्ला सुरू करण्यात आला आहे. या सेवेबद्दल व सध्याच्या भयानक संकटात हा पुढाकार घेतल्याबद्दल कोविड रुग्णांच्या नातेवाईक व नागरि

MB NEWS-आरोग्य मित्रच्या वतिने परळीतील कोरोना रूग्ण व लसीकरण वाहतुकीसाठी विशेष व्यवस्था* *निवासस्थान ते रूग्णालय मोफत सुविधा-चंदुलाल बियाणी*

इमेज
 * आरोग्य मित्रच्या वतिने परळीतील कोरोना रूग्ण व लसीकरण वाहतुकीसाठी विशेष व्यवस्था* *निवासस्थान ते रूग्णालय मोफत सुविधा-चंदुलाल बियाणी* *परळी (प्रतिनिधी)* आरोग्य मित्रच्या वतिने परळी शहरातील कोरोना रूग्णांच्या व लसीकरण सोयीसाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली असून रूग्णांना त्यांच्या घरापासून संबंधित रूग्णालय किंवा कोविड सेंटर पर्यंत जाण्या-येण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. अंबाजोगाई मध्ये दाखल करायचे असल्यास मात्र भाडे लागणार असून परळी शहरातील व्यवस्था पूर्णपणे मोफत आहे. संचारबंदी व आजारामुळे अनेकांना रूग्णालयात जाईपर्यंत वेळ लागतो, आयत्यावेळी वाहन मिळत नाही अशा अडचणींचा अनेकांना सामना करावा लागल्यामुळे सदरची व्यवस्था करीत असल्याची माहिती आरोग्य मित्रचे महाराष्ट्र अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी दिली. कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत असून परळी शहरात दररोजच 50 ते 75 दरम्यान कोरोना रूग्ण आढळून येतात. अनेकदा या रूग्णांना उपचारसाठी दाखल करतांना वाहन मिळत नसल्याने अडचणींना तोंंड द्यावे लागत आहे. सध्या संचारबंदी असल्याने वाहतुकीचे नियम कडक असून अनेक वाहन चालक जोखीम नको म्हणून

MB NEWS -पत्रकार विश्वास महाराज पांडे यांचे निधन

इमेज
पत्रकार विश्वास महाराज पांडे यांचे निधन परळी वैजनाथ दि. 17..      मराठवाडा साथीचे वृत्तसंपादक तथा ह. भ. प. विश्वास महाराज पांडे यांचे आज शनीवारी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 70 वर्षे होते.       विश्वास महाराज पांडे हे अखंड हरिनाम सप्ताहात प्रवचन करत असत त्यामुळे त्यांना सर्वत्र पांडे महाराज म्हणून ओळखत असत. विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यात ते सहभागी होत असत. विशेष म्हणजे ते ह.भ. प.अर्जुन महाराज लाड (गुरुजी ) यांचे ते शिष्य होते. गेल्या काही दिवसांपासून ते किरकोळ आजारी होते. त्यातच आज शनिवार दि. 17 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजण्याचे सुमारास दस्तापुर येथिल जवाईच्या  राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.        स्व. विश्वास महाराज पांडे यांच्या पार्थिवावर आज  सायंकाळी 6 वाजता दस्तापुर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.     स्व. विश्वास महाराज पांडे यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, जावई, नातवंडे, असा भरगच्च परिवार आहे.त्यांच्या वर कोसळल्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहेत

MB NEWS -तलफ लय बेक्कार रे $$$$$ .......! चक्क टरबूजातून कोरोना रुग्णांना खर्रा पार्सल पाठविण्याचा प्रकार

इमेज
  तलफ लय बेक्कार रे $$$$$ .......! चक्क टरबूजातून कोरोना रुग्णांना खर्रा पार्सल पाठविण्याचा प्रकार यवतमाळ :  यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोरोना उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची तलफ भागविण्यासाठी रुग्णांच्याच नातलगांनी टरबूज फोडून त्याच्या आत खर्रा पार्सल पाठविण्याचा प्रकार उघडकीस आला. तर काही नातलगांनी विदेशी मद्यसुद्धा पुरविण्याचा प्रयत्न काल गुरुवारी केला होता. मात्र, वैद्यकीय महाविद्यालयात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षक आणि डॉक्टर यांच्या सतर्कमुळे हा प्रयत्न हाणून पाडला.         कोरोना रुग्णांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर काही दिवसांनी ते रुग्ण उपचार घेतल्यानंतर बऱ्यापैकी धोक्यातून बाहेर आलेले असतात. त्यानंतर त्यांना आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात येते. त्याच ठिकाणी असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी हा अजब प्रकार शौकीनांची तलफ भागविण्यासाठी केला. मात्र, हा सर्व प्रयत्न वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला. यवतमाळच्या शासकीय रुग्णालयातील या प्रकारामुळे आर्श्चय व्यक्त केले जात आहे.

MB NEWS -आजच्या अहवालात 1005 जण कोरोना पॉझिटिव्ह ! विकेंड लाॅकडाउनचे काटेकोर पालन करा - तहसीलदार शेजूळ यांचे आवाहन

इमेज
  आजच्या अहवालात 1005  जण कोरोना पॉझिटिव्ह ! विकेंड लाॅकडाउनचे काटेकोर पालन करा - तहसीलदार शेजूळ यांचे आवाहन परळी – दि 15 प्रतिनिधी जिल्ह्यात शुक्रवार दि 16 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील  3655 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1005  जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर  2650 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण अंबाजोगाई 142,आष्टी 168,बीड 348,गेवराई 67 माजलगाव 60,परळी 29, धारूर 29, केज 98, शिरूर 21 पाटोदा 21, वडवणी 22 परळी शहरात शुक्रवारी केवळ एक रुग्ण तर ग्रामीण भागात 28 रुग्ण आढळून आले अंबाजोगाई शहरात दररोज द्विशतक पूर्ण होत असताना शुक्रवारी 142 रुग्ण आढळून आल्याने समाधानकारक परिस्थिती पहावयास मिळाली. यातच शनिवार व रविवार रोजी विकेंड लॉक डाऊन असल्याने परळी शहर व तालुक्यातील व्यापारीवर्गांनी फक्त दवाखाने व मेडिकल दुकान वगळता सर्व व्यवहार बंद ठेऊन लॉकडाऊन पाळावा असे आवाहन परळी तहसील चे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी केले आहे

MB NEWS -निवृत्त पोस्टमन रावसाहेब आंधळे यांचे निधन ह. भ. प. अॅड. दत्ता महाराज, शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांना पितृशोक

इमेज
  निवृत्त पोस्टमन रावसाहेब आंधळे यांचे  निधन ह. भ. प. अॅड. दत्ता महाराज, शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांना पितृशोक परळी वैजनाथ दि. १६..      ह. भ. प. दत्ता महाराज व परळी नगर परिषदेचे शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांचे वडील, निवृत्त पोस्टमन रावसाहेब आंधळे यांचे आज शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७१ वर्षे होते.       मुळचे मरळवाडी येथील रहिवासी असलेले रावसाहेब आंधळे यांनी पोस्ट खात्यात अतिशय प्रामाणिक सेवा केल्याने त्यांचा सर्वत्र चांगला परिचय होता. विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यात ते सहभागी होत असत. पोस्टात येणाऱ्या प्रत्येकाशी अतिशय आपुलकीने वागणूक असायची. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर आणि आपुलकी वाटत असे. गेल्या काही दिवसांपासून ते किरकोळ आजारी होते. त्यातच आज शुक्रवार दि. १६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजण्याचे सुमारास कृष्णा नगर मधील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.        स्व. रावसाहेब आंधळे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात सायंकाळी परळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते.      स्व. राव

MB NEWS - *बीड जिल्हयात रेमडेसिवर आणि कोरोना लसीचा तुटवडा ; बीडच्या सत्ताधाऱ्यांना फक्त माफियांचं हित माहिती - पंकजाताई मुंडे यांचं आरोग्यमंत्र्यांना पत्र*

इमेज
 *बीड जिल्हयात रेमडेसिवर आणि कोरोना लसीचा तुटवडा ; बीडच्या सत्ताधाऱ्यांना फक्त माफियांचं हित माहिती - पंकजाताई मुंडे यांचं आरोग्यमंत्र्यांना पत्र* मुंबई । दिनांक १६। बीड जिल्हयात कोरोनाची स्थिती गंभीर बनली असताना रेमडेसिवर आणि कोरोना लसींचा मोठया प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. अशातच राज्य सरकारने बीडला केवळ २० डोस दिले आहेत, यासंदर्भात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आरोग्यमंत्र्यांना पत्र पाठवून खेद व्यक्त केला आहे. दरम्यान, बीडमध्ये सत्ताधाऱ्यांना  फक्त माफियांचं हित माहित आहे, जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.   सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बीडमध्ये परिस्थिती चिंताजनक बनली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार जिल्हयात आतापर्यंत ७२९ कोरोना पाॅझेटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर बाधितांची संख्या ३५ हजाराच्या आसपास गेली आहे.  एकीकडे आरोग्य यंत्रणा पुर्ण ताकदीने रूग्णांना मदत करण्यासाठी अहोरात्र काम करत असताना दुसरीकडे कोरोना रूग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे, रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना

MB NEWS-जगदीश घेवारे यांना पत्नीशोक; सौ.वंदना घेवारे यांचे निधन

इमेज
  जगदीश घेवारे यांना पत्नीशोक; सौ.वंदना घेवारे यांचे निधन                    परळी (प्रतिनिधी)- येथील बसवेश्वर कॉलनीतील रहिवाशी जगदीश रामेश्वरअप्पा  घेवारे यांची पत्नी सौ. वंदना जगदीश घेवारे  यांचे दिर्घ आजाराने शुक्रवारी पहाटे 5 वाजता निधन झाले.मृत्यूसमयी त्या 52 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवदेहावर आज दुपारी 2 वाजता वीरशैव स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या मनमिळाऊ व धार्मिक प्रवृत्तीच्या असल्याने सर्वपरिचित होत्या.त्यांच्या पश्चात पती , दोन मुली, 1 मुलगा असा  परिवार आहे. दै. परळी प्रहारचे कॉम्प्युटर ऑपरेटर शिवराज घेवारे यांच्या त्या मातोश्री होत्या.

MB NEWS-पोहनेरच्या अवैध वाळू उपसा प्रकरणी खा. डाॅ. प्रितमताई मुंडेंनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर!* *परळीत उपोषणार्थींची घेतली भेट ; लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे*

इमेज
 * पोहनेरच्या अवैध वाळू उपसा प्रकरणी खा. डाॅ. प्रितमताई मुंडेंनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर!*  *परळीत उपोषणार्थींची घेतली भेट ; लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे* परळी । दिनांक १५। पोहनेर येथील गोदावरी गंगा पात्रातून राजरोसपणे वाळूचा मोठया प्रमाणावर अवैध उपसा करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा अन्यथा परिणामांना सामोरे जा अशा कडक शब्दांत तंबी देत खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी आज महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. याप्रकरणात कठोर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर खा. प्रितमताईंच्या मध्यस्थीने ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले.   पोहनेर येथील  गोदावरी गंगा पात्रातून गेल्या कांही महिन्यांपासून उघडपणे मोठया प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत आहे. शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडवून हा प्रकार सर्रास सुरू आहे. माफियांपुढे पोलिस व महसूल प्रशासन शरण गेले असून त्यांचेवर काहीच कारवाई केली जात आहे.  वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कडक कारवाई करून बुडवलेला महसूल वसुल करावा, उपसा केलेल्या वाळूचे पंचनामे करावेत आणि तातडीने उपसा थांबवावा या मागणीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते उत्तम माने, पंडितरा

MB NEWS-लॉकडाऊन च्या पहिल्या दिवशी परिस्थिती जैसे थे दिवसभरात 963 जण बाधित

इमेज
  लॉकडाऊन च्या पहिल्या दिवशी परिस्थिती जैसे थे दिवसभरात 963 जण बाधित परळी – दि 15 प्रतिनिधी जिल्ह्यात गुरुवार दि 15 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3799  जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 963  जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर  2836 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण अंबाजोगाई 230, आष्टी 116, बीड 167, गेवराई 49 माजलगाव 70, परळी 69, धारूर 25, केज 106 शिरूर 43, पाटोदा 59, वडवणी 29 अशी रुग्ण संख्या आढळून आली आहे. परळी तालुक्यातील नागापूर या गावातील नागरिकांची धाकधूक वाढविणारी रुग्ण वाढ आज ही दिसून आली असून गुरुवार दि 15 रोजी च्या अहवालात 9 रुग्ण या गावात वाढलेले दिसून येत आहेत.नागापूर हे गाव कोरोनाचे नेऊन हॉट स्पॉट बनत असून रोज या गावातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसते आहे यातच कहर म्हणून मंगळवार दि 13 रोजी एकाच दिवशी 5 कोरिनाबाधित रुग्णाचा एकाच दिवशी मृत्यू झाला होता.  परळी शहर व तालुक्यातील दौनापूर, कन्हेरवाडीसिरसाळा, नागापूर, हालंब, धर्मापुरी, मांडवा, नाथ्रा सारडगाव , कौठळी, गोवर्धन हिवरा, अस्वलंबा दौंडवाडी, दैठणा

MB NEWS-महिला महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी*

इमेज
 * महिला महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी* परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)           शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.                      राणी लक्ष्मीबाई टाँवर चौक परिसरात असलेल्या लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात बुधवारी (ता.१४) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त शासनाने ठरवून दिलेल्या कोविड विषयक नियमांचे पालन करुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, प्राचार्या डॉ. आर.जे.परळीकर, संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख, प्रा.डॉ. जगतकर, प्रा.डॉ. जोशी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संजय देशमुख, प्राचार्या डॉ. परळीकर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रा.डॉ.जगतकर, श्री.देशमुख, प्राचार्या डॉ. परळीकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन,आभार प्रा.

MB NEWS-कोरोना अपडेट बुधवार दि 14 एप्रिल 21*

इमेज
 * कोरोना अपडेट बुधवार दि 14 एप्रिल 21* *आज बुधवार दि.14 रोजी बीड जिल्ह्यात 928 तर परळी तालुक्यात 40 कोरोना पॉझिटिव्ह* अंबाजोगाई 252 आष्टी 112 बीड 246 गेवराई 55 माजलगाव 51 परळी 40 धारूर41 केज 69 शिरूर 24 पाटोदा 20 वडवणी 18 *एकूण बीड जिल्ह्यातील पॉझिटिव्ह 928* चाचणी 3555 निगेटिव्ह 2626

MB NEWS-नाभिक समाजाला लाॅकडाऊन मध्ये शिथिलता द्या व उस्मानाबाद येथील मयत मनोज झेंडे यांला शासकीय मदत द्या---- शरद कावरे

इमेज
  नाभिक समाजाला लाॅकडाऊन मध्ये शिथिलता द्या व उस्मानाबाद येथील मयत मनोज झेंडे यांला शासकीय मदत द्या- शरद कावरे                                       कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय म्हणून विविध व्यवसाय सुरू ठेवून सलुन व्यवसाय मात्र लाॅकडाऊन च्या नावाखाली बंद केले आहेत त्यामुळे हातावर पोट असणारे  नाभिक समाज बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे तत्काळ सलुन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी व उस्मानाबाद येथील मयत मनोज झेंडे यांला तत्काळ  शासकीय मदत द्यावी व त्या कुटुंब योग्य तो न्याय द्यावा आशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या परळी च्या वतीने निवेदना द्वारे मा.उपविभागीय अधिकारीसाहेब परळी वै. तसेच तहसीलदार साहेब परळी वै.व सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्य़ाचे पालक मंत्री मा.श्री धनंजयजी मुंडे साहेब यांच्या कडे करण्यात आली आहे.               लाॅकडाऊन च्या नावाखाली विविध व्यवसाय सुरू असताना नाभिक समाजाच्या सलुन व्यवसाय मात्र पुर्णपणे बंद करण्यात आला आहे .हे व्यवसाय बंद केल्याने नाभिक समाजावरील कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. गतवर्षीही 3 ते 4 महिने हा व्यवसाय बंद होता व पुन्हा हा व

MB NEWS-राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू* *दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज*

इमेज
* राज्यात १ मेपर्यंत  कडक निर्बंध लागू*  *दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज* *कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना गरजूंच्या पाठिशी* *कुणाचीही आबाळ होऊ देणार नाही -  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*  *एक महिन्यांचा शिधा, शिवभोजन थाळीही मोफत देणार* *कामगारांसह, आदिवासी, असंघटीत क्षेत्राला दिलासा* मुंबई, दि. १३ : - कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा करतांना या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे  ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.  राज्यात उद्या बुधवार दि १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील व या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरु राहतील. यासंदर्भातील ब्रेक दि चेनचे नवे आदेश आज प्रसिद्ध करण्यात आले आहेत.    राज्यात मार्च २०२१ पासून कोविड-१९ ची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्याची गरज म्हणून कडट टाळेबंदी ल

MB NEWS- *भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार देशाला पुढे नेण्यासाठी प्रेरक - धनंजय मुंडे* *महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह चैत्यभूमीवर करणार अभिवादन*

इमेज
 *भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार देशाला पुढे नेण्यासाठी प्रेरक - धनंजय मुंडे* *महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त  राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह चैत्यभूमीवर करणार अभिवादन* मुंबई (दि. १३) ---- : संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांनी दिलेली शिकवण ही देशाला प्रगतीपथावर  पुढे नेण्यासाठी प्रेरक आहे. आज आदरणीय डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना नमन करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो, अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे.  कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे लागू असलेल्या निर्बंधांच्या परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत साधेपणाने, घरा-घरातूनच बाबासाहेबांना अभिवादन करून साजरी करावी, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.  भारतरत्न डॉ. बाबाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या (दि. १४) मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर शासकीय अभिवादन कार्यक्रम सकाळी ११.००  संपन्न होणार असून, या कार्यक्र

MB NEWS-पाडव्याच्या नवचैतन्यात कोरोनाचे मळभ धुवून निघावेत - धनंजय मुंडे* *गुढी पाडवा व मराठी नववर्षाच्या धनंजय मुंडेंनी दिल्या बीड जिल्हा वासीयांना शुभेच्छा*

इमेज
 * पाडव्याच्या नवचैतन्यात कोरोनाचे मळभ धुवून निघावेत - धनंजय मुंडे* *गुढी पाडवा व मराठी नववर्षाच्या धनंजय मुंडेंनी दिल्या बीड जिल्हा वासीयांना शुभेच्छा* बीड (दि. १२) ----:  चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी वसंत ऋतूचे आगमन व गुढी पाडव्याच्या चैतन्यामध्ये कोरोनाचे मळभ धुवून निघावेत व नवी चैतन्यमयी, समृद्ध व आरोग्यदायी सकाळ सर्वांच्या आयुष्यात यावी, अशा शब्दात बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा वासीयांना गुढी पाडवा व मराठी नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  मराठी नववर्ष आणि त्यानिमित्ताने साजरा होणारा गुढी पाडव्याचा सण सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. मनातील नवनिर्मितीच्या कल्पनांना चैत्रपालवीची संजीवनी मिळो. जीवनात यशाच्या उंच गुढ्या उभारण्याची स्वप्ने पूर्ण होवोत. यशाच्या त्या उंच गुढ्यांमध्ये एक गुढी सततचा लॉकडाऊन आणि कोरोना यापासून मुक्तीची असो, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी पाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  मराठी संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेला व निसर्गामध्ये चैतन्य निर्माण करणाऱ्या बदलांचे उत्साहाने स्वागत करण्याचा हा

MB NEWS-कोरोनाविरुद्ध निर्वाणीचा लढा, पुढील १५ दिवस अत्यंत महत्वाचे - धनंजय मुंडे*

इमेज
 * कोरोनाविरुद्ध निर्वाणीचा लढा, पुढील १५ दिवस अत्यंत महत्वाचे - धनंजय मुंडे* * धनंजय मुंडेंनी घेतला बीड जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा, ऑक्सिजनसाठी बीड जिल्हा होणार आत्मनिर्भर* *ऑक्सिजन बेड वाढविणे, खाजगी रुग्णालय अधिग्रहण, रेमडीसीवीर वितरण नियंत्रणात आणण्याचे सक्त निर्देश* *बीड जिल्हा हेच माझे कुटुंब, हात जोडतो, लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळा - मुंडेंची भावनिक साद* बीड (दि. १२) ---- : कोरोनाचा वाढलेला प्रभाव लक्षात घेत प्रशासनातील प्रत्येक घटकाने गांभीर्यपूर्वक काम करावे, कोरोनाविरूद्धची ही लढाई निकराची असून, पुढील १५ दिवस अत्यंत महत्वाचे व निर्वानीचे आहेत. जिल्ह्यात कुठेही बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, रेमडीसीविर किंवा अन्य कोणत्याही बाबींची कमतरता भासणार नाही, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.  ना. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्ह्यातील कोविड परिस्थिती व त्यावरील उपाययोजना यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी व सर्व विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत कोविड आढावा बैठक जिल्हाधिका

MB NEWS-एसआयओ व जमाते इस्लामी हिंद यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर

इमेज
  एसआयओ व जमाते इस्लामी हिंद  यांच्या संयुक्त विद्यमाने  रक्तदान शिबीर परळी वै.( प्रतिनिधी) दि. 10 एप्रिल 2021: महाराष्ट्रावर असलेले रक्ततुटवड्याचे संकट लक्षात घेऊन जमाते ईस्लामि हिंद कार्यालय आझादनगर परळी वैजनाथ येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास एसआयओचे महाराष्ट्र साऊथ झोन प्रमुख सलमान खान साहेब यांची विशेष उपस्थिती लाभली. शिबिरास तरूण विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत सक्रिय सहभाग नोंदवला. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून एसआयओ व जमाते इस्लामि हिंद या  सामाजिक संघटनेच्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्रात  रक्तदान शिबीरांच्या आयोजनांचे सत्र सुरू आहे. सामान्य जनतेसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. लसीकरणा बाबत जनजागृती करण्यात येत आहे अशी माहिती याप्रसंगी बोलताना सलमान खान यांनी दिली. आपल्या संदेशात पवित्र कुरआन चा दाखला देत ते म्हणाले,"तुम्ही एका मानवाला वाचवले, तर तुम्हाला संपुर्ण मानवजातीला वाचवल्याचे पुण्य लाभते." राज्यात निर्माण झालेल्या रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्‍वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदानाचे आवाहन जनतेला केल

MB NEWS- *आयुबखान पठाण यांच्या पाठपुराव्याला यश :ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक दोन मध्ये अंगणवाडी मंजूर*

इमेज
 *आयुबखान पठाण यांच्या पाठपुराव्याला यश :ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक दोन मध्ये अंगणवाडी मंजूर* परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक आयुबखान पठाण यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.पालकमंत्री  ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक दोन मध्ये अंगणवाडी मंजूर झाली आहे.       प्रभाग क्रमांक दोन मधील शिवनगर, भिमानगर, झमझमपार्क,  बरकत नगर भागात  प्रभाग क्र 2 मध्ये आंगणवाडी मंजुर करण्यात आली आहे.  माजी उपनगराध्यक्ष आयुबखान पठाण यांच्या प्रयत्नातुन या अंगणवाडी ला मंजुरी मिळाली आहे.गेल्या अनेक दिवसापासून या भागात अंगणवाडी सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. या भागातील लहान मुलांच्या शिक्षणासाठी अंगणवाडी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या भागातील जिव्हाळ्याचा प्रश्न सोडविल्याबद्दल राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे ,न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक आयुबख

MB NEWS-भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने अभिवाद कार्यक्रमासाठी परवानगी द्यावी-मोहन व्हावळे*

इमेज
 * भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमासाठी परवानगी द्यावी-मोहन व्हावळे*  _परळी / प्रतिनिधी_  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती संपूर्ण देशभरासह महाराष्ट्रात  शहर व गावपातळीच्या प्रत्येक कुटुंबात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते.14 एप्रिल हा दिवस बहुजनांना प्रेरणा देणारा दिवस आहे.चालु असलेल्या लाॕकडाऊन मध्ये शिथिलता देऊन बाबांच्या अभिवादन करण्यासाठी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा व प्रत्येक वस्तीत असलेल्या  बौध्द विहारात ध्वजारोहण,पुजापाठ करण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी व साहित्य खरेदी करीता किमान दोन दिवस बाजार खुला करावा अशी मागणी बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे संपादक मोहन व्हावळे यांनी केली आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घराघरात उत्साहचे वातावरण असते व जयंतीच्या निमित्ताने घराघरात रंगरंगोटी, नवीन कपडे, सजावटीचे सामान, मिठाई, इतर पदार्थांची बनवले जातात त्यामुळे  व्यापार पेठही चालू ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढाव्यात अशी विनंती बीड जिल्हाधिकारी यांना केली आहे.निश्चितच आपण जर परवानगी दिली तर कोरोनाच्या पार्श्वभ

MB NEWS-कोरोना काळात गर्दी जमवुन लग्न पडले महागात: नवरा- नवरी, पुरोहितासह तीनशे वऱ्हाडी यांच्यावर गुन्हा दाखल

इमेज
  कोरोना काळात गर्दी जमवुन लग्न पडले महागात: नवरा- नवरी, पुरोहितासह तीनशे  वऱ्हाडी यांच्यावर गुन्हा दाखल        नेकनूर,प्रतिनिधी....      कोरोना काळात गर्दी जमवुन लग्न समारंभ करणं महागात पडले आहे. राज्यात कोविडविषयक कडक निर्बंध लागू आहेत. जमावबंदी, संचारबंदी लागू आहे.या परिस्थितीत ही गर्दी जमवुन लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता याप्रकरणी नवरा- नवरी, पुरोहितासह तीनशे  वऱ्हाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           धारूर आणि पैठण येथील कुटुंबीयांनी  विवाहासाठी  मांजरसुंबा हे  ठिकाण निवडले होते. मांजरसुंबा येथील बीड रोड वर असणाऱ्या कन्हैया लॉन्स या ठिकाणी मोठ्या  प्रमाणात गर्दी झाल्याचे नेकनूर पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी तिकडे धाव घेतली. या ठिकाणी धारूर येथील अमित अर्जुन गायकवाड आणि पैठण जिल्हा औरंगाबाद येथील ऋतुजा दिपकराव चव्हाण या दोघांचा विवाह सोहळा होत असल्याने गर्दी दिसून आली. यामुळे साथरोग, आपत्ती व्यवस्थापन आदी कलमाचे उल्लंघन झाल्याने ग्रामसेवक जगदीश कडू यांच्या फिर्यादीवरून नवरा, नवरी, त्यांचे आई-वडील,  मामा , लग्न लावणारे ब्राह्मण,  मॅनेजर यांच्यासह इतर तीनशे लोकावर