इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-महिला महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी*

 *महिला महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी*



परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)

          शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

                    राणी लक्ष्मीबाई टाँवर चौक परिसरात असलेल्या लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात बुधवारी (ता.१४) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त शासनाने ठरवून दिलेल्या कोविड विषयक नियमांचे पालन करुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, प्राचार्या डॉ. आर.जे.परळीकर, संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख, प्रा.डॉ. जगतकर, प्रा.डॉ. जोशी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संजय देशमुख, प्राचार्या डॉ. परळीकर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रा.डॉ.जगतकर, श्री.देशमुख, प्राचार्या डॉ. परळीकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन,आभार प्रा.प्रविण फुटके यांनी मानले. यावेळी प्रमोद पत्की, सुहास कण्व, अनिल पत्की, राहूल जगतकर, प्रताप समिंदरसवळे, श्री.कट्टे आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या