MB NEWS-आरोग्य मित्रच्या वतिने परळीतील कोरोना रूग्ण व लसीकरण वाहतुकीसाठी विशेष व्यवस्था* *निवासस्थान ते रूग्णालय मोफत सुविधा-चंदुलाल बियाणी*

 *आरोग्य मित्रच्या वतिने परळीतील कोरोना रूग्ण व लसीकरण वाहतुकीसाठी विशेष व्यवस्था*



*निवासस्थान ते रूग्णालय मोफत सुविधा-चंदुलाल बियाणी*


*परळी (प्रतिनिधी)*


आरोग्य मित्रच्या वतिने परळी शहरातील कोरोना रूग्णांच्या व लसीकरण सोयीसाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली असून रूग्णांना त्यांच्या घरापासून संबंधित रूग्णालय किंवा कोविड सेंटर पर्यंत जाण्या-येण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. अंबाजोगाई मध्ये दाखल करायचे असल्यास मात्र भाडे लागणार असून परळी शहरातील व्यवस्था पूर्णपणे मोफत आहे. संचारबंदी व आजारामुळे अनेकांना रूग्णालयात जाईपर्यंत वेळ लागतो, आयत्यावेळी वाहन मिळत नाही अशा अडचणींचा अनेकांना सामना करावा लागल्यामुळे सदरची व्यवस्था करीत असल्याची माहिती आरोग्य मित्रचे महाराष्ट्र अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी दिली.

कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत असून परळी शहरात दररोजच 50 ते 75 दरम्यान कोरोना रूग्ण आढळून येतात. अनेकदा या रूग्णांना उपचारसाठी दाखल करतांना वाहन मिळत नसल्याने अडचणींना तोंंड द्यावे लागत आहे. सध्या संचारबंदी असल्याने वाहतुकीचे नियम कडक असून अनेक वाहन चालक जोखीम नको म्हणून रूग्णांची ये-जा करण्यास नकार देतात. ही अडचण लक्षात घेवून आम्ही परळी शहरात रूग्ण प्रवासासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याचे आरोग्य मित्रचे प्रदेशाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी सांगितले.जेष्ठ नागरीक, अपंग व्यक्तींना लसीकरण करण्यासाठी केंद्रावर जाण्यासाठी सुद्धा मोफत वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे.

रूग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांनी परळी शहरात रूग्णालयात दाखल होण्यासाठी अ‍ॅटो रिक्षा (क्र.एमएच 44 सी 5177) चालक राहुल बारड मो.क्र.7972820279, 9423820279 येथे संपर्क साधावा. मारोती ओमिनी वाहनासाठी चालक शेख जावेद मो.क्रं.8999774816 तर टाटा सुमो  मुख्तार भाई 8329942246 येथे रूग्ण व किंवा नातेवाईकांनी थेट संपर्क साधावा. या उपक्रमाच्या अंतर्गत परळीतील सेवा पूर्णपणे मोफत असून अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयासाठी मात्र योग्य भाडे आकारले जाणार आहे. अधिक माहितीसाठी प्रशांत तोतला मो.क्र.9850246737, गोपी कांगणे 9405303333, शेख मुख्तारभाई 7249430650,अलीम शेख 9923371000,  येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !