MB NEWS-अंगरक्षकाच्या दुःखद निधनाने पंकजाताई मुंडे हळहळल्या ; व्हिडीओ काॅल करून अश्रूंना वाट मोकळी करून दिली* *गोविंद मुंडे यांचे दुःखद निधन*

 *अंगरक्षकाच्या दुःखद निधनाने पंकजाताई मुंडे हळहळल्या ; व्हिडीओ काॅल करून अश्रूंना वाट मोकळी करून दिली*



*गोविंद मुंडे यांचे दुःखद निधन*


परळी । दिनांक २२। 

अंगरक्षक गोविंद मुंडे यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाल्याचे समजताच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे हळहळल्या. परिवाराला व्हिडीओ काॅल करून त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. गेल्या कांही दिवसांपासून त्याला या आजारातून बरे करण्यासाठी त्या खूप प्रयत्न करत होत्या परंतू काळाने त्याला अखेर हिरावून नेले.


  कन्हेरवाडी येथील रहिवासी असलेले गोविंद मुंडे (वय ४०) हे पंकजाताई मुंडे यांचे २००९ पासून अंगरक्षक होते. मागील आठवडय़ात ते कोरोना पाॅझेटिव्ह आल्यानंतर त्यांचेवर परळीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते पण प्रकृती सुधारत नसल्याने त्यांना लातूर येथे हलविण्यात आले. गोविंदची तब्येत सुधारावी ते यातून सुखरूपपणे बाहेर यावेत यासाठी पंकजाताई मुंडे दररोज डाॅक्टर, रूग्णालयातील यंत्रणा आणि त्याच्या कुटूंबियांशी बोलत होत्या, त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतू बुधवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मावळली, त्यांच्या पश्चात आई, वडिल, भाऊ, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.


 गोविंद मुंडे यांच्या निधनाबद्दल पंकजाताई मुंडे यांनी दुःख व्यक्त केले आहे. ''माझ्या परिवारातील एका तरूण, मेहनती व धाडसी सदस्य आपण गमावला आहे, त्यांच्या कुटूंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर देवो'' अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !