MB NEWS -तलफ लय बेक्कार रे $$$$$ .......! चक्क टरबूजातून कोरोना रुग्णांना खर्रा पार्सल पाठविण्याचा प्रकार

 तलफ लय बेक्कार रे $$$$$ .......!



चक्क टरबूजातून कोरोना रुग्णांना खर्रा पार्सल पाठविण्याचा प्रकार


यवतमाळ : 

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोरोना उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची तलफ भागविण्यासाठी रुग्णांच्याच नातलगांनी टरबूज फोडून त्याच्या आत खर्रा पार्सल पाठविण्याचा प्रकार उघडकीस आला. तर काही नातलगांनी विदेशी मद्यसुद्धा पुरविण्याचा प्रयत्न काल गुरुवारी केला होता. मात्र, वैद्यकीय महाविद्यालयात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षक आणि डॉक्टर यांच्या सतर्कमुळे हा प्रयत्न हाणून पाडला.

        कोरोना रुग्णांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर काही दिवसांनी ते रुग्ण उपचार घेतल्यानंतर बऱ्यापैकी धोक्यातून बाहेर आलेले असतात. त्यानंतर त्यांना आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात येते. त्याच ठिकाणी असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी हा अजब प्रकार शौकीनांची तलफ भागविण्यासाठी केला. मात्र, हा सर्व प्रयत्न वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला. यवतमाळच्या शासकीय रुग्णालयातील या प्रकारामुळे आर्श्चय व्यक्त केले जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !