MB NEWS-ऑक्सिजन बंद झाल्याने बीडमध्ये दोन रूग्णांचा मृत्यू* *जिल्हा रूग्णालयातील प्रकाराची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करा - पंकजाताई मुंडे यांची मागणी*

 *ऑक्सिजन बंद झाल्याने बीडमध्ये दोन रूग्णांचा मृत्यू* 



*जिल्हा रूग्णालयातील प्रकाराची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करा - पंकजाताई मुंडे यांची मागणी*


बीड । दिनांक २४। 

अचानक ऑक्सिजन बंद झाल्याने दोन रूग्णांचा झालेला मृत्यू अतिशय दुर्दैवी आहे, या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. 


  आज पहाटे जिल्हा रूग्णालयातील वाॅर्ड क्रमांक सातमध्ये पाॅझेटिव्ह असलेले दोन रूग्ण दगावल्याची घटना घडली. अचानक ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे रूग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून रूग्णालयाचा भोंगळ कारभार यानिमित्ताने समोर आला आहे. जिल्हा प्रशासनाने देखील या घटनेला दुजोरा दिला आहे. हा प्रकार अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगून पंकजाताई मुंडे यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, याची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार