MB NEWS -निवृत्त पोस्टमन रावसाहेब आंधळे यांचे निधन ह. भ. प. अॅड. दत्ता महाराज, शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांना पितृशोक

 निवृत्त पोस्टमन रावसाहेब आंधळे यांचे  निधन



ह. भ. प. अॅड. दत्ता महाराज, शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांना पितृशोक


परळी वैजनाथ दि. १६..

     ह. भ. प. दत्ता महाराज व परळी नगर परिषदेचे शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांचे वडील, निवृत्त पोस्टमन रावसाहेब आंधळे यांचे आज शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७१ वर्षे होते. 

     मुळचे मरळवाडी येथील रहिवासी असलेले रावसाहेब आंधळे यांनी पोस्ट खात्यात अतिशय प्रामाणिक सेवा केल्याने त्यांचा सर्वत्र चांगला परिचय होता. विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यात ते सहभागी होत असत. पोस्टात येणाऱ्या प्रत्येकाशी अतिशय आपुलकीने वागणूक असायची. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर आणि आपुलकी वाटत असे. गेल्या काही दिवसांपासून ते किरकोळ आजारी होते. त्यातच आज शुक्रवार दि. १६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजण्याचे सुमारास कृष्णा नगर मधील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. 

      स्व. रावसाहेब आंधळे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात सायंकाळी परळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते. 

    स्व. रावसाहेब आंधळे यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा भरगच्च परिवार आहे. 


उद्या राख सावडण्याचा कार्यक्रम 


      दरम्यान स्व. रावसाहेब आंधळे यांच्या राख सावडण्याचा कार्यक्रम उद्या रविवार दि. १८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार