MB NEWS -पत्रकार विश्वास महाराज पांडे यांचे निधन

पत्रकार विश्वास महाराज पांडे यांचे निधन



परळी वैजनाथ दि. 17..

     मराठवाडा साथीचे वृत्तसंपादक तथा ह. भ. प. विश्वास महाराज पांडे यांचे आज शनीवारी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 70 वर्षे होते. 

     विश्वास महाराज पांडे हे अखंड हरिनाम सप्ताहात प्रवचन करत असत त्यामुळे त्यांना सर्वत्र पांडे महाराज म्हणून ओळखत असत. विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यात ते सहभागी होत असत. विशेष म्हणजे ते ह.भ. प.अर्जुन महाराज लाड (गुरुजी ) यांचे ते शिष्य होते. गेल्या काही दिवसांपासून ते किरकोळ आजारी होते. त्यातच आज शनिवार दि. 17 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजण्याचे सुमारास दस्तापुर येथिल जवाईच्या  राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. 

      स्व. विश्वास महाराज पांडे यांच्या पार्थिवावर आज  सायंकाळी 6 वाजता दस्तापुर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

    स्व. विश्वास महाराज पांडे यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, जावई, नातवंडे, असा भरगच्च परिवार आहे.त्यांच्या वर कोसळल्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार